Posts

Showing posts from May, 2023

डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच केला रहस्यमय खुनाचा उलगडा, तरुणीच्या खुन्याला केले जेरबंद

Image
  वणी घुगगुस मार्गावरील जैन ले - आऊट परिसरात असलेल्या कृष्णा अपार्टमेंट या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर किरायाने रहात असलेल्या तरुणीचा काल 29 मे ला अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली होती. या तरुणीचा अज्ञात इसमाने खून केल्याचे नंतर पोलिस तपासात निष्पन्न झाले. घटनेचा उलगडा व खुण्याचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर  उभे ठाकले होते. अशातच डीबी पथक प्रमुख माधव शिंदे यांनी तपासाची सूत्रे हाती घेत अवघ्या काही तासांतच घटनेचा उलगडा करीत खुन्याला अटक केली. सपोनी माधव शिंदे यांनी आव्हानात्मक ठरलेल्या खुनाच्या या रहस्यमय घटनेचा जलद तपास करीत आरोपीला गजाआड केले. विविध अँगलने तपास करीत त्यांनी खून करून पसार झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील तरुणाला मोठ्या शिताफीने अटक केली. विनोद रंगराव शितोळे (25) रा. शीरोळी ता. वसमत जि. हिंगोली असे या पोलिसांनी अटक केलेल्या खुण्याचे नाव आहे.  शहरातील कृष्णा अपार्टमेंट मध्ये पहिल्या माळ्यावर किरयाने रहात असलेल्या प्रिया रेवानंद बागेसर उर्फ आरोही वानखेडे (25) या तरुणीचा बंद खोलीत मृतदेह आढळून आला. तिचा दोन ते तिन दिवसांपूर्वीच खून ...

युवा, तडफदार व लोकप्रिय नेता हरपला, खासदार बाळू धानोरकर यांचं अल्पशा आजारानं निधन

Image
  युवा, तडफदार राजकीय नेते म्हणून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात लोकप्रिय असलेले खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचं आज 30 मे ला पहाटे 3.30 वाजता दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय जेमतेम 48 वर्ष होतं. खासदार बाळू धानोरकर हे एक चतुर राजकारणी म्हणून ओळखले जायचे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले महाराष्ट्रातील काँग्रेसचे ते एकमेव खासदार होते. प्रखर राजकीय नेतृत्व म्हणून ते उभरले होते. वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास लोकसभा क्षेत्रापर्यंत पोहचला. चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून दणदणीत विजय संपादन करतानाच त्यांनी वरोरा भद्रावती विधानसभा मतदार संघातून आपल्या सहचारणीचा विजय साकार केला. मतदारसंघातील विकास कामांबरोबरच नागरिकांच्या कामांनाही प्राथमिकता देणारा नेता म्हणून खासदार बाळू धानोरकर यांना लोकपासंती मिळाल्याने त्यांच्या विजयाचं सत्र अविरत सुरू राहिलं. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेलं हे लोकप्रिय नेतृत्व हरपल्याने मतदारसंघात व त्यांच्या चाहत्यांमध्य...

क्रीष्णा अपार्टमेंट मधील खोलीत आढळला युवतीचा अर्धनग्न मृतदेह, घातपाताचा वर्तविला जात आहे संशय

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी :- वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. आज 29 मे ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवती जवळ आढळून आल्याने तिचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल. ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. युवतीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.  शहरातील क्रीष...

इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीच असाध्य नसतं, हे दाखवून दिलं तालुक्यात तिसरी आलेल्या सोनम हिने

Image
   प्रशांत चंदनखेडे वणी   इच्छाशक्ती प्रबळ असली की काहीच असाध्य नसतं. जिद्द उराशी बाळगली की यशही खेचून आणता येतं. जिद्द, चिकाटी व परिश्रम ही यशाची त्रिसूत्री आहे. पराक्रम गाजवायचा असेल तर हालाकीच्या परिस्थितीने खचून चालत नाही. परिस्थितीतून उभारावं लागतं. पूरक परिस्थिती नसली तरी शिक्षणाची आवड असली पाहिजे. शिक्षणाचा ध्यास घेतला की, अभ्यासाची आपसूकच सवय जडते. मग प्रतिकूल परिस्थितीचाही विचार मनाला शिवत नाही. परिस्थितीचा बगलबुवा करीत शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांपुढे सोनम रघुवीर चंदेल या विद्यार्थिनीने एक आदर्श ठेवला आहे. सोनमला १२ वि विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के गुन मिळाले आहेत. आज २५ मे ला उच्च माध्यमिक शालांत परीक्षांचे (एचएससी) ऑनलाईन निकाल जाहीर झाले. या परीक्षेत लोकमान्य टिळक महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनम चंदेल हिला विज्ञान शाखेत ८६.३३ टक्के एवढे गुन मिळाले आहेत. पंचशील नगर येथील चंद्रमौळी झोपडीत राहणाऱ्या सोनम हिने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तुंग भरारी घेतली आहे. विद्यार्जनाची गोडी असलेल्या सोनमने पुस्तकालाच आपला गुरु मानला. आपल्या ज्ञानाच्या...

सामाजिक जाणिव जपणाऱ्या संजय खाडे यांचा वाढदिवसही सामाजिक जाणीव ठेऊनच केला साजरा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  उकनी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, रंगनाथ स्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष, वसंत जिनिंगचे संचालक व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले संजय खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमाला आर्थिक सहाय्यता देण्याबरोबरच निराधार वृद्धांना कुटूंबासह फळ वाटप करतांनाच त्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली. वृद्धाश्रमात कुटुंबासह जाऊन निराधार वृद्धांसोबत काही क्षण घालवून त्यांच्याप्रती दाखविलेल्या आस्थेमुळे निराधार वृद्धांचे मनही गहिवरून आले.  आयुष्याच्या सायंकाळी आपल्या हक्काच्या माणसांनी दूर लोटलेल्या वृद्धांना मायेचा ओलावा देऊन त्यांच्या मनातील दुःखाचा वणवा शांत करण्याचा प्रयत्न करतांनाच त्यांच्यात परिस्थितीचा सामना करण्याची ऊर्जा भरणारा आपुलकीचा संवाद साधल्याने रक्ताच्या नात्यांनी दूर लोटलेल्या वृद्धांना माणुसकीच्या नात्याचं दर्शन घडलं. काही क्षण का होई ना खाडे परिवाराने वृद्धांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलविले. सामाजिक कार्याचा वसा घेतलेल्या संजय खाडे यांनी उदारमतवादी व्यक्तिमत्वाचा नेहमी परिचय दिला आहे. त्यांच्या हात...

पुरड (नेरड) येथील इसमाने घेतला विषाचा घोट

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील पुरड (नेरड) येथील रहिवासी असलेल्या इसमाने राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज २५ मे ला सकाळी उघडकीस आली. संभाजी यादव बदखल (५०) असे या विषाचा घोट घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आल्यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वणी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह अंतिम संस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.   संभाजी बदखल यांनी सकाळी ९ वाजताच्या सुमारास राहत्या घरी विष प्राशन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ संभाजीला शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यांना वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. संभाजी बदखल यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. शिरपूर पोलिस त्यांच्या आत्महत्या करण्यामागच्या...

आभई फाटा चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची सरपंच हेमंत गौरकार यांची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी कोरपना मार्गावरील आभई फाटा चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी खांदला ग्रामपंचायतेचे सरपंच हेमंत गौरकार यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. आभई फाट्यावर अपघात वाढले असून आभई फाट्याला जोडणाऱ्या वणी, कोरपना व शिंदोला या तीनही रस्त्यांवर गतिरोधक बसविने गरजेचे झाले आहे. अन्यथा भविष्यात आभई फाटा चौफुलीवर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.   आभई फाटा ही चौफुली वाहतुकीने नेहमी गजबजलेली असते. आभई फाट्याला जोडलेल्या तीनही मार्गाने मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. आभई फाट्यावरून कोळसा वाहतुकीची वाहने सुसाट धावतात. मालवाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे आभई फाट्यावर कित्येक अपघात देखील झाले आहेत. या अपघातात निष्पाप जीवांचे बळी देखील गेले आहेत. आभई फाटा चौफुलीवर झालेल्या अपघातात आतापर्यंत ९ जनांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे या चौफुलीवर गतिरोधक बसविणे गरजेचे झाले आहे.  वणी, शिंदोला व कोरपना हे तिन्ही मार्ग आभई फाट्याला जोडलेले आहेत. या तीनही मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व मालवाहतूक...

राजूर ग्रामपंचायतचे हुकूमशहा धोरण, ग्रा.प. सदस्याला डावलून घेतली जाते मासिक सभा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची पूर्व सूचना न देता जाणीवपूर्वक ग्रामपंचायत सदस्याला मासिक सभेतून डावलण्यात येत असल्याची तक्रार राजूर ग्रामपंचायत सदस्य बबिता सिंह यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे. बबिता सिंह या राजूर कॉलरी येथील वार्ड क्रमांक ६ मधून निवडून आल्या आहेत. त्या ग्रामपंचायतेच्या सक्रिय सदस्य असून त्यांना ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची माहितीच दिली जात नसल्याची लेखी तक्रार त्यांनी बीडीओ कडे केली आहे. बबिता सिंह यांना ग्रामपंचायतेच्या मासिक सभेबाबत माहिती न मिळाल्याची ही दुसरी वेळ असून त्यांना जाणीवपूर्वक मासिक सभेतून डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायत सदस्याला मासिक सभेची कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देणे म्हणजे त्याच्या अधिकाराचे हनन करण्यासारखे आहे. बबिता सिंह यांच्या वार्डातील विकासकामे करण्यासंदर्भातही दुजाभाव केला जात असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. ग्रामपंचायतेच्या मासिक सभेची पूर्व सूचना न देता ग्रा.प. सदस्याला जाणीवपूर्वक सभेतून डावलणाऱ्या सरपंच व ग्रामसचिव यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याच...

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. विनायक एकरे, तर भाजपचे विजय गारघाटे यांना मिळाला उपसभापती पदाचा मान

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणित शेतकरी एकता पॅनलने १४ जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केल्यानंतर आज २४ मे ला सभापती व उपसभापती पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ऍड. विनायक एकरे यांचीच यावेळी सभापती म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तर उपसभापती म्हणून भाजपचे विजय गारघाटे यांची निवड करण्यात आली आहे. ऍड. विनायक एकरे हे कधी काळी काँग्रेसचे मातब्बर नेते मानले जायचे. पण त्यांनी काँग्रेसचा हात सोडला व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्याशी जवळीक साधली. भाजप समर्पित पॅनलच्या माध्यमातून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लढविली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सोबत त्यांनी निवडणुकीची रणनीती आखत १४ जागांवर दणदणीत विजय मिळविला. मतदारांचे मनं वळविण्याबरोबरच महाविकास आघाडीतील नाराजांनाही त्यांनी आपल्याकडे वळविले. विद्यमान आमदार व माजी सभापती यांनी या निवडणुकीत अस्सल डावपेच आखून १४ संचालकांचा विजय साकार केला. आणि याचेच फलित म्हणून ऍड. विनायक एकरे यांना सभापती पद बहाल करण्यात आले....

टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने होत आहे वाहतुकीची कोंडी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी घुग्गुस मार्गावरील टोल नाक्यावर वाहनांच्या नेहमी रांगा लागत असल्याने हा टोल नाका मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. या टोल नाक्यावर पथकर भरणाऱ्या वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत असल्याने या ठिकाणी नेहमी वाहतुकीची कोंडी होतांना दिसते. तासंतास या टोल नाक्यावर वाहतुकीचा जाम लागत असल्याने वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. या टोल नाक्याचं नेहमी एकच टोल काउंटर सुरु रहात असल्याने पथकर भरण्याकरिता वाहनांच्या लांबलचक रांगा लागत असल्याची ओरड वाहनधारकांमधून ऐकायला मिळत आहे. शहरालगत असलेला हा टोल नाका हटविण्याची मागणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केली असतांनाही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने पाणी कुठं तरी मुरत असल्याची चर्चा शहरवासियांमधून ऐकायला मिळत आहे.  वणी घुग्गुस वळण रस्त्यापासून अगदी जवळच आरव्हीसीएल कंपनीने हा टोल नाका उभारला. कोळसाखाणींमधून रेल्वे सायडिंगवर कोळशाची अंतर्गत वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून पथकर वसुलता यावा या मुख्य उद्देशाने शहराजवळ हा टोल नाका उभारण्यात आला. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाह...

गोंडबुरांडा येथील नवविवाहित महिलेने केली आत्महत्या, वर्षभराच्या संसारातच तिने केला जीवनाचा शेवट

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका नवविवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २० मे ला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या महिलेचा गावातीलच युवकाशी एक वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. रिना सुनिल मुसळे (२०) असे या गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.  रिनाचा गोंडबुरांडा या गावातील सुनिल नावाच्या युवकाशी प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येते. ती पती सोबत आपल्या सासरी नांदत असतांना अचानक तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्य शेतात गेले होते. ती घरीच होती. या दरम्यान तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सासरची मंडळी शेतातून घरी परतली तेंव्हा त्यांना रिना घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी ही माहिती पोलिस स्टेशनला दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. प्रेमातून विवाह बंधनात अडकलेल्या रिनाने टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण रिनाच्या आत्महत्या करण्याने त्यांच्या संसारिक जीवनाचा शे...

वेकोलि प्रशासन उठलं नागरिकांच्या जीवावर, कोळसाखानींमुळे निर्माण झालेल्या समस्या ठरत आहे जीवघेण्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वेकोलीच्या कोळसाखानींमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याकडे वेकोलि प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कोळसाखानीलगत वास्तव्यास असलेल्या गावकऱ्यांमध्ये वेकोलि प्रशासनाविरुद्ध कमालीचा असंतोष खदखदत आहे. वेकोलि वणी नॉर्थ क्षेत्राच्या मुख्य महाप्रबंधकांनी मनमानी धोरण अवलंबिले असून खान बाधित क्षेत्रातील नागरिकांच्या कोणत्याही मागण्या ते गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होतांना दिसत आहे. मागील काही महिन्यात वेकोलि प्रशासनाच्या सुलतानी धोरणाविरोधात बरेच आंदोलन झाले. पण वेकोलि प्रशासनाचा तोरा मात्र कायम राहिला. कधी आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यात आले. तर कधी थातुरमातुर आश्वासने देऊन आंदोलनकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. लोकप्रतिनिधी व सत्ताधारी पक्षातील नेत्यांनाही गावकऱ्यांच्या समस्यांना घेऊन वेकोलि विरोधात दंड थोपटावे लागले. पण त्यांच्या इशाऱ्यांनाही वेकोलि प्रशासनाने सहजतेने घेतले. वेकोलि प्रशासनाच्या एकाधिकारशाहीमुळे सारेच हतबल झाले असून वेकोलिच्या तानाशाहीमुळे आत्महत्या कारण्याचा निर्णय घेण्यापर्यंतची वेळ नागरिकांवर आली आहे.  वेकोलिच्या...

जबरी चोरी करण्याच्या तयारीत असलेल्या चार अट्टल चोरट्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  गोकुलनगर परिसरातील पीर दर्ग्याजवळ जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दडून बसलेल्या चार अट्टल चोरट्यांना पोलिसांनी काल मध्यरात्री मोठ्या शिताफीने अटक केली. काल १८ मे ला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार अमावस्या नाकाबंदी मोहीम शहरात राबविण्यात आली. सपोनि दत्ता पेंडकर यांच्या नेतृत्वात १० ते १५ पोलिसांचे पथक शहरात नाकाबंदी व गस्त घालत असतांना पीर दर्ग्याजवळ मध्यरात्री चार युवक संशयितरित्या आढळून आले. हे चारही जन जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दर्ग्याजवळ लपून बसले होते. पोलिसांनी त्यांना मोठ्या शिताफीने अटक केली. हे चारही जन अट्टल चोरटे असून त्यांच्यावर पोलिस स्टेशनमध्ये विविध गुन्हे नोंद आहेत. या चारही आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.  शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून पोलिसांनी शहरात गस्त वाढविली आहे. पोलिसांनी गुन्हेगारांच्या कुंडल्या तयार केल्या असून गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष केंद्रित केलं आहे. गुन्हेगारी कारवायांवर बारीक लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांनी काल मध्यरात्री जबरी चोरी करण्याच्य...

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश, तीन तस्करांना अटक व १६ लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अमली पदार्थाच्या तस्करीचा पर्दाफाश करीत आलिशान कारमधून अवैध विक्री करीता अमली पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तीन तस्करांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून पोलिसांनी १६ लाख ४७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबी पथकाने काल १८ मे ला दारव्हा मार्गावर ही धडक कार्यवाही केली. दारव्हा मार्गे महागड्या अमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय माहिती एलसीबी पथकाला मिळाली. एलसीबी पथकाने या मार्गावर सापळा रचून माहितीदाराने सांगितलेल्या वर्णनाच्या कारकडे बारीक लक्ष ठेवले. त्या वर्णनाची कार येतांना दिसताच पोलिसांनी कारला थांबवून कारची झडती घेतली असता कारच्या डिक्कीत एका पॉकिटमध्ये पांढरा पॉवडर आढळून आला. हा पॉवडर म्हणजे ड्रग्ज असल्याचे पोलिस तपासात समोर आले. महागडी नशा करणाऱ्यांची तलब भागविण्याकरिता हा ड्रग्ज पुरविला जातो. आर्थिकदृष्ट्या सक्षम व महागड्या नशेची तलब ठेवणारे अनेक जन ड्रग्जची नशा करतात. ड्रग्जचे सेवन करणारे काही ठराविक शौकीन असले तरी ड्रग्जच्या तस्करीतून मोठी आर्थिक उलाढाल होते. तस्करांना अमली पदार्थाच्या तस्करीतून मोठा आ...

वणी पोलिस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात नागरिकांनीही केलं विक्रमी रक्तदान

Image
प्रशांत चंदनखडे वणी   जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम साकारले जात असतांनाच समाजहिताच्या कार्यांनाही चालना दिली जात आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्याचं आपल्या प्रकृतीकडे होत असलेलं दुर्लक्ष व शरीराची हवी तशी काळजी घेतली जात नसल्याने मनुष्यांमध्ये विविध शारीरिक व्याधी निर्माण होऊ लागल्या आहेत. काही दुर्धर आजार जडलेल्या व्यक्तींना नेहमी रक्ताची गरज भासते. मानवी जीवनातील बदलामुळेही मनुष्याला अनेक गंभीर आजारांची लागण होऊ लागली आहे. यातील काही आजारग्रस्त रुग्णांना वारंवार रक्त चढवावं लागतं. तसेच अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अपघातात अती रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तींनाही रक्ताची गरज भासत असल्याने रक्त पेढीत पुरेसा रक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे. याकरिता सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकानेच रक्तदान करणं गरजेचं असून रक्तदान शिबिरांचं आयोजन ही एक सामाजिक जबाबदारी झाली आहे. त्यामुळे या सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. त्याच अनुषंगाने काल १६ मे ला वणी पोलिस स्टेशन ये...

