तालुक्यातील लाठी (बेसा) येथे एका युवकाने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १५ एप्रिलला पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कवडू पांडुरंग खोके (वय ४०, रा. लाठी-बेसा) असे मृतकाचे नाव असून, त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे.
सकाळी ही बाब कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ शिरपूर पोलीस स्टेशनला ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय, वणी येथे पाठविण्यात आला.
कवडू खोके यांनी आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे लाठी परिसरात शोककळा पसरली आहे.

No comments: