Latest News

Latest News
Loading...

लालगुडा बुद्ध विहारात सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

तालुक्यातील लालगुडा येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३३० वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा लालगुडा शाखा व सिद्धार्थ बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने ४ एप्रिल रोजी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पूजनीय भिक्खूनी आर्या यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील देत धम्ममार्गाचा संदेश दिला. त्यानांतर महेंद्र पाटील यांनी विहाराला दिलेल्या सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजू गजरे होते, तर मार्गदर्शन नलिनी थोरात यांनी केले. यावेळी सुचिता पाटील, वैशाली पाटील, सुनीता ठमके, प्रतिभा रामटेके, रमेश तेलंग, महेंद्र पाटील, प्रवीण वनकर, सचिन वानखेडे, भास्कर मानकर, मनोज भगत, गुणवंत खैरे, दादाजी घडले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतीय बौद्ध महासभेच्या निर्देशानुसार यावर्षीपासून सम्राट अशोक यांची जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्यात येणार असून, बौद्ध समाजाच्या विविध धार्मिक व सामाजिक संस्कारांमध्ये सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा समावेश करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. सम्राट अशोक यांचे कार्य, विचार आणि बौद्ध धम्म प्रसारासाठीचे त्यांचे योगदान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागसेन साठे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आयुनी जिलठे यांनी केले. सरणतय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता बौद्ध महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. 

No comments:

Powered by Blogger.