Latest News

Latest News
Loading...

उन्हा-पावसात राबणाऱ्या श्रमिकांना शिवसेनेची साथ; शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छत्री वाटप


प्रशांत चंदनखेडे वणी :-

राजकीय वाढदिवस केवळ बॅनरबाजी आणि शुभेच्छांपुरते मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरे करण्याचा आदर्श वणीत पाहायला मिळाला. शिवसेनाप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संजय देरकर यांच्या पुढाकारातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शहरातील फळ व भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. उन्हाची तिव्रता आणि पावसाच्या सरींमध्ये दिवसभर रस्त्यावर कष्ट करणाऱ्या श्रमिकांना या उपक्रमातून प्रत्यक्ष उपयोगी ठरणारी भेट देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
वणी शहरातील विविध भागांमध्ये रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना छत्र्यांचे वितरण करताना आमदार संजय देरकर यांनी श्रमिकांच्या कष्टाचा सन्मान करणे हीच उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाची खरी भेट असल्याची भावना व्यक्त केली. समाजातील कष्टकरी घटकांच्या पाठीशी उभे राहणे ही शिवसेनेची परंपरा असून, वाढदिवस समाजहिताच्या उपक्रमातून साजरे करण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे फळ व भाजी विक्रेत्यांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात व्यवसाय करताना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक विक्रेत्यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत आमदार संजय देरकर आणि शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांचे आभार मानले. "शुभेच्छांपेक्षा उपयोगी भेट महत्त्वाची," अशी भावना अनेकांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी संजय निखाडे, गणपत लेडांगे, सुनील कातकडे, विनोद ढुमणे, शरद ठाकरे, संतोष कुचनकर, किशोर गोहकर, राजीव पाटील, अजय चन्ने, अजय धोबे, अनिकेत बदखल, गुलाम रंगरेज, शत्रुघ्न मालेकर, महेश सोमलकर, मनोरंजन ढुमणे, प्रकाश कराड, लोकेश्वर बोबडे, कुंदन टोंगे, राहुल कोलते, गंगाधर परचाके, पिरमल अँड्रवर, गणेश जुनगरी, सचिन पाटील, राजीव गोलाईत, संतोष बदखल, अनिकेत काकडे, सुभाष भोगेकर, टिकाराम खाडे, संजय देठे, भगवान मोहिते, सुधाकर उपरे, योगिता मोहोळ, सुरेखा ढेंगळे, सविता आवारी, सुनंदा गुहे, प्रभा आसेकर, वैशाली देठे, गीता उपरे, कीर्ती देशकर, सीमा बालगोणी, चंदा मून, कांचन देरकर, प्रणाली देऊळकर, अलका कुचनकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.