Latest News

Latest News
Loading...

योगमय झाली वणी; आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंग योगा ग्रुप व पतंजली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे रविवारी योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. निरोगी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्याचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात शेकडो योगसाधकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रसंगी वणी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा विद्या आत्राम तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या मंगला पावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात योग प्रशिक्षक म्हणून संजय आस्कर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी योगाच्या आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार हात-पायांचे सूक्ष्म व्यायाम, विविध आसने तसेच पोट व पाठीसाठी उपयुक्त योगक्रिया करून घेतल्या. बदलत्या जीवनशैलीत योगाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यासाद्वारे रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि निरोगी जीवन जगणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जयंत सोनटक्के, किरण दिकुंडवार, अरुण डवरे, आरती नागतुरे, कुंदा सावसागळे, ज्योती लांडे आणि भारती आवारी यांनीही योगप्रात्यक्षिकांमध्ये सहकार्य केले. उपस्थित योगसाधकांनी विविध योगासने आणि प्राणायामाचा सराव करत आरोग्यदायी जीवनाचा संकल्प केला.

कार्यक्रमासाठी आवश्यक सर्व नियोजन आणि व्यवस्था दीपक दिकुंडवार, श्रीकांत गारघाटे, उमाकांत गधारे, सुभाष बिलोरिया, योगेश गोवारदीपे, कैलास लांजेवार, सुरेश देवकर, नितीन आवारी, सुनील बोर्डे, अमोल कळसकर, अशोक पोटदुखे, जयपाल गौरकर, सतीश मेळावार, अनिता गौरकर, अल्का गिन्नलवार आणि भावना जोगी यांनी केली. तसेच पतंजली परिवार आणि छत्रपती शिवाजी महाराज मॉर्निंग ग्रुपच्या सर्व योगसाधकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन युवा भारत वणी तालुका अध्यक्ष दीपक दिकुंडवार यांनी केले. तर जयंत सोनटक्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

योग, प्राणायाम आणि आरोग्याचा संदेश देणारा हा योग महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
 

No comments:

Powered by Blogger.