Posts

Showing posts from August, 2024

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना व युवासेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक या अभियानातंर्गत शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन असंख्य युवक शिवसेना व युवासेनेत प्रवेश घेऊ लागले आहेत. संजय देरकर यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केलं असून वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला बळकटी देण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आहे. त्यांच्या नेतृत्वात सध्या पक्ष प्रवेशाचा धडाका सुरु असून वणी विधानसभा क्षेत्रात ठिकठिकाणी पक्ष प्रवेश सोहळे घेतले जात आहे. शनिवार दि. ३१ ऑगस्टला शिवसेना (उबाठा) जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना व युवासेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश केला. यावेळी संजय देरकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं.  संजय देरकर यांच्याकडून कार्यकर्ते जोडण्याला प्राधान्य दिले जात आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. ३१ ऑगस्टला शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेना व युव...

शासकीय नोकरी, बक्कळ पगार, पण दारूच्या व्यसनाने युवक जाऊ लागले काळाच्या पडद्याआड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  युवकांमध्ये वाढलेलं दारूचं व्यसन त्यांना मरणाच्या दाराकडे लोटू लागलं आहे. दारूच्या अगदीच आहारी गेलेले युवक जीवनाला मुकू लागले आहेत. दारू हा आता शौक राहिला नाही तर अनेकांची गरज झाली आहे. दररोज दारूचे सेवन करणारे युवक स्वतःहून मृत्यूचा दरवाजा ठोठावू लागले आहेत. अति मद्य सेवनामुळे युवकांवर अकाली मृत्यू ओढावू लागले आहेत. दारूच्या या व्यसनामुळे कित्येकांचे संसार उघड्यावरच आले नाही तर उद्धवस्त देखील झाले आहेत. व्यसनाधीनतेकडे वळलेले युवक संवेदनाहीन झाले असून त्यांना स्वतःची व कुटुंबाची जराही पर्वा राहिलेली नाही. दारूच्या व्यसनापायी ते स्वतःचं व स्वतःच्या संसाराचं वाटोळं करू लागले आहेत. दारूच्या अगदीच आहारी गेलेल्या युवकांवर अकाली मृत्यू ओढावण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अंगमेहनत करणारा व विशिष्ट क्षेत्रात काम करणाराच युवक दारूच्या आहारी गेला नसून शासकीय नोकऱ्यांमध्ये असणारे युवकही प्रचंड दारूचे व्यसनी झाले आहेत. शासकीय सेवेत असलेले युवक दररोज दारूच्या गुत्थ्यावर बसलेले पाहायला मिळतात. रात्री बियरबारमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या मैफिली रंगतात. पगारदार वर्गाचा दारूचा ...

शांतता समितीच्या सभेत सदस्यांनी मांडल्या विविध लक्षवेधी सूचना, शहरातील समस्यांकडे वेधले लक्ष

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   आगामी सण उत्सवाचा काळ लक्षात घेता पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सण उत्सव शांततेत पार पडावे म्हणून पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. सण उत्सवाच्या काळात सुरक्षा व्यवस्था अबाधित राखण्याची पोलिसांवर मोठी जबाबदारी असते. त्यानुषंगाने पोलिसांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. सण उत्सव एकोप्याने साजरे व्हावे याकरिता गुरवार दि. २९ ऑगस्टला सायंकाळी पोलिस स्टेशन येथे शांतता समितीची सभा घेण्यात आली. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही पोलिस प्रशासनाकडून शांतता समितीच्या सर्व सदस्यांना आमंत्रित करून सण उत्सव साजरे करतांना येणाऱ्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी शांतता समितीच्या बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले होते. शांतता समितीच्या या सभेत आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, एसडीपीओ गणेश किंद्रे, ठाणेदार अनिल बेहेरानी, वाहतूक उपशाखा प्रमुख एपीआय सिता वाघमारे, सा. बा. विभागाचे उपविभागीय अभियंता सुहास ओचावार, न. प. उप मुख्याधिकारी जयंत सोनटक्के तथा महावितरणचे अभियंता व इतरही अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शांतता समितीची ही सभा ...

सरपंच परिषदेच्या मुंबई येथील धरणे आंदोलनात वणीचे कार्याध्यक्ष राजू इद्दे कडाडले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामपंचायत कर्मचारी, परिचालक व ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन आझाद मैदान मुंबई येथे २८ ऑगस्टला एक दिवसीय धरणे आंदोलन केले. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद वणीचे कार्याध्यक्ष राजू इद्दे यांनी आपल्या भाषणातून शासनावर तोफ डागली. सरपंचाच्या मागण्यांना शासन गांभीर्याने घेत नसल्याची टीका करतांनाच त्यांनी मागण्या मान्य होईस्तोर हा लढा असाच सुरु ठेवावा लागणार असल्याची उपस्थितांसमोर डरकाळी फोडली. या धरणे आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून हजारोच्या संख्येने सरपंच उपस्थित झाले होते. आंदोलन स्थळाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते नाना पडोळे, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी आवर्जून भेट दिली.  या धरणे आंदोलनातून राजू इद्दे यांनी तीव्र शब्दांत सरपंचांच्या व्यथा मांडल्या. शासन सरपंचांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेला धक्का लावाल तर खबरदार, युवासेनेकडून उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  बहुजनांचे आराध्य दैवत व रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला पुतळा कोसळल्याने देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. पुतळे उभारतांनाही जबाबदारीची जाणीव ठेवली जात नसल्याने देशवासीयांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. बहुजनांची अस्मिता दुखावणाऱ्या या घटनेच्या शहरातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून युवासेनेकडून या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा होणारा अवमान खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशारा युवासेनेकडून देण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा उभारण्याचं कंत्राट देणाऱ्यांपासून तर पुतळा उभारणाऱ्या कंत्राटदारापर्यंत सर्वांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदनही देण्यात आले आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर विद्यमान सरकारच्या काळात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा २५ ऑगस्ट...

राजिव गांधी पंचायत राज संघटनेच्या प्रदेश सचिव पदी शालिनी रासेकर यांची निवड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  माजी नगराध्यक्षा व काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या शालिनी रासेकर यांची राजिव गांधी पंचायत राज संगठनेच्या प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. संगठनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मिनाक्षी नटराजन यांनी त्यांची या पदावर नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र प्रभारी नारायणसिंह राठोड व प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे यांनी शालिनी रासेकर यांना नियुक्तीपत्र दिले. शालिनी रासेकर या विवेकानंद प्राथमिक विद्यालयातून सेवानिवृत्त झाल्या. त्यांचं सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्या आजही राजकीय व सामाजिक क्षेत्रात तेवढ्याच तत्पर आहेत. त्यांची या महत्वपूर्ण पदावर निवड झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.  

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विवेकानंद विद्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा भाग दोन या उपक्रमांतर्गत कायर येथील विवेकानंद विद्यालयात स्काऊट गाईड कडून मंगळवार २७ ऑगस्टला रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक शिक्षक मधुकर घोडमारे, रविकांत गोंडलावार, कु. सोनाली भोयर, शाळानायक मयूर खुटेमाटे, क्रिडानायक रोहन मडावी आदी उपस्थित होते.  यावेळी १० वी च्या विद्यार्थिनी प्रणाली ताजने व सानवी चामाटे यांनी आपापले विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक सुरेंद्र इखारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून रक्षाबंधनाचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीचा पारंपरिक सण आहे. या दिवशी साधा धागा बांधून बहीण भावाला आपलं अतूट नातं जपण्याची व आपल्या नात्याचं रक्षण करण्याची ओवाळणी मागते. हा सण कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. तसेच त्यांनी भाषणातून स्काऊट व गाईड या विषयाचे शालेय जीवनातील महत्वही देखील पटवून सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सोनाली भोयर यांनी केले. यावेळी विद्यार्थि...

यावर्षीही अनुभवायला मिळणार विदर्भातील सर्वात उंच दहीहंडी फोडण्याचा थरार, मनसे कडून दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नागरिकांना आनंद व उत्साहाचं वातावरण निर्माण करून देण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. युवावर्गासह जेष्ठांनाही भक्तिमय वातावरणातून उत्साह भरण्याचं काम मनसेकडून सदैव करण्यात आलं आहे. शहरवासीयांना आनंद साजरा करण्याची पर्वणी देण्याला मनसे नेहमी उत्साही राहिली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तही शहरवासीयांना आनंदोत्सव व दहीहंडीचा थरार अनुभवण्याचा योग यावर्षीही मनसेने जुळवून आणला आहे. मनसेकडून दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वात उंच अशी दहीहंडी फोडण्याकरिता महाराष्ट्रातील ठिकठिकाणचे गोविंदा पथकं या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही दहीहंडी फोडण्याकरिता गोविंदा पथकांकडून आपलं कौशल्य पणाला लावलं जाणार आहे. उंच मानवी मनोरे तयार करून दहीहंडी फोडतांनाचा थरार शहरवासीयांना अनुभवायला मिळणार आहे. ३० ऑगस्टला भव्य शासकीय मैदानावर (पाण्याची टांकी) हा दहीहंडीचा उत्सव रंगणार आहे. या दहीहंडी उत्सवाचे खास आकर्षण असणार आहे सिने अभिनेत्री माधुरी पवार. माधुरी पवार या सिने अभिनेत्रीला या दहीहंडी उत्सवाकरिता मनसे कडून खास आमंत्रित करण्यात आले आहे. म...

कठीण परिस्थितीतही स्त्रियांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं, किरण देरकर

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  स्त्रियांना जेंव्हाही आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली तेंव्हा त्यांनी आपल्या कर्तृत्वाची चमक दाखविली आहे. कर्तव्यनिष्ठता व कार्यकुशलतेतून त्यांनी प्रत्येकच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. कठीण परिस्थितीतूनही स्त्रियांनी आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. जिद्द व परिश्रमातून त्यांनी प्रत्येकच क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारीशक्ती ही प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या बुद्धी तेजाने प्रतिभाशाली बनली आहे. कठीण काळातही स्त्रियांनी आपलं धेय्य गाठलं आहे. परिस्थितीवर मात करून तेजस्वी भरारी घेणारी स्त्रीच आपलं भाग्य उजळू शकते, असे मार्मिक विचार सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन व एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा किरण देरकर यांनी व्यक्त केले. पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा "राज्यपाल" पुरस्कार प्राप्त पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांच्या सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. लाठी येथील पोलिस पाटील संजीवनी खिरटकर यांना पोलिस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा "राज्यपाल" हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा मान सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल ...

लोकशाहीला बाधक ठरणारं हे सरकार सत्तेबाहेर खेचून संविधान वाचविणं गरजेचं, प्रा. श्याम मानव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  संविधानिक मूल्य पायदळी तुडविण्याचं काम देशासह महाराष्ट्रात सत्तेत आलेल्या या सरकारने केलं आहे. लोकशाही प्रधान देशात विषमता निर्माण करनारं हे सरकार असून या सरकारने धार्मिक कट्टरतेतून सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. जातीय द्वेषभावना निर्माण करण्याचा छुपा अजेंडा आता उघडपणे समोर येऊ लागला आहे. संविधान संपविण्याचं षडयंत्र या सरकारने रचलं आहे. कायद्याची मोडतोड केली जात आहे. हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु झाली आहे. हे सरकार संविधान विरोधी असून संविधान बदलविण्याची भाषा सरकारचे प्रवक्ते व सरकार चालविणारी यंत्रणा करीत आहे. मनू प्रेरित विचारांचं हे सरकार बहुजनांना गुलाम करण्याची कूटनीती आखत आहे. असंवैधानिक मार्गाने सरकार स्थापन करून अवैधरित्या राज्यकारभार चालविणाऱ्या या संविधान विरोधी सरकारला सत्तेबाहेर खेचणे गरजेचे झाले असल्याचे परखड विचार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष व राजकीय विश्लेषक प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले. शहरातील शेतकरी मंदिर येथे आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव या विषयावर विचार मांडतांना...

शहरात डेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णांत वाढ, नगर पालिकेकडून उपाययोजनांचा मात्र अभाव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले आहेत. डेंग्यूच्या आजाराने रुग्ण फणफणत असतांना नगर पालिका प्रशासन मात्र सुस्त बसल्याचे दिसून येत आहे. डेंग्यूची रोकथाम करण्याकरिता नगर पालिका प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचे प्रयत्न अथवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे डेंग्यूने शहरात पाय पसरायला सुरुवात केली आहे. शहरात डेंग्यूची लक्षणे असलेले रुग्ण बरेच वाढले आहेत. शहरात डेंग्यूची साथ आलेली असतांना देखील नगर पालिका प्रशासनाची नियुजनशून्यता दिसून येत आहे. शहरातील काही परिसरातील नाल्या व गटारे सताड खुली आहेत. नाल्यांमध्ये साचून राहणाऱ्या घाण पाण्यात डेंग्यूच्या विषाणूंची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन नागरिकांना डेंग्यूची लागण होऊ लागली आहे. या जीवघेण्या आजारामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतांना नगर पालिका प्रशासन डेंग्यूची साथ रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना करतांना दिसत नाही. निर्जंतुकीकरणाची फवारणी नगर पालिकेकडून कायम बंद करण्यात आली आहे. शहरात धूर फवारणी केली जात नसल्याने विष्णूजन्य आजारांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. नगर पालिकेच्या दुर्लक्षितपण...

शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश, नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं (उबाठा) पक्षबळ वाढविण्याकरिता गावागावात शिवसेनेच्या शाखा तयार केल्या जात आहेत. शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांनी पक्ष संघटन वाढविण्याचा विडा उचलला असून पक्ष बांधणीकरिता गावागावात जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. वणी विधानसभा क्षेत्राचा त्यांना दांडगा अनुभव असून त्यांचा जनसंपर्कही विस्तृत आहे. संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शिवसेनेत कार्यकर्त्यांचं इनकमिंग सुरूच असून २४ ऑगस्टला नांदेपेरा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. नांदेपेरा येथे शिवसेना व युवासेनेची शाखा गठीत करण्यात आली असून संजय देरकर यांच्या हस्ते शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संतोष माहुरे यांच्यासह शिवसेना शहर, तालुका व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  गाव तिथे शिवसेना व घर तिथे शिवसैनिक हे अभियान शिवसेनेकड...

लो. टि. महाविद्यालयाचा संस्कृत सप्ताह संपन्न

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग तथा संस्कृत भारती शाखा वणीच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात संस्कृत भारती द्वारा प्रकाशित "संस्कृतं वदतु" या पुस्तकाचे ५० घरांना निःशुल्क वाटप करण्यात आले. महाविद्यालयातील प्रथम व द्वितीय वर्षाच्या निवडक विद्यार्थिनींनी ५० घरांशी संपर्क साधून या पुस्काचे वाटप केले.  हे पुस्तक दैनंदिन जीवनासाठी अतिशय उपयोगी असून या वैष्ट्यपूर्ण पुस्तकात रोजच्या जीवनाशी निगडित अनेक महत्वपूर्ण संस्कृत वाक्ये आहेत. तसेच वेगवेगळ्या पदार्थांना व वस्तूंना असणारी संस्कृत नावे, संस्कृतमध्ये वेळ सांगण्याची पद्धत, विविध व्यवसायात आवश्यक संस्कृत वाक्ये अशा अनेक महत्वपूर्ण बाबी या पुस्तकात आहेत. अशा स्वरूपातील माहितीच्या आधारे सात दिवसांत एकूण ५० प्रश्नांच्या सात प्रश्न मालिका त्या सर्व घरांमध्ये वितरित करून त्यांच्याकडून त्या पूर्ण करून घेण्यात आल्या.  लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग प्रमुख तथा संस्कृत भारती शाखा वणीचे अध्य...

अवैध दारू विक्री होत असलेला धाबा पेटवून देणाऱ्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ अगदीच मुख्यमहामार्गालगत असलेल्या धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री केली जात होती. त्यामुळे मंदर या गावातील महिलांमध्ये कमालीचा संताप दिसून येत होता. धाब्यावर दारू विक्री न करण्याबाबत धाबा चालकाला वेळोवेळी सांगण्यात आले. मात्र धाबा चालक कुणालाही जुमानत नव्हता. शेवटी महिलांचा संयम सुटला. गावातील ४० ते ५० महिलांनी एकत्र येत धाब्यावर हल्लाबोल केला. महिला एवढ्यावरच थांबल्या नाही तर त्यांनी धाबाच पेटवून दिला. त्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले. धाबा चालकाने धाबा पेटविणाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदविल्याने पोलिसांकडून सात ते आठ गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मंदर गावाजवळ मुख्य महामार्गालगत "बब्बू भैय्या का धाबा" या नावाने धाबा सुरु करण्यात आला. या धाब्यावर राजरोसपणे दारू विक्री केली जात होती. त्यामुळे गावातील लहानसहान मुलंही दारूच्या आहारी जाऊ लागले होते. गावात दारू पिणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. धाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याच्या वारंवार तक्रारी करूनही दारू विक्रीवर निर्बंध लावण्यात न आल्याने गा...

मनसेला एकदा संधी द्या, सर्व प्रश्न सोडवू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  विदर्भाच्या दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र निवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांचं २२ ऑगस्टला रात्री वणी येथे आगमन झालं. चंद्रपूर येथील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते वणीला आले. हॉटेल जन्नत येथे त्यांनी रात्री मुक्काम केला. त्यांच्या सोबत त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील होते. २३ ऑगस्टला सकाळी शिवतीर्थ येथे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण व अभिवादन केल्यानंतर हॉटेल जन्नत येथे राज ठाकरे यांची संवाद सभा आयोजित करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. पत्रकारांशी त्यांनी दिलखुलास चर्चा केली.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यांनी या दौऱ्यात मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्याशी विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. निवडणुकी संदर्भात मनसे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा...

घरून बेपत्ता असलेल्या इसमाचा वणी भालर मार्गावर आढळला मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी भालर मार्गावरील हयात वीट भट्ट्याच्या विरुद्ध बाजूला रोडपासून काही अंतरावर नाल्याजवळ इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतक इसमाची दुचाकी रोडवर उभी असून रोड पासून काही अंतरावर तो मृतावस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या केली, की काही अनुचित प्रकार घडला याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. सदर इसम हा घरून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येते. त्याचा शोध सुरु असतांनाच आज २३ ऑगस्टला सकाळी त्याच्या मृतदेहच आढळून आला. मारोती जयंतराव कुचेवार (५०) रा. शास्त्री नगर असे या मृतावस्थेत आढळलेल्या इसमाचे नाव आहे.  सकाळी वणी भालर मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना हयात वीट भट्ट्याच्या विरुद्ध बाजूला नाल्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी संपूर्ण शहरात पसरली. नंतर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक हा तेथे बघणाऱ्यांपैकी काही लोकांच्या परिचयाचा निघाला. नंतर त्याची ओळख पटली. ...

व्यावसायिकाला भर रस्त्यात लुटणाऱ्या सहा लुटारूंना अवघ्या तीन दिवसांत अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील वसंत गंगा विहार येथील बालाजी अपार्टमेंट समोर राहणाऱ्या एका व्यावसायिकाला गंगा विहार गेट जवळ अडवून चाकूच्या धाकावर लुटणाऱ्या सहा लुटारूंना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसांत अटक केली आहे. गणेश दत्ता चौगुले (२४), शेख सलीम शेख हुसैन (२६) दोन्ही रा. वार्ड क्रमांक ७ मारेगाव जि.यवतमाळ, रीतिक गणेश तोडसाम (२४), पियूष अरुण नारनवरे (१९) दोन्ही रा.इतवारा बाजार, पोलिस चौकी जवळ वर्धा, तौसिफ रज्जाक कुरेशी (२५) रा. आनंद नगर, रेल्वे लाईनच्या बाजूला वर्धा, सूजल सुरेश पाटील (१९) रा.इतवारा बजार वर्धा अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. दोन आरोपींना मारेगाव येथून, दोन आरोपींना वर्धा येथून तर दोघांना चिखलदरा येथून मोठ्या शिताफीने पोलिसांनी अटक केली. त्यांच्या जवळून ३ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  शहरातील प्रसिद्ध अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक अंकुश चिंतामणी बोढे (३६) हे १९ ऑगस्टला रात्री ९.१५ वाजता नेहमी प्रमाणे दुकान बंद करून वसंत गंगा विहार येथील आपल्या घराकडे जात असताना त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दरोडेखोरांनी त्यांना रस्त्यात ग...

कोलकाता व बदलापूर घटनेचा झरी शिवसेनेच्या (उबाठा) वतीने जाहीर निषेध, तहसील कार्यालयासमोर करण्यात आले निषेध आंदोलन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  कोलकाता व बदलापूर येथील अमानुष घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळी असून या घटनेचा देशवासीयांमधून तीव्र निषेध केला जात आहे. चिमुकल्या मुलींवर व प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर वासनेने पिसाळलेल्या हैवानांकडून अत्याचार करण्यात आला. तसेच महिला डॉक्टरची अत्याचारानंतर निर्दयीपणे हत्या करण्यात आली. हे दोनही खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चाललून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण देशातून होऊ लागली आहे. झरी येथेही या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला. झरी शिवसेनेच्या वतीने (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात झरी तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. कोलकाता व बदलापूर येथील घटनेचा निषेध नोंदविण्याकरिता झरी शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या दोनही घटना मानवतेला कलंक फासणाऱ्या असून महिलांच्या सुरक्षेप्रती सजग नसलेल्या सरकार विरोधात यावेळी शिवसैनिकांकडून जोरदार नारेबाजी करण्यात आली.  कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल मधिल प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर ९ ऑगस्टला रात्री अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आ...

संसदेत कायदा पारित करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय बाजूला सारण्याची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  अनुसूचित जाती व जमातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आज २१ ऑगस्टला भारत बंदची हाक देण्यात आली. देशात ठिकठिकाणी दलित संघटना रस्त्यावर उतरल्या. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय संविधानातील आरक्षण या संकल्पनेला ध्वस्त करणारा असून घटनेची पायमल्ली करणारा आहे. त्यामुळे सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षणाला निर्माण होणारा धोका लक्षात घेता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात संसदीय कायदा पारित करून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाला बाजूला सारण्याची मागणी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकडून करण्यात आली आहे. वणी येथेही अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात निवेदन दिले आहे. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब राज्य विरुद्ध दविंदर सिंग या प्रकरणात राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी अनाकलनीय असणारा निर्णय दिला. ५६५ पानांच्या या निर्णयामध्ये प्रत्येक न्यायाधीशाने स्वतंत्रपणे आपले मत मांडले. त्यानंतर न्यायमूर्ती सतिशचंद्र शर्मा...

शिवसेना (उबाठा), युवासेना व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन कडून कोलकाता व बदलापूर येथील घटनेचा निषेध

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  बदलापूर येथील चिमुकल्या शाळकरी विद्यार्थिनींवर शाळेतीलच एका नराधम सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना असून ४ वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींना वासनेचा शिकार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याच्या मागणीला घेऊन मानवी संवेदना उफाळून आल्या आहेत. या लाजिरवाण्या घटनेमुळे परत एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे सरकार कडून महिलांच्या सन्मानार्थ लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. तर दुसरीकडे बहिणींच्या मुलींवर वाईट नजर ठेऊन असलेली हैवानी प्रवृत्ती त्यांच्या अब्रूवर हात घालत आहे. त्यामुळे सरकारवर आता टीकेची झोड उठू लागली आहे. शहरातही या मानवतेला कलंकित करणाऱ्या घटनेचे पडसाद उमटले असून शिवसेना (उबाठा) शहर, तालुका व महिला आघाडी तसेच युवासेना व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या वतीने बदलापूरच्या या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. बदलापूर व कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेचा निषेध म्हणून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच दोन्ही राज्यांच्या सरकार विरोधा...