Latest News

Latest News
Loading...

वणी तालुक्याचा दहावीचा निकाल ८५.९४ टक्के ! आरोही ढेंगळे तालुक्यात प्रथम; सहा शाळांचा शंभर टक्के निकाल

प्रशांत चंदनखेडे वणी : 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एसएससी (दहावी) परीक्षेचा निकाल शुक्रवारी (८ मे) जाहीर झाला असून वणी तालुक्याने यंदा ८५.९४ टक्के निकालाची नोंद केली आहे. तालुक्यातील ४३ शाळांमधून परीक्षेला बसलेल्या २ हजार २४८ विद्यार्थ्यांपैकी १ हजार ९३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारत गुणवत्तेचा झेंडा उंचावला आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ (एसपीएम) विद्यालयाची विद्यार्थिनी आरोही प्रमोद ढेंगळे हिने ९८.२० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तर लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूलचा अनिकेत मधुकर तुराणकर ९६.६० टक्के गुणांसह तालुक्यात द्वितीय आला.

यंदाच्या निकालात सहा शाळांनी शंभर टक्के निकालाची कामगिरी नोंदवत विशेष लक्ष वेधले. लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल, वणी पब्लिक स्कूल, संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल, तुकडोजी महाराज विद्यालय भालर, सरस्वती माध्यमिक विद्यालय मोहर्ली आणि प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूल कायर या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानली जाते. पुढील शिक्षणाच्या दिशा निश्चित करणाऱ्या या परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फलित निकालातून दिसून आले. गुणवत्तेत झळकलेल्या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शाळांकडूनही यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येत आहे.

दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या निकालात काही प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र दिसून आले. तरीही अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत तालुक्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला आहे.

महत्त्वाचे निकाल पुढीलप्रमाणे :

लॉयन्स इंग्लिश मिडीयम स्कूल – १००%, वणी पब्लिक स्कूल – १००%, संताजी इंग्लिश मिडीयम स्कूल – १००%, तुकडोजी महाराज, विद्यालय, भालर – १००%, सरस्वती माध्यमिक विद्यालय, मोहर्ली – १००%, प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूल, कायर – १००%

एसपीएम हायस्कूल, वणी – ९०.७१%, जनता विद्यालय, वणी – ८६.३९%, विवेकानंद विद्यालय, वणी – ८७.९७%, आदर्श हायस्कुल, वणी -- ७२.७२%, जि.प. हायस्कुल, वणी - ६८.७५%, न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूल – ९४.११%, अनु. जाती विद्यालय, परसोडा – ९६.४२%, राष्ट्रीय विद्यालय, राजूर – ९६.०३%, लोकप्रिय शाळा, पेटूर - ९२.५०%

यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

No comments:

Powered by Blogger.