खळबळजनक... अज्ञात माथेफिरुने घरासमोर उभे असलेले वाहन पेटविले, माजी नगर सेवक राजू तुराणकर यांच्या घरासमोरील घटना

प्रशांत चंदनखेडे वणी शहरातील प्रगती नगर येथे घरासमोर उभे असलेले बुलेरो वाहन अज्ञात माथेफिरुने आग लावून पेटविल्याची खळबळजनक घटना आज ३० एप्रिलला पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शिवसेनेचे माजी शहर प्रमुख तथा माजी नगर सेवक राजू तुराणकर यांच्या मालकीचे हे बुलेरो वाहन असून त्यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या या वाहनाला अज्ञात माथेफिरुने आग लावून पेटविल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला आहे. या घटनेमुळे शहरात ना-ना विध चर्चांना उधाण आले आहे. प्रगती नगर येथे वास्तव्यास असलेल्या राजू तुराणकर यांच्याकडे दोन बुलेरो वाहने असून ही दोन्ही वाहने रात्रीला घरासमोरच उभी असतात. कौटुंबिक प्रवासाकरिता या वाहनांचा वापर केला जातो. काल स्वतः राजू तुराणकर हे काही कामानिमित्त MH ३१ CS ७९०० क्रमांकाच्या बुलेरो वाहनाने यवतमाळला गेले होते. रात्री उशिरा ते घरी परत आल्यानंतर त्यांनी नेहमी प्रमाणे घरासमोर बुलेरो वाहन उभे केले. आज पहाटे २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला वाहनामधून धूर निघतांना दिसला. वाहनान...