शहरातील नामांकित व्यापारी तथा पालकर बूट हाऊस व फटका सेंटरचे संचालक रवींद्र लीलाधररावजी पालकर यांच्या मातोश्री श्रीमती मंजुळाबाई लीलाधररावजी पालकर (८०) यांचे आज पहाटे सुमारे २ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच व्यापारी व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
मंजुळाबाई पालकर या साधेपणा, आपुलकी व कुटुंबवत्सल स्वभावामुळे परिसरात परिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी १२.३० वाजता त्यांच्या राहत्या घरून (पोलीस स्टेशनच्या मागे, वणी) निघणार असून शहरातील मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
या दुःखद प्रसंगाने पालकर कुटुंब शोकसागरात बुडालं असून अनेकांनी रवींद पालकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली अर्पण केली.

No comments: