Latest News

Latest News
Loading...

वणीत शिवसेनेत (उबाठा) तरुणांचा लोंढा; ‘शिवबंधन’ बांधून उत्साहात स्वागत

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात तरुणांचा ओघ वाढताना दिसत असून, विविध क्षेत्रांतील युवकांनी जाहीर प्रवेश करत पक्षसंघटनेला नवी ऊर्जा दिली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या प्रसंगी नव्या सदस्यांच्या मनगटावर ‘शिवबंधन’ बांधून त्यांचे शिवसेना परिवारात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी तरुण वर्ग ठामपणे उभा राहत असल्याचे या पक्षप्रवेशातून अधोरेखित झाले.

कार्यक्रमाला शहर प्रमुख विनोद ढुमणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे, युवासेना शहर प्रमुख तुलसी तेवर, महिला आघाडी तालुका संघटिका सुरेखा ढेंगळे, नगरसेवक अजय धोबे, जगन जुनघरी, समीर लेनगुळे यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन कार्यकर्त्यांचा कल शिवसेनेकडे वाढू लागला आहे. त्यांच्या कार्यकाळात पक्षसंघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला असून “गाव तिथे शिवसेना, घर तेथे शिवसैनिक” या भूमिकेवर काम केल्याने ग्रामीण व शहरी भागात पक्षाची पकड अधिक बळकट होत असल्याचे मानले जात आहे.

आगामी काळात वणी विधानसभा क्षेत्रात भगवा अधिक जोमाने फडकवण्यासाठी आणि जनसेवेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा निर्धार यावेळी आमदार संजय देरकर यांनी व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.