प्रशांत चंदनखेडे वणी :-
पिकअप आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कार मधील एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची व्ह्रदयद्रावक घटना मंगळवार १९ मे ला रात्री ९.३० ते १० वाजताच्या सुमारास वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळील उतार रस्त्यावर घडली. सचिन जगन देवाळकर (३७) रा. मारेगाव असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. सचिन देवाळकर हे चंद्रपूर येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. ते कारने मारेगाव वरून चंद्रपूर येथे जात असतांना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
वणी मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळील उतार रस्त्यावर कार आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात मारेगाव येथील रहिवाशी असलेल्या आणि सध्या नोकरीनिमित्त चंद्रपूर येथे राहत असलेल्या सचिन देवाळकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडताच जखमी अवस्थेत सचिन देवाळकर यांना तात्काळ मारेगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. मात्र या मार्गावर नेहमी अपघाताच्या घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


No comments: