Posts

Showing posts from June, 2024

वाढदिवस भाऊचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा, शहरात आज धडाक्यात साजरा होणार राजुभाऊ उंबरकर यांचा वाढदिवस

Image
प्रशांत चंदनखेडे वणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष नेते राजुभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा ! शुभेच्छुक :-  सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवार  महाराष्ट्र नवनिर्माण सेना  वणी विधानसभा क्षेत्र  राजूभाऊ उंबरकर यांचा वाढदिवस म्हणजे जल्लोषाची एक पर्वणीच. आनंदाची भरती देणारा क्षण म्हणजे राजूभाऊ यांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाची पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच शहरवासियांनाही उत्सुकता लागलेली असते. आनंददायी वातावरणात त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्यांचा वाढदिवस एकप्रकारे आनंदाचं पर्वच घेऊन येतो. शहरवासीयांचा आनंद द्विगुणित करणारा हा दिवस असतो. राजूभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणांबरोबरच जेष्ठांनाही एक दिवस आनंदात घालविण्याची संधी मिळते. शहरात एकप्रकारे आनंदोत्सव साजरा केला जातो. राजूभाऊ यांचा वाढदिवस नेहमी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. पदाधिकारी, कार्यकर्ते व मित्र परिवाराकडून त्यांच्या वाढदिवसाच्या आयोजनात दरवेळी वेगळंपण आणून त्यांचा प्रत्येकच वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. आजही त्यांच्या वाढदिवसाची ...

रवि नगर येथील व्यक्ती मूल येथील लॉजमध्ये आढळला गळफास घेतलेल्या अवस्थेत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील एका लॉजमध्ये वणी शहरातील रवी नगर येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुनिल कृष्णराव देरकर (५२) असे या मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मृतक हा प्रॉपर्टी डीलर असल्याचे समजते. मंगळवारी तो एका जमिनीच्या व्यवहाराकरिता जातो म्हणून घरून निघाला होता. परंतु आज २९ जूनला त्याचा लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत  मृतदेहच आढळून आला. ही माहिती कुटुंबियांना मिळताच कुटुंबीय तात्काळ मुलला रवाना झाले आहेत. सुनिल देरकर याच्या गळफास घेण्याचे रहस्य मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.  शहरातील रवी नगर येथे परिवारासह राहत असलेले सुनिल देरकर हे प्रॉपर्टी डीलर असून ते मूल येथे एका जमिनीच्या व्यवहाराकरिता गेले होते. मंगळवारी ते वणी वरून गेले आणि आज शनिवारी त्यांचा लॉज मधील एका रुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याबाबत विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच खरं काय ते स्पष्ट...

एलसीबी पथकाची धडाकेबाज कार्यवाही, दरोड्यातील फरार आरोपींना नागपूर येथून केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  खाजगी प्रवासी वाहनाला भर रस्त्यात अडवून वाहन चालकाला चाकूच्या धाकावर लुटल्याची खळबळजनक घटना ७ जूनला वणी करंजी मार्गावरील गोघुलधरा फाट्यावर घडली होती. वाहन चालकाला लाकडी दांड्याने जबर मारहाण करून त्याच्या जवळील रोख रक्कम बळजबरीने हिसकावाल्याची तक्रार मारेगाव पोलिस स्टेशनला करण्यात होती. पोलिसांनी या प्रकरणात १० आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी शीघ्र तपास चक्रे फिरवून दरोड्यातील दोन आरोपींना तात्काळ अटक केली. तर इतर आरोपींचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात होता. फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथकेही गठीत करण्यात आली होती. अशातच स्थानिक गुन्हे शाखा पथकाला आरोपींचा सुगावा लागला. पथकाने नागपूर रेल्वे स्टेशन येथून तीन दरोडेखोरांना अटक केली आहे. हे तिघेही महाराष्ट्राबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने नागपूर येथून मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली. गुन्हेगारांचा शोध लावण्याच्या कौशल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पथक नेहमीच प्रशंसनेस पात्र ठरलं आहे.  पांढरकवडा ...

कारची दुचाकीला मागून जोरदार धडक, एक ठार तर एक गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  भरधाव कारने चालत्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 26 जूनला दुपारी वणी वरोरा मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ घडली. शुभम सुशीलकुमार रॉय (38) रा. बंगाली कॅम्प चंद्रपूर असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर साजिद इस्राईल शेख (२७) रा. कडोली ता. राजुरा असे जखमीचे नाव आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. वणी वरून चंद्रपूरला जात असलेल्या दुचाकीला (MH 29 BL 9259) रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या भरधाव कारने (MH 34 BR 8065) मागून जोरदार धडक दिली. या भिषण अपघातात दुचाकी वरील एक जण जागीच ठार झाला. तर  दुसरा गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. धडक एवढी जोरदार होती की, दुचाकीस्वार चेंडू सारखे उसळून कारच्या समोरील काचेवर आदळले. कार चालक चंद्रकांत लक्ष्मण धानोरकर (32) रा. वरोरा हा मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अती मद्य सेवन करून कार चालाविल्यामुळे...

लालगुडा चौपाटी येथे हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरालगत असलेल्या लालगुडा चौपाटी येथील एका टी-शॉप समोर हातात धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. राजिव राधेश्याम पर्बत (२४) रा. नविन वागदरा ता. वणी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. शस्त्राच्या धाकावर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा हा तरुण ऑटोचालक असल्याचे कळते. पोलिस त्याला ताब्यात घेत असतांना तो पोलिसांवरच जोर आजमावण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांची अटक चुकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या या आरोपीला पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून मोठ्या शिताफीने अटक केली. ही कार्यवाही २५ जूनला दुपारच्या सुमारास करण्यात आली. पोलिस पथक शहरात गस्त घालत असतांना त्यांना लालगुडा चौपाटी परिसरात एक तरुण हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिस पथक लालगुडा चौपाटी येथे पोहचल्यानंतर त्यांना तरुण हा निकेश नगराळे यांच्या टी-शॉप समोर हातात शस्त्र घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो जोर आजमावून अटक चुकविण्याचा प्रयत्न करू लागला....

श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने जपली भारतीय संस्कृती, माजी खासदार हंसराज अहिर

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नंदीग्राम एक्सप्रेस मधील प्रवाशांना भर उन्हात पाणी वाटप करून मानवी संवेदना जपतांनाच माणुसकीचं दर्शन घडविणाऱ्या श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने भारतीय संस्कृतीला पूरक असं मानवसेवेचं प्रेरणादायी कार्य केलं आहे. उष्णतेने कासावीस व तहानेने व्याकुळ झालेल्या जीवांना पाणी पाजून या संस्थेने भारतीय संस्कृतीचा आदर्श जपला आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा असल्याचा संदेश त्यांनी या कौतुकास्पद कार्यातून दिला आहे. सेवाभावी कार्यांसाठी आर्थिक मदत कुणीही करतो, पण शारीरिक श्रम घेऊन या संस्थेनं खऱ्या अर्थाने सेवाभाव जपला आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार हंसराज अहिर यांनी काढले. ते श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सत्कार व समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. श्री महावीर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वणी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी उन्हाळयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पेयजल वितरणाच्या या कार्यात अनेकांनी हातभार लावला. रखरखत्या उन्हात त्यांनी प्रवाशांना पाणी वाटप केले. या सर्व श्रमदात्यांचा सत्...

एलसीबी पथकाने गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव उधळला, १२ बैलांची सुटका व २३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल केला जप्त

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव उधळून लावला असून तस्करांच्या तावडीतून १२ गोवंश जनावरांची सुटका केली आहे. चार पिकअप वाहनांमधून गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याच्या गोपनीय माहितीवरून एलसीबी पथकाने वणी मुकुटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ सापळा रचून मोठ्या शिताफीने या चारही वाहनांना थांबवून त्यांना ताब्यात घेतले. चार पिकअप वाहनांमध्ये एकमेकांच्या पायांना बांधून व निर्दयीपणे कोंबून असलेल्या १२ बैलांची सुटका करीत एलसीबी पथकाने घटनास्थळावरून २३ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही धडक कार्यवाही २३ जूनला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.  यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असतांना पथकाला वणी मार्गे आदिलाबाद येथे गोवंश जनावरांची तस्करी होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी मुकुटबन मार्गावरील पेटूर गावाजवळ सापळा रचला. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पथकाला वणी कडून एका मागून एक चार पिकअप वाहने सुसाट...

पुलाचे बांधकाम सुरु असल्याने बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता गेला वाहून

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी-मार्डी मार्गावरील वनोजादेवी गावाजवळ पुलाचे बांधकाम सुरु असल्याने गावकऱ्यांसाठी बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता २२ जूनला पडलेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांचे गावातून बाहेर पडणे कठीण झाले आहे. रस्ता वाहून गेल्याने नागरिकांची दैनंदिन कामे रखडली असून त्यांना महत्वाची कामे देखील पूर्ण करता आलेली नाही. रविवार हा बाजाराचा दिवस असतांनाही नागरिकांना रस्त्याअभावी गावाबाहेर पडता न आल्याने त्यांच्यामधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. गावकऱ्यांसाठी बांधून देण्यात आलेला पर्यायी रस्ता एकाच पावसात वाहून गेल्याने नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. तेंव्हा पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत टिकेल असा पर्यायी रस्ता वनोजादेवी गावासाठी बांधून द्यावा, अशी मागणी गावकऱ्यांमधून होऊ लागली आहे. वनोजादेवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील चार महिन्यांपासून पुलाचे बांधकाम सुरु आहे. पुलाचे बांधकाम सुरु असल्याने वनोजादेवी येथील नागरिकांसाठी तात्पुरता पर्यायी रस्ता बांधून देण्यात आला. पुलाजवळूनच...

परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी रद्द करा, जिल्हाध्यक्ष महेश लिपटे यांची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेत विद्यमान सरकारने 'समान धोरण' या नावाखाली जाचक अटी घालून दिल्या आहेत. त्या तात्काळ मागे घेण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष महेश लिपटे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या परदेशी शिष्यवृत्तीत समान धोरण या नावाखाली जाचक अटी घालून दिल्या आहेत. सामाजिक न्याय्य व विशेष सहाय्य विभागातर्फे ३० ऑक्टोबर २०२३ रोजी परिपत्रक काढण्यात आले. त्यात परदेशी शिक्षणाकरिता मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीत जाचक अटींचा समावेश करण्यात आला आहे. शासनाकडून अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यात समान धोरण या नावाखाली शासनाने अनेक जाचक अटी घातल्या आहेत. १० वी, १२ वी व पदवीसाठी ७५ टक्के गुणांची अट घालतानाच शिक्षण शुल्कात ३० त...

वडिलोपार्जित शेत जमिनीच्या वहिती वरून मोठ्या भावाची लहान भावाला मारहाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शेत जमिनीची वहिती करण्यावरून दोन भावांमध्ये झालेला वाद विकोपाला जाऊन एकाने दुसऱ्याला लाकडी दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना १९ जूनला मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथे घडली. लाकडी दांड्याने मारहाण केल्याने लहान भावाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर २० जूनला लहान भावाने मोठ्या भावाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. लहान भावाच्या तक्रारी वरून पोलिसांनी मोठ्या भावावर गुन्हा दाखल केला आहे. विवेक हरी वानखेडे (६०) रा. सावर्ला ता. वणी असे या गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  वडिलोपार्जित शेतीची वहिती करण्यावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. मोठ्या भावाने लहान भावाला लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात लहान भावाला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर संतोष हरी वानखेडे (५१) रा. सगणापूर याने आपला मोठा भाऊ विवेक वानखेडे याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारी वरून पोलिसांनी विवेक वानखेडे याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम ३२६, ५०४, ५०६ नुसार ...

युवतीचा आंघोळ करतांना व्हिडीओ काढणाऱ्या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे गुन्हे वाढल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजूर (कॉ.) हे गाव सध्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गाजू लागलं आहे. या गावात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली आहे. गुन्हेगारी जगतात नावाजलेली ओळख पुसली जात असतांनाच परत या गावात गुन्हेगारी कारवायांची धग निर्माण होऊ लागली आहे. येथे भाईगिरीचा प्रचंड बोलबाला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. काही टपोरी तरुणांनी दहशत निर्माण करण्याकरिता टोळके तयार केल्याचीही कुजबुज गावातून ऐकायला मिळत आहे. एका युवतीचे आंघोळ करतानाचे चित्रीकरण करण्यापर्यंत या टपोरी तरुणांची मजल वाढली आहे. युवती घरी आंघोळ करीत असतांना हा टपोरी तरुण स्नानगृहाजवळ आला, व लपून तिचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करू लागला. परंतु हे दुष्कृत्य करतांना या नराधमावर युवतीची नजर पडली. युवतीने आरडाओरड करताच आरोपीने तेथून पळ काढला. या प्रकाराने युवती चांगलीच भयभीत झाली. तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. पालकांनी तिला सोबत घेऊन सरळ पोलिस स्टेशन गाठले. युवतीने पोलिस...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तीन आरोपींना अटक, निर्जनस्थळी नेऊन केला अत्याचार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वासनेने पिसाळलेल्या तरुणांनी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला निर्जनस्थळी नेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची संतापजनक घटना १७ जूनला घडली. तरुणांनी केलेल्या या कृत्यामुळे मुलगी चांगलीच घाबरली असून तिला मानसिक धक्का बसला आहे. तरुणांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या या मुलीने शेवटी स्वतःला सावरत पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. पोलिसांसमोर तिने आपबिती कथन केली. १९ जूनला रात्री पीडित मुलीने तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेऊन तीन आरोपींना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचार प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत अवघ्या काही तासांतच आरोपींना गजाआड केले. त्यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथील तीन तरुणांनी चायनिजच्या दुकानावर काम करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे रात्री ऑटोतून अपहरण करून तिला वणी घुग्गुस मार्गावर निर्जनस्थळी नेले. तेथे तिघांनीही या अल्पवयीन मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर परत तिला टिळक चौकात सोडून दिले. तरुणांच्या या कृत्य...

लग्नाच्या भूलथापा देऊन तरुणीचे शारीरिक शोषण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  घराशेजारी राहणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचं सतत ७ ते ८ महिने शारीरिक शोषण केल्यानंतर तिच्याशी लग्न करण्यास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध तरुणीच्या आजीने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ जूनला सायंकाळी गुन्हा दाखल होताच आरोपी पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.  शहरातील एका परिसरात घराशेजारी राहणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने २० वर्षीय तरुणीशी जवळीक साधत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला प्रेमात भावनिक करून तिचं सतत ७ ते ८ महिने शारीरिक शोषण केलं. नंतर तिच्या पासून मन भरल्यानंतर तो तिला टाळण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र तरुणीने त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरल्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे आपली वासना भागविण्याकरिता त्याने आपल्यावर प्रेमाचं जाळं टाकल्याचे तिच्या लक्षात आले. खोट्या प्रेमात अडकवून त्याने आपलं शारीरिक शोषण केल्याचे लक्षात आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या आजीला सांगितला....

