स्वतःच्या कर्तृत्वाने मोरेश्वर हा लॉर्ड्स टेलर व नंतर यशस्वी उद्योजक बनला, त्यांनी शून्यातून विश्व उभारलेल्या कर्तृत्वाची ही यशोगाथा

प्रशांत चंदनखेडे वणी वणी सारख्या शहरात येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करणाऱ्या मोरेश्वरची ही यशोगाथा हातात शेवटचे दीड रुपये होते. त्यात नवीन शहर. राहायचंच म्हटलं तरी लॉजचं भाडं दोन रुपये होतं. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. तरीही तो हिंमत हारला नाही. अमरावतीच्या एका व्यापाऱ्यानं पन्नास रुपयांची नोट मोडून त्याला 50 पैसे दिले. मग सकाळ झाली. त्याच्याही आयुष्याची ही नवीनच पहाट होती. खिशात एकही रुपया नव्हता. आणि इथूनच त्याच्या संघर्षाला सुरुवात झाली. स्वबळावर आणि अथक परिश्रमातून जिद्दीने पुढं चालून त्यांनं आपलं स्वतंत्र विश्व शून्यातून निर्माण केलं. व्यवसायात नाव कमावलं. या कर्तुत्ववान पुरुषाचं नाव आहे मोरेश्वर राघोबाजी उज्वलकर. यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील करणवाडी हे त्यांचं गाव. प्राथमिक शिक्षण मोरेश्वर यांनी तिथेच घेतलं. वडील राघोबाजी टेलरिंगचा व्यवसाय आणि शेतमजुरी करायचे. मोरेश्वरसह चार भावंड आणि दोन बहिणी आहेत. घरी शेतीवाडी नसल्यामुळे हेदेखील शेतातली काम करायचे. मोरेश्वर 10 पैसे किलोप्रमाणे दिवसाला 40 किलो कापूस वेचायचा. गावातली पीठ गिरणी सा...