प्रशांत चंदनखेडे वणी :-
सर्वपरिचित असलेले विनोद राघोबा हिवरकर यांचं रविवार १२ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता अल्पशा आजारानं निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय ५२ वर्षे होतं. शहरालगत असलेल्या चिखलगाव येथील सदाशिवनगर येथे वास्तव्यास असलेले विनोद हिवरकर हे टँकरने पाणी पुरवठा करण्याचा व्यवसाय करायचे. खूप वर्षांपासून ते या व्यवसायात असल्याने त्यांचा जनसंपर्क व्यापक होता. सर्वांशीच त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ असं त्यांचं आचरण होतं. मितभाषी स्वभावामुळे मित्रपरिवारात त्यांना आदराचं स्थान होतं. तसेच एक मोठा वर्ग त्यांच्याशी जुळला होता. त्यांच्या निधनाने मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. तर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी त्यांच्या राहत्या घरून त्यांची अंतयात्रा निघणार असून चिखलगाव येथील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. विनोद हिवरकर यांना वणी तालुका ट्रॅक्टर मालक कल्याणकारी असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
.jpeg)
No comments: