भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६” अंतर्गत यवतमाळ येथे दोन दिवसीय जिल्हा प्रशिक्षण शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पंडित दीनदयाल प्रबोधनी येथे १६ आणि १७ मे रोजी आयोजित या शिबिरात पक्ष संघटन बळकटीकरण, वैचारिक दिशा आणि प्रभावी कार्यपद्धतीवर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण शिबिराला आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते मदनभाऊ येरावार, जिल्हा प्रभारी आमदार सुमित वानखेडे, आमदार राजू तोडसाम, नगराध्यक्षा अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस तसेच विविध आघाडी व मोर्चांच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिबिरामध्ये पक्षाच्या विचारधारेसह संघटनात्मक रचना, बूथस्तरीय कार्यपद्धती, जनसंपर्क, समाजकार्य आणि आगामी राजकीय आव्हानांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशिक्षण शिबिरामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. या माध्यमातून संघटनात्मक बळकटी, वैचारिक स्पष्टता आणि समाजकार्याची नवी दिशा मिळाल्याचे मत अनेकांनी मांडले.
“अशा प्रशिक्षण उपक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि पक्षकार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याची प्रेरणा मिळते. संघटन मजबूत करण्यासाठी तसेच कार्यपद्धतीत सुसूत्रता आणण्यासाठी ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली,” अशी प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दोन दिवस चाललेल्या या शिबिरात कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शिस्तबद्ध नियोजन, वैचारिक सत्रे आणि संघटनात्मक मार्गदर्शनामुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.


No comments: