शहरातील वर्दळीच्या ठिकाणी तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला, तरुणाची प्रकृती अत्यवस्थ

प्रशांत चंदनखेडे वणी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास घडली. तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला आधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले आहे. दिवसाढवळ्या राहत्या घराच्या आवारात तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रणय मुकुंद मुने वय अंदाजे २५ वर्षे रा. माळीपुरा असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोर हे हिंगणघाट जि. वर्धा येथील रहिवाशी असल्याचे समजते. पोलिसांनी अजिंक्य चौधरी वय अंदाजे २५ वर्षे व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील मध्यवस्तीत वर्दळीचे ठिकाण असलेल्या घरसंसार सेलजवळ राहणाऱ्या प्रणय मुने या तरुणावर दोन गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी राहत्या घराच्या आवारात धारदार शस्त्राने हल्ला चढवि...