Latest News

Latest News
Loading...

गंभीर गुन्हा घडविण्याच्या उद्देशाने सत्तूर घेऊन फिरणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात

प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरातील रंगारीपुरा परिसरात गस्त घालणाऱ्या पोलिसांनी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्र (सत्तूर) जवळ बाळगणाऱ्या युवकाला मोठ्या शिताफीने अटक केली. महेश रमेश मोहबिया (३५) असे परिसरात शस्त्र घेऊन वावरतांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई १५ जूनला करण्यात आली. 

ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या आदेशानुसार शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता गस्त घालणाऱ्या पोलिसांना रंगारीपुरा परिसरात सार्वजनिक ठिकाणी एक युवक संशयास्पद स्थितीत वावरतांना दिसला. पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने त्याचे नाव महेश रमेश मोहबिया असे सांगितले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ धारदार लोखंडी सत्तूर आढळून आला. पोलिसांनी त्याच्या जवळील सत्तूर जप्त करून त्याला अटक केली. 

सार्वजनिक ठिकाणी सत्तूर घेऊन फिरणारा हा युवक एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला, आणि पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपीचा गंभीर गुन्हा घडविण्याचा उद्देश हाणून पाडण्यात आला. पोलिसांनी बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या महेश मोहबिया याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.

ही कारवाई ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय कपिल पाटील, पीएसआय साजिद सय्यद, पोहेकॉ. गजानन सावसाकडे, नापोकॉ. विशाल राठोड, पोकॉ. आकाश अवचारे, मोनेश्वर खंडरे, गणेश मेश्राम, नंदकुमार पप्पूलवार यांनी केली.   

No comments:

Powered by Blogger.