Latest News

Latest News
Loading...

दिला शब्द, केला पूर्ण! बाबापूरचा शुद्ध पाण्याचा प्रश्न अखेर मार्गी


प्रशांत चंदनखेडे वणी :-

शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे कॅनच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या बाबापूर ग्रामस्थांची समस्या अखेर मार्गी लागली आहे. गावकऱ्यांनी मागील वर्षी केलेल्या मागणीची दखल घेत आमदार संजय देरकर यांच्या स्थानिक विकास निधीतून गावात आरओ जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. या यंत्राचे लोकार्पण करण्यात आल्याने ग्रामस्थांना आता गावातच शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.

बाबापूर येथील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी यापूर्वी कायर येथून पाण्याचे कॅन आणावे लागत होते. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्यात तसेच दैनंदिन वापरासाठी नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. गावकऱ्यांनी ही समस्या दूर करण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्राची मागणी केली होती. या मागणीचा पाठपुरावा करत आमदार देरकर यांच्या निधीतून आरओ यंत्र उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची धावपळ थांबणार आहे.

मूलभूत सुविधांपैकी एक असलेल्या शुद्ध पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन आरओ यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे बाबापूर ग्रामस्थांना स्थानिक पातळीवर शुद्ध पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मागणी पूर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार संजय देरकर यांचे आभार मानले.

यावेळी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात सरपंच भारती डाहुले, संपर्कप्रमुख अनिल आगळे, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, सहसंपर्कप्रमुख संतोष माहूरे, महिला जिल्हाप्रमुख डिम टोंगे, किरणताई देरकर, गणपत लेडांगे, युवासेना जिल्हाप्रमुख समीर लेंगुळे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, वणी तालुकाप्रमुख संतोष कुचनकर, मारेगाव तालुकाप्रमुख व माजी सभापती अनिल राजुरकर, चिखलगावच्या सरपंच रुपाली कातकडे, उपजिल्हाप्रमुख कुंदन टोंगे, गौतम सुराणा, मधुकर लांडे, गीता उपरे, सुरेखा ढेंगळे, सविता आवारी, पुडलिक पिंपळशेंडे, बंडू पारखी यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

गावकऱ्यांनी केलेली मागणी प्रत्यक्षात उतरल्याने बाबापूरमध्ये समाधानाचे वातावरण असून, ‘दिला शब्द, केला पूर्ण’ या चर्चेने लोकार्पण सोहळ्याला विशेष रंगत आली.

No comments:

Powered by Blogger.