विदर्भावर अन्याय करणाऱ्या नागपूर कराराची विदर्भवाद्यांनी केली होळी, वेगळ्या विदर्भासाठीचा लढा आणखीच तीव्र

प्रशांत चंदनखेडे वणी विदर्भाला स्वतत्र राज्याचा दर्जा मिळावा म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीने उभारलेला लढा आणखीच तीव्र झाला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ राज्याच्या निर्मिती करिता एकाकी संघर्ष सुरु असून वेगळ्या विदर्भाची मागणी त्यांनी शासनाकडे रेटून धरली आहे. महाराष्ट्राशी संलग्न राहून विदर्भाचा विकास शक्य नसल्याचे विदर्भवाद्यांनी वेळोवेळी पटवून दिले आहे. महाराष्ट्रात विदर्भावर नेहमीच अन्याय होत आला आहे. विदर्भावर अन्याय करणाऱ्या नागपूर कराराचीच विदर्भवाद्यांनी होळी करून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर करार करून पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांनी १ मे १९६० ला विदर्भासह महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली. एकूणच ११ कलमी असलेल्या या करारात काही महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या. त्यामुळे विदर्भाचा विकास होईल अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला पाने पुसल्या गेली. महाराष्ट्र राज्यात निर्माण होणाऱ्या सरकारी नोकऱ्या व इतर सुविधांमध्ये विदर्भातील जनतेला लोकसंख्येच्या आधारावर २३ टक्...