प्रशांत चंदनखेडे वणी :-
तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील दिक्षाभूमीवर ७० वा धम्म दिक्षा सोहळा थाटात साजरा करण्यात येणार आहे. मिनी दिक्षाभूमी म्हणून राजूर येथील दिक्षाभूमी संपूर्ण विदर्भात ओळखली जाते. नागपूर व चंद्रपूर नंतर राजूर येथे बौद्ध धम्माची दिक्षा देण्यात आली. त्यामुळे दरवर्षी येथील दिक्षाभूमीवर धम्म दिक्षा सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो. २८ एप्रिलला आयोजित या सोहळ्यात विविध धम्म उपदेशक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राजूर कॉलरी येथील दिक्षाभूमी परिसरात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता धम्मध्वजारोहण होणार असून दुपारी १ ते ३ या वेळात महापरित्राण पाठ घेण्यात येणार आहे. तसेच सायंकाळी ६ ते ८ दरम्यान भव्य धम्म भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रात्री ९ वाजता "स्मरण धम्म दिक्षा सोहळ्याचे" हा प्रबोधनपर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि ख्यातनाम गायक संघर्ष शिंदे (घाटकोपर, मुंबई) आणि संच हे आपल्या सुमधुर आवाजात हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उत्साहात साजरा होणाऱ्या या धम्म दिक्षा सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून या सोहळ्याला नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिक्षाभूमी बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष विवेक निमसटकर, उपाध्यक्ष पंकज कांबळे, सचिव जितकुमार चालखुरे, सहसचिव तथागत मस्के, कोषाध्यक्ष यशवंत पाटील, अमोल कांबळे, कार्याध्यक्ष रक्षा वानखेडे व सदस्यांनी केले आहे.

No comments: