Latest News

Latest News
Loading...

दिर-वहिनीच्या नात्याचे भान विसरून घाणेरडी भाषा वापरणाऱ्या दीरावर गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

स्वतःच्या वहिनीबाबत अश्लील शब्दप्रयोग करतांनाच तिला व तिच्या पतीला बकऱ्यासारखे कापून टाकण्याची उघड धमकी देणाऱ्या चुलत दिराविरुद्ध वाहिनीने पाटण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. वहिणीबद्दल घाणेरड्या शब्दांत व तिला लज्जा निर्माण होईल असे वक्तव्य करणाऱ्या दिरावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माझ्या बायकोचे नाव नंदा व तुझे सुनंदा, दोघींचीही नावे सारखीच असल्याने तू माझी बायकोच झाली, असे वहिनीबद्दल घाण शब्द वापरणारा चुलत दिर, हा दिर व वहिनीच्या नात्याचेही भान विसरला. पती पत्नीला संपविण्याची भाषा करणाऱ्या चुलत दिराने कुटुंबात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या पासून आमच्या जीविताला धोका असल्याचे वहिनीने तक्रारीत म्हटले आहे.

पाटण पोलीस स्टेशनतर्गत येणाऱ्या शिबला येथे पतीसह राहणाऱ्या सुनंदा (५७) यांच्या घराशेजारी त्यांचा चुलत दिर नितीन राजू नैताम (४५) हा परिवारासह राहतो. नितीन हा दारू पिण्याच्या सवयीचा असून तो शुल्लक कारणावरून नेहमी सुनंदा व त्यांच्या पतीशी वाद घालतो. ८ जुलैला रात्री ९.३० वाजता सुनंदा व त्यांचे पती घरी असतांना नितीन हा हातात दांडा घेऊन आंतर वस्त्रावर त्यांच्या घासमोरील सार्वजनिक रस्त्यावर आला व अपशब्दांत त्यांना जोरजोरात शिवीगाळ करू लागला. एवढेच नाही तर तो दिर व वहिनीच्या नात्याचे भान विसरून घाणेरडे शब्द वापरू लागला. दोघांनाही बकऱ्यासारखे कापून टाकण्याची भाषा करू लागला. मात्र दारूच्या नशेत बरळणाऱ्या नितिनकडे त्यावेळी सुनंदा यांनी दुर्लक्ष केले. 

परंतु त्यानंतर त्याची हिम्मत आणखीच वाढली. १० जुलैला परत त्याने तोच प्रकार केला. त्याच्या भावाच्या बैलबंडीवर पाण्याचा ड्रम का ठेवला या कारणावरून त्याने परत वहिनीला अश्लील शिवीगाळ सुरु केली. आपल्याच वहिनीबद्दल त्याने अत्यंत घाणेरडी भाषा वापरल्याने वहिनीला अपमानित झाल्यासारखे वाटले. तसेच त्याने दोघाही नवराबायकोला एखाद्या दिवशी चाकूने कापून टाकतो, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या या राक्षसी कृत्याने भयभीत झालेल्या वहिनीने नंतर पोलीस स्टेशनला धाव घेत रीतसर तक्रार नोंदविली. दारूच्या सवयीचा असलेला व वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देणारा चुलत दिर कधी काय करेल याचा भरवसा नसल्याने त्याच्या पासून आमच्या जीवाला धोका असल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत नमूद केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीन नैताम याच्यावर बीएनएसच्या कलम २९६, ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.