Latest News

Latest News
Loading...

मालगाडीच्या धडकेत तरुणाचा पाय तुटला, गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी :-

वणी रेल्वे स्टेशन परिसरात मालगाडीच्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय धडावेगळा झाल्याची धक्कादायक घटना सोमवार १३ जुलैला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास घडली. रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला, की तरुणाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस व शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी तरुणाला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलविले. पुढील उपचारासाठी त्याला नागपूर येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

मुळचा नायगाव (बु.) येथील रहिवाशी असलेला श्रीकांत नानाजी झाडे (३९) हा सध्या मोहदा येथे वास्तव्यास आहे. त्याला वडील नसून तो आपल्या आई सोबत राहतो. सोमवारी रात्री रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वेने दिलेल्या धडकेत तो गंभीर जखमी झाला. रेल्वे अभियंता कार्यालयाजवळ हा अपघात घडला. हा तरुण रेल्वेखाली आल्याने त्याचा पाय शरीरापासून वेगळा झाला. गुडघ्यापासून पाय तुटल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला गंभीर अवस्थेत उपचारार्थ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. रेल्वे रूळ ओलांडताना हा अपघात घडला, की तरुणाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

तरुण रेल्वेखाली आल्याचे लक्षात येताच स्टेशन मास्टर व स्टेशन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर ही माहिती रेल्वे पोलीस व शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जखमी तरुणाला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता नागपूर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.  

No comments:

Powered by Blogger.