फिरायला जातो म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी बेपत्ता, फूस लावून पळवून नेल्याचा संशय

प्रशांत चंदनखेडे वणी शहरालगत असलेल्या एका गावात वास्तव्यास असलेली अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता झाल्याची घटना २९ जुलैला उघडकीस आली. फिरायला जातो म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी घरी परतलीच नाही. उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. तिचा सर्वत्र शोध घेऊनही कुठेही तिचा थांगपत्ता न लागल्याने शेवटी मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. मुलीला कुणी तरी फूस लावून पळवून नेल्याचेही मुलीच्या आईने तक्रारीत म्हटले आहे. महिलेच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणारी १६ वर्षीय विद्यार्थिनी २९ जुलैला रात्री ८ वाजताच्या सुमारास घरून अचानक बेपत्ता झाली. फिरायला जातो म्हणून ही अल्पवयीन मुलगी घराबाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले. मैत्रिणी व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती कुठेच आढळून न आल्याने पालक चांगलेच चिंतेत आले. शेवटी मुलीच्या आईने पोलिस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्य...