Latest News

Latest News
Loading...

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात; न्यू झुंबा योगा ग्रुपचा प्रेरणादायी उपक्रम


प्रशांत चंदनखेडे वणी :-

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वणी येथील न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने दिनदयाल पार्क येथे रविवारी (२१ जून) उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विजया देहेकर यांनी योगाचे महत्त्व आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रुपच्या प्रमुख किरण नळे यांनी योग, मानसिक आरोग्य, शारीरिक तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैली यावर सविस्तर मार्गदर्शन करत नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित केले.
घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभाग नोंदविला. एकसमान ड्रेस कोडमध्ये महिलांनी सादर केलेल्या विविध योगासनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या शिस्तबद्ध आणि आकर्षक सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.

न्यू झुंबा योगा ग्रुपच्या वतीने वर्षभर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रबोधनात्मक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात. महिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, सामाजिक जागरूकता आणि सकारात्मक जीवनमूल्यांची जपणूक व्हावी, या उद्देशाने हा समूह सातत्याने कार्यरत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावना पोटदुखे, उमदा शेंडे यांच्यासह ग्रुपमधील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. योग दिनाच्या निमित्ताने निरोगी जीवनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

No comments:

Powered by Blogger.