Latest News

Latest News
Loading...

छोरीया ले- आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, प्रबोधनपर बुद्ध-भीम गीतांच्या कार्यक्रमाने होणार सुरवात

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरालगत असलेल्या छोरीया ले-आऊट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ एप्रिल पासून जयंती महोत्सवाची सुरवात होणार असून महामानवाच्या जयंती निमित्त येथील तथागत महिला मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

छोरीया ले-आऊट येथे यावर्षीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात येत असून तथागत महिला मंडळाने जयंतीची जय्यत तयारी केली आहे. विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम याठिकाणी होणार असून १२ एप्रिलला बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने या महोत्सवाची सुरवात होणार आहे.

महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक भूषण काटकर यांचा प्रबोधनपर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. छोरीया ले-आऊट येथील पाण्याच्या टाकीजवळील तलाठी कार्यालयाच्या भव्य पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. भूषण काटकर आणि संच सुमधुर आवाजात बुद्ध भीम गीते सादर करून उपस्थितांच्या उत्साहात भर घालणार आहेत. गीत गायनातून प्रबोधन करून ते मानवी संवेदनांमध्ये उर्जा भरण्याचं काम करणार आहेत. तेंव्हा या कार्यक्रमाला मानवतावादी विचारसरणी जपणाऱ्या सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. 

No comments:

Powered by Blogger.