Latest News

Latest News
Loading...

मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड; पोलिसांना पाहताच काही जण पसार

प्रशांत चंदनखेडे वणी :-

मुकुटबन-वणी डांबरी मार्गावरील सितारा बार परिसरात सुरू असलेल्या वरळी मटका जुगारावर मुकुटबन पोलिसांनी छापा टाकून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ हजार ७१० रुपये रोख, मटका पट्टी-बुक, चिठ्ठी, कार्बनचा तुकडा व पेन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी पोलीस पथकाने सितारा बार परिसरात ही कारवाई केली. याठिकाणी मटका अड्डा सुरू असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना पाहताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. तर मटका पट्टी फाडणारा तरुण पोलिसांना रंगेहात सापडला.

या कारवाईत शुभम रघुनाथ पारशीवे (२८, रा. मुकुटबन) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत रोख रक्कम व घटनास्थळी मटका साहित्य आढळून आले. पोलिसांनी मटका पट्टी फडणाऱ्या तरुणाजवळून रोख १७१० रुपये व मटका साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पोयाम यांच्या फिर्यादीवरून शुभम पारशीवे याच्याविरुद्ध कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.