Latest News

Latest News
Loading...

सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीची यशाची परंपरा कायम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शैक्षणिक गुणवत्तेची ओळख बनलेल्या वणी येथील सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या डिप्लोमा इन फार्मसी (डी. फार्मसी) परीक्षेच्या निकालात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विशेष म्हणजे प्रथम वर्षाचा निकाल ९२.५९ टक्के, तर द्वितीय वर्षाचा निकाल ९५.४५ टक्के लागल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

फार्मसी शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणाऱ्या या महाविद्यालयाने गेल्या काही वर्षांत सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा जपली आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी त्याच विश्वासाला सार्थ ठरवत गुणवत्तेची चमक दाखविली.

डी. फार्मसी प्रथम वर्षाच्या परीक्षेत तुषार भगवानदास तरुणा याने ७०.९० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. समीक्षा बंडू परचाके हिने ६५.६० टक्के गुणांसह द्वितीय, तर पूनम गिरी हिने ६३.८० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

द्वितीय वर्षाच्या परीक्षेत शिवानी सुभाष अवथारे हिने ७२.३६ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. रुपाली संजय मिलमिले हिने ७०.०९ टक्के गुणांसह द्वितीय, तर रुपाली विलास पावडे हिने ६५.४६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला.

महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालामागे संस्थेची शिस्तबद्ध शिक्षणपद्धती, अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन, नियमित प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांवर घेतली जाणारी वैयक्तिक मेहनत कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्यंत स्पर्धात्मक वातावरणात मिळविलेले हे यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बोनगिनवार, उपाध्यक्ष मोहन बोनगिनवार, प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे. संस्थेकडून मिळालेले योग्य मार्गदर्शन, शैक्षणिक सुविधा आणि सकारात्मक वातावरण यामुळेच हे यश संपादन करता आल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, पालक तसेच वणी परिसरातील नागरिकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. निकालातील सातत्यपूर्ण यशामुळे सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीने परिसरातील गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांमध्ये आपले वेगळे स्थान अधिक भक्कम केले आहे.

No comments:

Powered by Blogger.