Latest News

Latest News
Loading...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लढवय्या नेते राजूभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस, अभीष्टचिंतनाने होणार साजरा

प्रशांत चंदनखेडे वणी :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षनेते राजूभाऊ उंबरकर यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा !

मनसेचे लढवय्या नेते म्हणून राजूभाऊ उंबरकर यांची जनमानसांत ओळख आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव आवाज उठवला. शेतकरी व कष्टकऱ्यांचे प्रश्न उचलून धरले. कामगार व बेरोजगारांच्या हक्कांसाठी ते लढले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तर गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी त्यांनी हातभार लावला. गरजू गरिबांना नेहमी सढळ हाताने मदत केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्याची परंपरा त्यांनी जपली. तरुणाईसह शहरातील नागरिकांना आनंद साजरा करता यावा याकरिता मोठमोठे सोहळे त्यांनी आयोजित केले. कित्येक मोठ्या सेलिब्रेटींची त्यांनी शहरवासीयांना भेट घडवून दिली. सण उत्सवात शहरवासीयांना आनंदाची पर्वणी मिळावी या उद्देशाने आजही ते भव्य दिव्य महोत्सव आयोजित करतांना दिसतात. 
सदैव जनसेवेसाठी समर्पित असणाऱ्या या नेत्याकडे आजही नागरिक हक्काने धाव घेतात. आपल्या समस्या मांडतात, व्यथा सांगतात आणि हक्क देखील गाजवतात. नागरिकांच्या समस्या आणि राजूभाऊ मैदानात उतरू नये, असं कधीच झालं नाही. वणी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांचा बुलंद आवाज म्हणजेच राजूभाऊ उंबरकर ही आता व्याख्याच झाली आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांना घेऊन डरकाळी फोडणारा वाघ म्हणजेच राजूभाऊ उंबरकर. या लढवय्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे. जनसेवेचा ध्यास घेतलेल्या या लोकनेत्याला वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !

शुभेच्छुक :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं निष्ठावंत व धडाडीचं युवा नेतृत्व तथा तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते वणी विधानसभा क्षेत्र 

No comments:

Powered by Blogger.