अति मद्य सेवनाने युवकाचा मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   अति मद्य सेवनामुळे युवकाचा मृत्यू झाल्याची घटना १८ जूनला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संदीप गुणवंत पीर (३४) रा. दीपक चौपाटी असे या मृतक युवकाचे नाव आहे. दारूच्या नशेत तर्रर्र झालेला हा युवक दीपक चौपाटी परिसरातच पडून राहिला. खूप वेळ होऊनही तो तेथेच पडून असल्याचे लक्षात येताच परिचयातील काही लोकांनी ही माहिती त्याच्या लहान भावाला दिली. लहान भावाने तो पडून असलेल्या ठिकणी येऊन त्याला उठविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्या कडून कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून लहान भावाने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.  शहरातील दीपक चौपाटी परिसरात राहणाऱ्या संदीप पीर या युवकाला दारूचे व्यसन जडले होते. तो दारूच्या अगदीच आहारी गेला होता. १८ जूनला त्याने मनसोक्त दारू ढोसली. अति दारू सेवनाने त्याला चांगलीच झिंग चढली. दारूच्या नशेत तर्रर्र झालेला हा युवक दीपक चौपाटी परिसरातच पडून राहिला. खूप वेळ होऊनही तो तेथेच दारू पियुन पडून असल्याचे लक्षात येताच ओळखीतल्या काही लोकांनी त्याच्या भावाला ही माहिती दिली. त्य...

एमएचटी-सीईटी परीक्षेत सोमय्या करिअर इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   बारावी नंतर विविध शाखांमध्ये प्रवेश घेण्याकरिता महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट (एमएचटी-सीईटी) परीक्षेचे निकाल १७ जूनला जाहीर झाले असून या परीक्षेत सोमय्या करिअर इंस्टिट्यूटचे विद्यार्थी चमकले आहेत. येथील बहुतांश विद्यार्थी हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. तर अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आता वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे.    महाराष्ट्र शासना अंतर्गत महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. बारावी नंतर विद्यार्थ्यांना अनेक शाखांच्या प्रवेशासाठीचे मार्ग खुले होतात. आणि या शाखांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक संयुक्त परीक्षा घेतली जाते. त्यालाच एमएचटी-सीईटी परिक्षा म्हणतात. या परीक्षेच्या माध्यमातून बी-टेक, बीई (इंजिनिअरिंग), बी फार्मा आणि इतर इंजिनिरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या बॅचलर पदवीसाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रात प्रत्येक इंजिनिअरिंग महाविद्यालयात एमएचटी-सीईटी अंतर्गत काही राखीव जाग...

तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  तालुक्यात आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड वाढलं असून एका पाठोपाठ होणाऱ्या आत्महत्यांनी तालुका हादरला आहे. तालुक्यातील मोहर्ली येथील एका महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाने शेत शिवारातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १८ जूनला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. वैभव संजय येरकाडे (१७) असे या गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.  युवावर्ग नैराश्येतून आत्महत्या करू लागल्याने पालकांच्या चिंता वाढल्या आहेत. कुटुंबाचा आधार असलेले तरुण आत्मघाती निर्णय घेऊ लागल्याने पालक चांगलेच काळजीत आले आहेत. मोहर्ली येथे कुटुंबासोबत राहत असलेल्या तरुणाने नैराश्येतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. त्याने गावातील युवराज राजूरकर यांच्या शेतातील नाल्याच्या काठावर असलेल्या झाडाला दोरीने गळफास लावून जीवनाचा शेवट केला. वैभव हा शहरातील एका महाविद्यालयात १२ वी चे शिक्षण घेत होता. त्याने आज दुपारी झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या काकाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. काकाने लगेच आपल्या भावाला फोन करून वैभवने गळफास घेतल्याची माहिती दिली. मुलाने फाशी घेतल्याचे...

२०० युनिट मोफत विजेकरिता शिवसेनेचे (उबाठा) अनोखे स्वाक्षरी अभियान, पंतप्रधानांना पाठविणार १ लाख १६ हजार १६ स्वाक्षऱ्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   घरगुती विजधारकांना २०० युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी व शेतकऱ्यांना संपूर्ण वीज बिल माफी देण्यात यावी, या प्रमुख मागण्यांना घेऊन शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात शहरातील यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर अनोखे स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात आले आहे. १७ जून ते १६ जुलै पर्यंत हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे. या मागण्यांची दखल घेण्यात यावी म्हणून पंतप्रधानांना वणी विधानसभा क्षेत्रातून १ लाख १६ हजार १६ स्वाक्षऱ्या पाठविण्यात येणार आहे. काल पासून या स्वाक्षरी अभियानाला सुरुवात झाली आहे.  माझी वीज माझा अधिकार, या तळपत्या मुद्द्याला शिवसेना नेते संजय देरकर यांनी हात घातला आहे. घरगुती वीज वापरणाऱ्यांना २०० युनिट मोफत वीज देण्याच्या मागणीला घेऊन त्यांनी अनोखे आंदोलन सुरु केले आहे. निवडणूक काळात नेत्यांना जनतेचा कळवळा येतो. मत मागण्यापुरता त्यांचा पुळका येतो. पण सरकार स्थापन झाल्यानंतर जनतेच्या हिताचे कोणतेच निर्णय घेतले जात नाही. जनतेला कोणत्याही प्रकारच्या सवलती दिल्या जात नाही. जनता निव्वळ आश्वासनात भरडली जाते. निवडणूका संपल्या की नेत...

खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरु झाला आणि करंट लागून वेल्डिंग कारागिराचा जीव गेला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  विजेच्या धक्क्याने एका वेल्डिंग कारागिराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज १७ जूनला दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. निलेश अशोक जरिले (२७) रा. हिवरा (मजरा) ता. मारेगाव असे या करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.  मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथील एका वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या तरुणाला विजेचा जोरदार करंट लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वेल्डिंगच्या दुकानात काम करणाऱ्या या तरुणाला गावातीलच प्रसाद ठावरी यांच्या घरी वेल्डिंगच्या कामासाठी पाठविण्यात आले होते. ठावरी यांच्या घरी वेल्डिंगचे काम सुरु असतांना अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे तरुणाने इलेक्ट्रिक बोर्डला लागलेला वायर गुंडाळणे सुरु केले. परंतु तेवढ्यात वीज पुरवठा सुरु झाला. मात्र वायर इलेक्ट्रिक बोर्डला लागूनच राहिल्याने तरुणाला विजेचा जोरदार करंट लागला. वेल्डिंग कारागिराला विजेचा धक्का लागल्याचे लक्षात येताच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ विजेचा प्रवाह बंद केला. आणि तरुणाला लगेच ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. तरुणाच्...

वणी-नांदेपेरा मार्गावर आढळला इसमाचा मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी-नांदेपेरा मार्गावर एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नांदेपेरा व मजरा गावादरम्यान असलेल्या सागवान वनाजवळ सदर इसम हा मृतावस्थेत आढळून आला. रमेश बळीराम निमसटकर (५७) रा. मार्डी ता. मारेगाव असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. ते घोन्सा येथील आदर्श विद्यालयात चपराशी या पदावर कार्यरत होते. १६ जूनला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मार्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही.  १६ जूनला तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धांदल उडाली. वणी-मार्डी हा वर्दळीचा रस्ताही पावसामुळे निर्मनुष्य झाला होता. पाऊस थांबल्यानंतर नागरिकांचे मार्गक्रमण सुरु झाले. दरम्यान या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना सदर इसम हा रस्त्यावर निपचित पडून दिसला. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी आसपासच्या गावात पसरली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानं...

जुगारावर पोलिसांची धाड, सात जुगाऱ्यांना अटक तर काही पळून जाण्यात यशस्वी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरालगत असलेल्या गणेशपूर येथे सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून सात जुगाऱ्यांना अटक केली. ही कार्यवाही काल १५ जूनला दुपारी ३.३० ते ४.१५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. पोलिस आल्याची चाहूल लागताच काही जुगारी मात्र मिळेल त्या रस्त्याने पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलागही केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. सात जुगारी मात्र घटनास्थळावर जुगार खेळतांना पोलिसांना रंगेहात सापडून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून १० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील साई नगरी जवळील भोंगळे यांच्या शेताजवळ सार्वजकनिक ठिकाणी जुगार सुरु असल्याची माहिती एपीआय दत्ता पेंडकर यांना मिळाली. त्यांनी पोलिस पथकाला घेऊन घटनास्थळ गाठले. तेथे काही इसम गंजी पत्त्यावर पैशाचा जुगार खेळतांना पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याठिकाणी धाड टाकली. तरीही पोलिसांची चाहूल जुगाऱ्यांना लागलीच. पोलिसांना पाहून काही जुगारी सुसाट पळाले. पोलिसांनी त्यांचा पाठलागही केला. मात्र ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. पो...

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या, तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी शहरापासून जवळच असलेल्या राजूर (कॉ.) येथील युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १५ जूनला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विजय देवराव घोडाम वय अंदाजे ४२ वर्ष असे या गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे.  तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण प्रचंड वाढले असून नैराश्येतून युवक आत्महत्येचा मार्ग निवडू लागले आहेत. तालुक्यातील राजूर (कॉ.) येथील वार्ड क्रमांक ३ मधील हनुमान मंदिराजवळ वास्तव्यास असलेल्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक युवक हा चुना भट्ट्यावर मजुरीचे काम करायचा. मजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा गाडा हाकायचा. त्याने दुपारच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेतला. तो घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत कुटुंबियांना आढळून आला. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. विजय घोडाम याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आत्महत्या करण्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे....

दीर्घ प्रतीक्षेनंतर उपजिल्हा रुग्णालय होण्याच्या आशा पल्लवित, राजकीय हालचालींना आला वेग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा रेंगाळत असलेला प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वणी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर व्हावे, ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. परंतु शासकीय स्तरावरून याची दखल घेण्यात आली नाही. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही मागणी सतत लावून धरल्याने उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे. मनसेच्या पाठपुराव्यामुळे उपजिल्हा रुग्णालय साकार होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी नुकतीच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यांच्याशी शासकीय रुग्णालयातील आरोग्यसेवेचा दर्जा वाढविण्याबाबत चर्चा करतांनाच वणी येथे उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याची मागणी देखील केली. आरोग्य मंत्र्यांनी त्यांच्या मागणीची दखल घेत वणी येथे लवकरच उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे वणी येथे आता दीर्घ प्रतिक्षेनंतर उपजिल्हा रुग्णालय साकार होण्याचा मार्ग मोकळा झाला ...

शहरातील समस्या व जनतेच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेसचे धरणे आंदोलन, प्रशासनाला दिला ७ दिवसांचा अल्टिमेटम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरातील विभिन्न समस्या व शहरवासीयांच्या प्रश्नांना घेऊन काँग्रेस वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज १३ जूनला तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते व कापूस पणन महासंघाचे संचालक संजय खाडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला. गोर गरीब कष्टकरी जनता व कास्तकारांना भेडसावणाऱ्या समस्या तथा शहरवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन काँग्रेसने तहसिल कार्यालयासमोर धरणे दिले. यावेळी शासन व प्रशासनाच्या दुटप्पी धोरणावर आंदोलनकर्त्यांनी कडाडून टीका केली. तसेच शेतकरी, कष्टकरी व बेरोजगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारवर ताशेरे ओढण्यात आले. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उपविभागीय अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ७ दिवसांत मागण्यांची दखल न घेतल्यास उपोषणाला बसण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलनाची सांगता झाली. शहरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पाणी पुरवठा नियमित होत नाही....