भारतमाता चौक ते गणेशपूर घाट काँक्रेट रस्त्याच्या बांधकामात अनियमितता, धीरज पाते यांनी केली तक्रार

प्रशांत चंदनखेडे वणी शहरातील भारतमाता चौक ते गणेशपूर घाट काँक्रेट रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून शिवनेरी चौकातील चौफुलीवर मागील तीन ते चार महिन्यापासून काँक्रेट अप्रौचबाबत कंत्राटदाराला सांगूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याची लेखी तक्रार माजी नगर सेवक धीरज पाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. रोडच्या बाजूला असलेली नालीही सताड खुली असून नालीवर चेंबर देखील बसविण्यात आले नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. . शहरात रस्ते विकासाकरिता आलेल्या निधीतून काँक्रेट रस्त्यांचे बांधकाम केले जात असले तरी रस्ते बांधकामात अनियमितता आढळून येत आहे. सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करतांना त्याची गुणवत्ता तपासली जात नसल्याने निकृष्ठ दर्जाचे रस्ते तयार होतांना दिसत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यांचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. भारतमाता चौक ते गणेशपूर घाट पर्यंतच्या काँक्रेट रस्त्याचे अर्धवट बांधकाम करण्यात आल्याची तक्रार स्वतः माजी नगर सेवकाने केली आहे. रस्त्याची विकासकामे हाती घेण्यात आली असली तरी रस्त्याच्या बा...