Posts

Showing posts from April, 2024

आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   रात्री झोपेत विषारी साप चावल्याने १४ महिण्याच्या बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० एप्रिलला पहाटे २ वाजताच्या सुमारास घडली. काव्या वैभव खेवले रा. टाकळी (कुंभा) ता. मारेगाव असे या सर्पदंशाने मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे.  सोमवारला रात्री आईच्या कुशीत झोपलेल्या चिमुकलीला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. आई नेहमी प्रमाणे आपल्या चिमुकल्या मुलीला जवळ घेऊन खाली झोपली होती. मध्यरात्री अचानक घरात साप शिरला. घरात शिरल्यानंतर सापाने जमिनीवर झोपून असलेल्या बालिकेच्या पायाला चावा घेतला. सापाने चावा घेताच चिमुकली जोरजोरात रडायला लागली. तिच्या रडण्याच्या आवाजाने आई झोपेतून खडबडून जागी झाली. ती आपल्या चिमुकलीला शांत करण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तिला बिछान्याजवळून साप जातांना दिसला. सापाला पाहून आईने प्रचंड आरडाओरड केली. तिची आरडाओरड ऐकून शेजारी धावून आले. शेजाऱ्यांनी सापाला पकडतांनाच चिमुकलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार मिळण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रात्री आईला कवटाळून झोपलेल्या चिमुकलीचा असा हा दुर्दैवी मृत्यू झाल...

योगेश ट्रेडर्स या सिमेंट स्टील गोदामात दरोडा टाकून करण्यात आली रखवालदाराची निर्घृण हत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्याजवळ असलेल्या योगेश ट्रेडर्स या सिमेंट स्टील गोदामात अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकून तेथे तैनात असलेल्या रखवालदाराचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना आज २९ एप्रिलला सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. रात्री ११ वाजता नंतर दरोडेखोरांनी गोदामात दरोडा टाकून रखवालदाराचा खून केल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. जीवन विठ्ठल झाडे (६२) रा, आष्टोना ता. राळेगाव असे या दरोडेखोरांनी हत्या केलेल्या रखवालदाराचे नाव आहे. दरोडेखोरांनी गोदामाच्या आवारात ठेऊन असलेली २४० किलो वजनाची चार सलाखीची बंडलं चोरी केल्याचे सांगण्यात येते. परंतु गोदामातून मोठ्या प्रमाणात सळाखी चोरी गेल्याचे बोलल्या जात आहे.   लालपुलिया परिसरात पळसोनी फाट्याजवळ योगेश ट्रेडर्सचे सिमेंट स्टील गोदाम आहे. सुरेश खिवंसरा यांच्या मालकीचे हे गोदाम असून येथे मोठ्या प्रमाणात लोखंडी सलाखीचा साठा करून ठेवण्यात आला आहे. मुख्य मार्गाच्या बाजूलाच हे गोदाम असलं तरी व्यावसायिक बाजारपेठ व लोक वस्ती पासून ते लांब आहे. रात्री हा भाग अतिशय सुनसान होतो. जिकडे तिकडे काळोख पसरलेला असतो...

राजूर (कॉ.) येथील तरुणाने पाटाळा येथील तरुणावर केला जीवघेणा हल्ला, सुरीने केले सपासप वार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर सुरीने हल्ला चढविण्यात आल्याची घटना २६ एप्रिललला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. सुरीचे सपासप वार करण्यात आल्याने तरुणाचं पोट फाटलं असून पोटातील आतडे बाहेर निघाल्याने अत्यवस्थ स्थितीत त्याला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून निर्दयीपणे सुरीचे वार करण्यात आल्याने बघणाऱ्यांच्याही अंगाचा थरकाप उडाला होता. तरुणावर अमानुषपणे सुरीचे वार करण्यात आल्याचे पाहून पोलिसांनी क्रूरतेचा कळस गाठलेल्या या नराधमाला अवघ्या काही तासांतच अटक केली. या घटनेला वेगळ्याच वादाची किनार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. माजरी पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पाटाळा येथील रहिवाशी असलेल्या तरुणावर राजूर (कॉ.) येथील तरुणाने प्राणघातक हल्ला केल्याने त्यांच्यातील नेमका टोकाचा वाद कुठला हा प्रश्न निर्माण झाला आहे.  चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाटाळा गावातील रहिवासी असलेल्या धीरज घानवडे (२४) याच्यावर राजूर (कॉ.) ता. वणी जि. यवतमाळ येथील रहिवाशी असलेल्या वेदांत शांताराम हिकरे (२२)...

राजूर (कॉ.) येथील दीक्षा भूमीवर साजरा होणार ६८ वा धम्म दीक्षा सोहळा, विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं करण्यात आलं आयोजन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या उत्थानासाठी दिलेला लढा व सामाजिक समानतेसाठी केलेल्या संघर्षाची जाणीव ठेऊन राजूर या क्रांतिभूमीत त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेत त्यांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवण्याचं उत्तरदायित्व सतत जोपासलं जात आहे. बाबासाहेबांनी समतेसाठी केलेल्या क्रांतीचा वारसा राजूर या गावाने चळवळीच्या माध्यमातून पुढे नेला आहे. आणि म्हणूनच राजूर या गावाला चळवळीचं गाव म्हणून ओळखलं जातं. बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर नागपूर येथे लाखो अनुयांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. आणि येथूनच परिवर्तनाची लाट सुरु झाली. जागतिक पातळीवरही या क्रांतीचा आवाज गुंजला. या धम्म दीक्षेचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली दीक्षाभूमी विश्वविख्यात ठरली आहे. बाबासाहेबांनी नागपूर व चंद्रपूर नंतर राजूर या गावाची धम्म दिक्षेसाठी निवड केली होती. पण त्यांच्या प्रकृतीने त्यांची साथ दिली नाही. पण त्यांनीं ठरविलेलं उद्दिष्ट मात्र पूर्ण झालं. २८ एप्रिल १९५७ ला बाबासाहेबांचे विश्वासू बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत भदंत आनंद ...

वीटभट्टा मालक व मजुरात तुफान हाणामारी, चाकू हल्ल्यात अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी, दोघांच्याही परस्परविरोधी तक्रारी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील खडबडा मोहल्ला येथे वीटभट्टा मालक व मजुरात झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले. शेजारी राहणाऱ्या दोन कटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. यात एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याबाबत दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्याने पोलिसांनी ४ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. ही घटना २० एप्रिलला सायंकाळी ५.१५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती डीबी पथकाला मिळताच डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत आरोपींना अटक केली.  या प्रकरणी पहिली तक्रार राहुल खेमराज मेश्राम (४०) रा. खडबडा मोहल्ला याने नोंदविली. त्याच्या तक्रारी नुसार त्याचा याच परिसरात वीटभट्टा आहे. त्याच्या घराशेजारी अनिल विनायक येमूलवार (२५) हा राहत असून तो राहुल मेश्राम याच्या वीटभट्यावर काम करतो. १५ दिवसांपूर्वी अनिलने राहुलचा भाऊ भूषण याच्याकडून ४ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने कामावर येणे बंद केले. अनिल कामावर येत नसल्याने भूषण २० एप्रिलला सकाळी १० वाजता अनिलच्या घरी गेला. त्याने अनिलला कामावर का येत नाही अशी विचारणा केली असता त्याने कामावरही येत न...

शहरातील आणखी एका युवकाने गळफास घेऊन केला जीवनाचा शेवट

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहर व तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच असून सतत होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. शहरात काल आणखी एका युवकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दामले फैल येथे राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मनोज भाऊराव उंदीरवाडे (३६) असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. २३ एप्रिलला दुपारी २ वाजताच्या सुमारास मनोज हा घरातच गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला.  तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले असून नैराश्येतून युवक आत्महत्या करू लागले आहेत. शहरातील दामले फैल येथे परिवारासह राहत असलेल्या मनोज उंदीरवाडे या युवकाने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. घराच्या आड्याला दोरीने गळफास लावून त्याने आपल्या जीवनाचा शेवट केला. वडिलांच्या घराशेजारीच त्याचं वास्तव्य होतं. काल २३ एप्रिलला मनोज हा त्याच्या मोठ्या मुलाला घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने ही माहिती आपल्या आजोबाला दिली. आजोबांनी लगेच घराकडे धाव घेतली. त्यांनी घरात जाऊन बघितले असता त्यांना मनोज हा घराच्या लाकडी फाट्याला दोरीने लटकलेल्...

रखरखत्या उन्हातही मतदारांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, चंद्रपूर लोकसभा मतदार संघात झाले ६७.५७ टक्के मतदान

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शासनाकडून देशात मतदार जनजागृती करण्यात आली. तसेच प्रशासनाच्या वतीनेही मतदार संघात जनजागृती मोहीम राबविण्यात आली  मतदारांनी जास्तीतजास्त संख्येने मतदान करावे, याकरिता मतदारांना प्रोत्साहित करण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी या लोकसभा क्षेत्राचा देखील समावेश होता. १९ एप्रिलला चंद्रपूर लोकसभा मतदार संघासाठी मतदान घेण्यात आले. मतदारांनी तळपत्या उन्हातही उत्स्फूर्तपणे मतदान केले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी पहायला मिळाली. शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांचाही तगडा बंदोबस्त होता. मतदान प्रक्रिया सुरु असतांना प्रशासनही अलर्ट होते. प्रत्येक मतदान केंद्रावर जल सुविधा करण्यात आली होती. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण ६७.५७ टक्के एवढे मतदान झाले. यात वणी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७३.२४ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यातही ...

१८ लाख ३६ हजार मतदार ठरवतील १५ उमेदवारांच भाग्य, चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत कुणाला मिळेल मतदारांचा कौल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  केंद्रातील विद्यमान सरकारचा कार्यकाळ संपल्याने पुढील पाच वर्ष देशाच्या राजकारणाची सूत्रे कुणाच्या हातात द्यायची व कुणाला सरकार स्थापन करण्याची संधी द्यायची, हे ठरविण्याची जबाबदारी परत एकदा लोकसभा निवडणुकीच्या रूपाने जनतेवर आली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचाराने अंतिम टप्पा गाठला आहे. १७ एप्रिल हा जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असून १८ एप्रिल पासून प्रचार तोफा थंडावणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील पाच मतदार संघाची निवडणूक होणार असून यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचाही समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, वंचितचे राजेश बेले व बसपचे राजेंद्र रामटेके यांचा समावेश आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, वणी व आर्णी या विधानसभा क्षेत्रां...

आंघोळीला गेलेल्या महिलेचा स्नानगृहातच झाला अचानक मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील एका विवाहित महिलेचा अनपेक्षितपणे अचानक मृत्यू झाला. ही व्ह्रदयद्रावक घटना काल १६ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अश्विनी प्रशांत सालूरकर (३२) असे या अकाली व अचानक निधन झालेल्या महिलेचे नाव आहे. घरातील सर्व कामे आटपून ही महिला स्नानगृहात आंघोळीकरिता गेली. आणि तेथेच तिच्यावर काळाने झडप घातली. कुठलाही आजार किंवा दुखणं नसतांना आंघोळीकरिता गेलेली महिला अचानक मृत्युमुखी पडल्याने कुतुटूंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. अगदी काही वेळापर्यंत कुटुंबियांसोबत गप्पा गोष्टी करीत असलेली व कुटुंबाच्या डोळ्यासमोर वावरत असलेली अश्विनी काही क्षणातच सर्वांना सोडून निघून गेल्याने कुटुंबियांना दुःखं अनावर झालं आहे. तिचा अचानक झालेला मृत्यू सर्वांनाच चटका लावून गेला आहे. सुस्वभावी, मनमिळाऊ व सर्वांशी जुळवून घेणारी अश्विनी कुटुंबात हसतमुखाने नांदायची. पण नियतीने डाव साधून तिला कुटुंबापासून कायमचं हिरावून घेतलं. आणि अख्ख कुटुंबच तिच्या मायेला पोरकं झालं आहे. पती विरह योगाने विव्हळत आहे. तर चिमुकल्यांचे अश्रू थांबता थांबत नाही. सासू सासऱ्यांच...

राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यावर डीबी पथकाची कार्यवाही, मटकापट्टी फाडणारा अटकेत

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) येथे मटका जुगार जोमात सुरु असल्याची माहिती ठाणेदार अनिल बेहेरानी यांना मिळताच त्यांनी डीबी पथकाला राजूर (कॉ.) येथील मटका अड्ड्यांवर कार्यवाही कारण्याचे आदेश दिले. डीबी पथकाने राजूर (कॉ.) येथे सुरु असलेल्या मटका अड्ड्यांबाबत माहिती मिळवून भगतसिंग चौकातील गल्लीत सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच मटका जुगार खेळणारे पळत सुटले. पण मटका पट्टी फाडणारा मात्र डीबी पथकाच्या हाती लागला. डीबी पथकाने त्याला अटक करून त्याच्या जवळून रोख रक्कम व मटका जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. शैलेश भगवान मेश्राम (४८) रा. राजूर (कॉ.) असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मटका अड्ड्यावरील ही कार्यवाही १५ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता करण्यात आली.   राजूर (कॉ.) येथे अवैध धंदे फोफावले असून गल्लीबोळात मटका अड्डे व अवैध दारू विक्री सुरु असल्याची ओरड गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. मटक्याच्या आकड्यांवर पैशाचा जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मटका लावणारे अनेक जण कर्जबाजारी होऊन...

नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले, तेली फैल येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील तेली फैल येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १६ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. घरी कुणी नसतांना तरुणाने घराच्या हॉलमध्ये गळफास घेतला. तरुणाची चुलत बहीण त्याच्या घराकडे गेली असता तिला तरुण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने लगेच आपल्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. अक्षय सत्यवान चौधरी (२४) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून युवावर्ग नैराश्येतून आत्महत्या करू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरासह तालुक्यात आत्महत्यांचं सत्र सुरुच असून मानसिक खच्चीकरणातून युवक आत्महत्या करू लागले आहेत. एका पाठोपाठ एक होत असलेल्या आत्महत्यांमुळे तालुका हादरला आहे. आज आणखी एका वैफल्यग्रस्त तरुणाने आपली जीवनयात्रा संपविली. राहत्या घरीच त्याने गळफास घेतला. घराच्या हॉलच्या छताला असलेल्या लोखंडी हुकला दुपट्याने गळफास घेऊन अक्षय चौधरी या तरुणाने आत्महत्या केली. घराशेजारी राहणाऱ्या त्याच्या चुलत बहिणीला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती, आरोपीला पोलिसांनी केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील एका गावात घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोक्सो व विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून लग्नाच्या भूलथापा देऊन आरोपीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याने मुलीला गर्भधारणा झाली असून ती तीन महिन्यांची गर्भवती राहिली आहे. मुलगी गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला धाव घेतली. मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याबाबत ८ एप्रिलला पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. राजू कवडू मडचापे (३०) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून व तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणाने चार ते पाच महिने तिचं शारीरिक शोषण केलं. आरोपीने वारंवार मुलीशी शा...

देशवासीयांनी एकजुटीने साजरा करावा हा लोकशाहीचा उत्सव, आणि ठरवावी देशाच्या वाटचालीची पुढील दिशा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  लोकसभा निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याकरिता लोकांनी एकवटलं पाहिजे. संविधानाने दिलेला अधिकार जोपासला पाहिजे. प्रत्येकाने आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे. लोकशाही ही देशाची ताकद आहे. लोकांनी ही ताकद मतदानातून दाखवून दिली पाहिजे. आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाहीच्या या उत्सवाला सर्वांगीण रूप दिलं पाहिजे. विविध भाषा आणि वेगवेगळी वेशभूषा या आगळ्यावेगळ्या संस्कृतीने नटलेला हा आपला देश आहे. मानवी संकल्पना अंगिकारणारा हा देश असून आपुलकी व बंधुभावाने नांदणारी लोकशाही या देशाला मिळालेलं एक वरदान आहे. जनता ही सर्वोच्च असून लोकच या देशाचे सरकार आहेत. देशाचं राजकारणही लोकांभोवतीच फिरतं. देशाचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा हे ठरविण्याचा अधिकारही संविधानाने जनतेला दिला आहे. त्यामुळे लोकशाहीचा आधारस्तंभ असलेला मतदानाचा अधिकार सर्वांनीच बजावला पाहिजे, हा संदेश प्रशासनाकडून दिला जात आहे. प्रशासनानाने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली असून मतदारांना मतदान करण्यास प्रवृत्त करण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहे. जनते...

शिरपूर पोलिसांनी रोखली गोवंश जनावरांची तस्करी, ८ गोवंश जनावरांची केली सुटका

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील सैदाबाद शेत शिवारातून गोवंश जनावरांची होणारी तस्करी शिरपूर पोलिसांनी रोखली. गोवंश जनावरांना मालवाहू वाहनात निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या दोन आरोपींना शिरपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून ८ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. ही कार्यवाही ५ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास करण्यात आली. वणी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जाते.  कत्तलीकरिता जनावरे घेऊन जातांना तस्करांकडून विविध शक्कली लढविल्या जातात. सैदाबाद शेत शिवारातून मालवाहू पिकअप वाहनातून बैलांना कत्तली करीता घेऊन जाण्याच्या तयारीत असलेल्या तस्करांना शिरपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. तसेच त्यांच्या जवळून ४ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.  सैदाबाद शेत शिवारात एका मालवाहू पिकअप वाहनात गोवंश जनावरांना निर्दयीपणे कोंबून त्यांना कत्तली करीता नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्या ठिकाणी पोलिसांना एक मालवाहू पिकअप वा...

पटवारी कॉलनी येथे राहत्या घरी सशस्त्र दरोडा, दरोडेखोरांनी पावणे नऊ लाखांचा ऐवज लुटला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  सेवानिवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याच्या घरात सशस्त्र दरोडा टाकून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना ५ एप्रिलला पहाटे २.३० वाजताच्या सुमारास घडली. शहरालगत असलेल्या पटवारी कॉलनी परिसरातील दीनानाथ नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष वासुदेव पिदूरकर यांच्या राहत्या घरी ४ ते ५ सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला. कुटुंबं घरातच झोपलेलं असतांना घरात प्रवेश करून व शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी पावणे नऊ लाखांचा ऐवज लुटून नेला. या धाडसी दरोड्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.  पटवारी कॉलनी येथे परिवारासह राहत असलेले सुभाष पिदूरकर हे सेवानिवृत्त वेकोलि कर्मचारी आहेत. त्यांना चार मुली असून तीन मुलींचे लग्न झाले आहे. एक मुलगी व पती, पत्नी असे तीन जण पटवारी कॉलनी येथील घरी राहतात. रात्री कुटुंबातील सदस्य झोपी गेल्यानंतर पहाटे २.३० वाजताच्या सुमारास चार ते पाचच्या संख्येने असलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. घराचा दरवाजा तोडण्याच्या आवाजाने कुटुंबं झोपेतून खडबडून जागं झालं. कुटुंबीयांनी दरवाजाच्या दिशे...

गिट्टी खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  गिट्टी खाणीत कपडे धुण्याकरिता गेलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज ४ एप्रिलला दुपारी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. विद्या अनिल आडे (१५) रा. मोहदा असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या मुलीचे नाव आहे. गिट्टी खाणीत पाणी साचून तयार झालेल्या तळ्यात कपडे धुण्याकरीता गेलेल्या या मुलीचा पाय घराला, व ती पाण्यात बुडाली. मोहदा गावालगत अनेक गिट्टी खाणी असून काही खाणीतील उत्खनन बंद झाल्याने या खाणींमध्ये पाणी साचून मोठंमोठे तळे तयार झाले आहेत. या गिट्टी खाणीत तयार झालेल्या तळ्यात परिसरातील महिला व मुली कपडे धुण्याकरिता जातात. ही मुलगी देखील कपडे धुण्याकरिता गेली होती. परंतु कपडे धुतांना तिचा पाय घसरला, व हा अनर्थ घडला.  मोहदा येथील रहिवासी असलेली विद्या ही नेहमी प्रमाणे कपडे धुण्याकरिता गिट्टी खाणीत गेली. खाणीत तयार झालेल्या तळ्यात कपडे धुत असतांना अचानक तिचा पाय घसरला, व ती तळ्यात पडली. बंद अवस्थेत असलेल्या या गिट्टी खाणीत प्रचंड पाणी भरले असून याठिकाणी मोठे तळे तयार झाले आहे. कपडे धुतांना विद्या पाय घसरून खाणीत पडली, व खोल डो...

विठ्ठलवाडीकडे जाणारा रस्ता बनला लॉनची पार्किंग, नगर पालिका व वाहतूक विभाग घेईल काय कार्यवाहीची तसदी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरातील विठ्ठलवाडीकडे जाणारा प्रमुख रस्ता नेहमी वाहनांनी वेढलेला असतो. रस्त्यावर नियमबाह्य पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने रहदारीला मोठे अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहने उभी करण्यासाठी, की रहदारीसाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरच लॉन व मॅरेज हॉल असल्याने लग्नसमारंभात येणारी वाहने पुरेशा पार्किंग व्यवस्थेअभावी रस्त्यावरच उभी केली जातात. त्यामुळे याठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. रस्त्यावर आडवी तिडवी वाहने उभी केली जात असल्याने येथे नेहमी वाहनांचा जाम लागताना दिसतो. एवढेच नाही तर रस्त्यावरच स्वयंपाकाचे भट्टे लावले जातात. लॉन समोर रस्त्यावर तासंतास लग्नवरातीचे नाचगाणे सुरु असते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. लॉन व मॅरेज हॉल उभारतांना व्यावसायिकाला पार्किंगची प्रशस्त व्यवस्था करण्याचे सोयसुतकच न राहिल्याने प्रमुख रस्ताच लग्नसमारंभात येणाऱ्या वाहनांची पार्किंग बनला आहे. त्यामुळे रहदारीला नेहमी अडथळे निर्माण होत असल्याने विठ्ठलवाडी परिसरातील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. नगरपालिका प्रशासन व...

दोन अल्पवयीन मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य, नराधमाला पोलिसांनी केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  घराशेजारी राहणाऱ्या दोन बालकांवर एका नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची संतापजनक घटना २ एप्रिलला उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बालकांशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या  नराधमाला अटक केली असून त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा नराधम बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचे कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.  शहरातील जत्रा मैदान परिसरातील ओमनगर येथे राहत असलेल्या एका ५६ वर्षीय नराधमाने घराशेजारी राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक कृत्य केले. १२ व १४ वर्षे वयोगटातील ही दोन्ही मुले आहे. आरोपीने त्यांना विविध प्रलोभने देऊन त्यांच्याशी जवळीक साधली. नंतर त्यांना आपल्या घरी बोलावून त्यांच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात त्याने मुलांसोबत वारंवार अनैसर्गिक कृत्य केले. मुलांना चॉकलेट व विविध प्रलोभने देऊन या नराधमाने सतत मुलांशी अनैसर्गिक कृत्य केल्याने मुलांच्या वागण्यात बदल जाणवू लागला. त्...

शाळेतुन बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलींचा पोलिसांनी शीघ्र लावला शोध, दोन आरोपींना केले गजाआड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनी शाळेच्या मधल्या सुट्टीत बाहेर फेरफटाका मारून येण्याच्या बहाण्याने शाळेबाहेर पडल्या. परंतु सायंकाळपर्यंत त्या परत न आल्याने मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली. मुलींना कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचाही संशय मुलींच्या पालकांनी तक्रारीतून व्यक्त केला. पालकांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून अल्पवयीन मुलींना पळवून नेणाऱ्या दोनही आरोपींना अवघ्या काही तासांतच अटक केली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून या दोनही मुलींना ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. तर त्यांना फूस लावून पळवून नेणाऱ्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही धडक कार्यवाही १ एप्रिलला करण्यात आली.  शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील दोन अल्पवयीन मुली तेथीलच एका शाळेतील विद्यार्थिनी असून त्या दोघी एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी देखील आहेत. ३० एप्रिलला त्या दोघी...

कोळसा डेपो मधील हजारो टन कोळसा झाला जळून राख, आगीची धग मात्र अजूनही कायम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया येथील एका कोळसा व्यावसायिकाच्या कोळशाच्या साठ्याला (कोलडेपो) आग लागून आगीत हजारो टन कोळसा जळून खाक झाला आहे. कोळशाला लागलेली आग अद्यापही शमली नसून आग विझविण्यात दिरंगाई होत असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आग विझविण्याचे काम अतिशय कासवगतीने सुरु असून कोळशाच्या ढिगाऱ्यातुन अजूनही आगीच्या ज्वाळा निघत असल्याने संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. धुळीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी एफसीआय नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कोलडेपोला आग लागली. कोलडेपो मधील कोळशाचा संपूर्ण साठाच आगीच्या भक्षस्थानी चढला. एवढेच नाही तर एक लोडर मशिनही आगीत जळाल्याचे सांगण्यात येत आहे. कोळशाच्या साठ्याला आग लागून सहा ते सात दिवस लोटले तरी आग पूर्णतः विझविण्यात आली नाही. कोलडेपो मालक आग विझविण्याची तसदी घ्यायला तयार नाही. त्यामुळे ही आग आता संशयाच्या घेऱ्यात आली आहे.  एफसीआय (फ्युल कॉर्पोरेशन इंडिया लि.) या कोलडेपोला धुळीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी अचानक आग लागली. कोलडेपोमध्ये साठवून असलेला अंदाजे १० हजार टन कोळसा आगीच्या भक्षस्थानी चढला. आगीत एक लोडर मशिनही ...