महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इरशाद खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🥀🥀
शुभेच्छुक :- अनिस सलाट, धनंजय त्र्यंबके तथा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना वणी विधानसभा क्षेत्र
राजकारणात पदापेक्षा जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहण्याला महत्त्व देणारे युवा नेतृत्व म्हणून इरशाद खान यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले इरशाद खान सध्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
पक्षसंघटना मजबूत करण्यासोबतच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने आक्रमक भूमिका घेताना दिसतात. फेरीवाले व लघु व्यावसायिकांवरील अन्याय, शहरातील वाहतूक कोंडी, अवजड वाहतूक, वेकोलिची कोळसा वाहतूक तसेच नियमबाह्य स्कूल बस वाहतुकीविरोधात त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
‘प्रश्न कोणाचाही असो, आवाज उठवायचा’ या भूमिकेतून काम करणाऱ्या इरशाद खान यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिले. स्कूल बसची क्षमता, फिटनेस, चालकांचे परवाने आणि सुरक्षाव्यवस्थेबाबत त्यांनी वेळोवेळी तक्रारी करून प्रशासनाला जाब विचारला.
पक्षनिष्ठा, आक्रमक कार्यशैली आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठीचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ही त्यांच्या राजकीय वाटचालीची वैशिष्ट्ये ठरत आहेत. तडफदार युवा नेतृत्व म्हणून पुढे येणाऱ्या इरशाद खान यांचा आज वाढदिवस. त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीस उदंड यश लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!


No comments: