सामाजिक कार्यकर्ते नरेश निकम यांच्या मातोश्री तथा सेवानिवृत्त पोलीस जमादार (एएसआय) हेमंत निकम यांच्या अर्धांगिनी तारा हेमंतराव निकम (वय ६३) यांचे गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता यवतमाळ येथे राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली.
तारा निकम या गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. कुटुंबीयांकडून त्यांची प्रेमाने देखभाल व सेवा सुरू असतानाच गुरुवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अत्यंत शांत, सोज्वळ आणि मनमिळावू स्वभावामुळे तारा निकम यांना समाजात विशेष मान होता. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला प्रेमाने जपणाऱ्या आणि मुलांवर उत्तम संस्कार करणाऱ्या मातृवत व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने निकम कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला असून परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
नरेश निकम हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे. शहरातील गंगशेट्टीवार मंगल कार्यालय परिसरात त्यांनी काही महिन्यांपूर्वी ‘वऱ्हाडी तडका’ हे रेस्टॉरंटही सुरू केले होते. त्यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी निकम कुटुंबीयांच्या भेटी घेऊन त्यांचे सांत्वन केले.
तारा निकम यांच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दि. १२ जून रोजी सकाळी १० वाजता यवतमाळ येथील निकम परिवाराच्या राहत्या घरून निघणार असून, मोक्षधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
तारा निकम यांच्या निधनाने एक प्रेमळ आई, कर्तव्यदक्ष गृहिणी आणि संस्कारांची सावली हरपल्याची भावना व्यक्त होत असून त्यांच्या स्मृतींना परिसरातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. 🌹🕯️

No comments: