नैसर्गिक आपत्तीने विवंचनेत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले. हाताशी आलेल्या पिकांवर निसर्गाने पाणी फेरले. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळे बळीराजा नैराश्येच्या गर्तेत आला आहे. शेतपिकांची वाताहत झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची हिरवीगार स्वप्न मातीमोल झाली. नैसर्गिक आपत्तीने शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी भारतीय काँग्रेस कमिटी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याची मागणी करण्यात आली आहे. काळ्या मातीत घाम गाळून कष्टाने रान हिरवं करणारा शेतकरी नेहमी संकटाने घेरलेला असतो. संकटाशी शेतकऱ्यांचं एकप्रकारे नातंच जुळलं आहे. जीवाचं रान करून शेतात मोती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा होणं हा नित्यनियमच ...