पाच उमेदवारी अर्ज रद्द, ४ नोव्हेंबर पर्यंत स्पष्ट होईल उमेदवारांचे खरे चित्र

प्रशांत चंदनखेडे वणी विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढल्याने राजकीय वातावरण तापू लागलं आहे. मतदार संघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राजकीय घडामोडी तीव्र झाल्या आहेत. पक्षांचे कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. लोकशाहीचा हा उत्सव साजरा करण्याकरिता मतदारही सज्ज झाले आहेत. २० नोव्हेंबरला विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. विधानसभा लढविण्यास इच्छुक असलेल्या २० उमेदवारांनी वणी मतदार संघातून आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. काल ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जांची पडताळणी करण्यात आली. यात ५ उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. उमेदवारीसाठी आवश्यक निकषांची पूर्तता करण्यात न आल्याने किंवा उमेदवारी अर्ज भरतांना काही त्रुटी राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पडताळणी दरम्यान ५ उमेदवारी अर्ज रद्द केले. निवडणुकीतून नामांकन वापस घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात राहतील हे स्पष्ट होणार आहे. वणी मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळविण्यासाठी घमासान पाहायला मिळाले. अनेकांनी उमेदवारी मिळविण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न...