वणी पोलिस स्टेशन येथे आज भव्य रक्तदान शिबीर, रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी घेतला पुढाकार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  यवतमाळ जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. आज १६ मे ला वणी पोलिस स्टेशनच्या दक्षता सभागृहात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत पर्यंत हे शिबीर राहणार आहे. आजचा हा धकाधकीचा काळ व मनुष्याची बदललेली जीवनपद्धती यामुळे मानवाला विविध आजारांची लागण होऊ लागली आहे. काही असे आजार आहेत की ज्यामुळे शरीराला सतत रक्ताची गरज भासते. तसेच अपघातात अती रक्तस्त्राव झालेल्या व्यक्तींनाही रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्त पेढीत पुरेसा रक्त साठा उपलब्ध रहावा याकरिता सुदृढ लोकांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. रक्ताच्या उप्लब्धतेअभावी कोणत्याही रुग्णाचा जीव जाऊ नये, हा मानवी दृष्टिकोन जोपासून प्रत्येकाने रक्तदान करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या रक्तामुळे कुणाचा जीव वाचू शकतो, याची जाणीव ठेऊन नागरिकांनी पोलिस स्टेशन येथे आयोजित रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभाग दर्शविण्याचे आव्हान पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कारण रक्त हे कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. ते शरीरातच ...

तालुक्यात अपघाताचे सत्र सुरूच, अज्ञात वाहनाच्या धडकेत आणखी एका युवकाचा गेला बळी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहराला जोडणारे प्रमुख रस्ते मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. मालवाहू वाहतुकीची वाहने मार्गात काळ बनून निष्पाप जीवांचे बळी घेऊ लागली आहे. मालवाहू वाहतुकीच्या वाहनांमुळे प्रमुख रस्ते आता मृत्यूचा मार्ग बनले आहेत. मुख्य मार्गांवर अपघातांचं सत्र सुरुच असून अपघातांमुळे नागरिकांचे नाहक बळी जाऊ लागले आहेत. सतत होणाऱ्या या अपघातांमुळे तालुका चांगलाच हादरला आहे. वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरात काल १४ मे ला रात्री ९.३० वाजताच्या सुमारास आणखी एक अपघाताची घटना घडली. लालपुलिया परिसरातील एफसीआय कोलडेपो जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत केरला टायर येथे कामाला असलेला अब्दुल सत्तार मोहम्मद नाजीर वय अंदाजे ५० वर्ष हा युवक जागीच ठार झाला. अज्ञात वाहनाने त्याला अक्षरशः चिरडल्याने त्याच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरले होते.  अपघातात मृत्युमुखी पडलेला हा युवक दोन ते तीन दिवसांपूर्वीच केरला टायर येथे कमला लागल्याचे सांगण्यात येते. तो परप्रांतीय असून सध्या नागपूर येथे वास्तव्यास असल्याचे समजते. हल्ली तो केरला टायर येथे मजुरांसाठी असलेल्या निवास्थ...

निळापूर जवळ कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक समोरासमोर भिडले, एका ट्रकचा चालक गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   कोळसा वाहतूक करणारे दोन ट्रक समोरासमोर भिडल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास निळापूर गावालगत असलेल्या संभवनाथ ऑईल मिल जवळ घडली. निळापूर गावाजवळील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व त्याने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमधून ऐकायला मिळत होती. रस्त्यावरील खड्डे अपघाताचे कारण बनू लागले असतांनाही वेकोलि प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे कानाडोळा करतांना दिसत आहे. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) पर्यंतच्या रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्याच्या मागणीला घेऊन नुकतेच ब्राह्मणी गाववासीयांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. परंतु वेकोलिने केवळ आश्वासन देऊन गाववासीयांची मनधरणी केली, व त्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडले. रस्त्याची दुरुस्ती करण्याचा वेकोलिने कोणताही ठोस निर्णय जाहीर केला नसून वेकोलि प्रशासन केवळ आश्वासन देऊन चालढकल करीत आहे. वेकोलि प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे रस्त्य...

अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कुलची आर्या चौधरी सीबीएसई बोर्डाच्या एसएससी परीक्षेत जिल्ह्यात दुसरी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (सीबीएसई) काल १२ मे ला निकाल जाहीर करण्यात आले असून सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. शहरातील अल्फोर्स स्वर्णलीला इंटरनॅशनल या इंग्रजी माध्यमिक शाळेतील १० वि ची विद्यार्थिनी आर्या मनिष चौधरी ही ९८.२० (५०० पैकी ४९१) टक्के गुण घेऊन यवतमाळ जिल्ह्यातून दुसरी तर वणी उपविभागातून पहिली आली आहे. केवळ एका गुणामुळे तिचा प्रथम क्रमांक हुकला. तल्लख बुद्धी व अभ्यासू असलेल्या आर्याने जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केलं आहे.  आर्याने हिंदी, गणित व आय.टी या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले आहे. आय.टी. हा ऐच्छिक विषय असल्याने या विषयाचे गुण मुख्य विषयांच्या गुणांमध्ये जोडण्यात आले नाही. अन्यथा तिला ९८.५० टक्के एवढे गुण मिळाले असते. आर्याला शाळेतील शिक्षकांचं योग्य मार्गदर्शन व कुटुंबीयांचं वेळोवेळी प्रोत्साहन मिळाल्याने तीने हे यशाचं शिखर गाठ लं आहे . आर्याने आपल्या यशाचे श्रेय्य तिचे आई, वडील, काका, काकू व शाळेतील शिक्षकांना दिले आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तीला पु...

कोळसा व खनिजांच्या वाहतुकीमुळे अपघातात झाली मोठी वाढ, बेशीस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची होऊ लागली आहे मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   बेशिस्त वाहतुकीमुळे वणी तालुक्यात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तालुक्यात कोळसा, डोलोमाइट व लाइमस्टोनच्या खानी असल्याने मुख्य मार्गांनी दररोज शेकडो ट्रक खनिजांची वाहतूक करतांना दिसतात. कोळसाखाणींमुळे मालवाहू वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातल्यात्यात डोलोमाइट, लाइमस्टोन व अन्य गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. प्रमुख रस्ते मालवाहू वाहनांनी नेहमी गजबजलेले असतात. मालवाहू वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे छोट्या वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. मालवाहू वाहनांमुळे झालेल्या अपघातात अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. काही वाहनचालकांची लापर्वाही निष्पाप नागरिकांच्या जीवावर बितु लागली आहे. वाहनचालकांचे मस्तीत वाहन चालविणे मार्गक्रमण करणाऱ्या छोट्या वाहधारकांसाठी आता धोकादायक ठरू लागले आहे. त्यातच बेजबाबदारपणाचा कळस म्हणजे मुख्य रस्त्यांवर तासंतास वाहने उभी ठेवली जातात. या रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे कित्येक दुचाकीस्वारांचे बळी गेले आहेत. रस्त्यांवर उभी असणारी वाहने अपघातास कारणीभूत ठरली असतांनाही अशा वाहनांवर व व...

सतत होणाऱ्या अपघातात जाऊ लागले आहेत निष्पाप जीवांचे बळी, आज आणखी दोन तरुणांना अपघातात गमवावा लागला जीव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  सिमेंट वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकखाली चिरडून दोन तरुणांचा करुन अंत झाल्याची घटना आज १२ मे ला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया परिसरातील कळमना वळण रस्त्याजवळ घडली. हे दोन्ही तरुण मेघदूत कॉलनीत रहिवासी असलेल्या आपल्या नातेवाईकाकडे लग्न समारंभाकरीता आले होते. लग्न घरी काही किरकोळ वस्तू घेऊन जात असतांना काळ आडवा आला, व मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने आपला डाव साधला. दोनही तरुण अविवाहित होते. सिमेंट भरलेल्या ट्रकखाली ते अक्षरशः चिरडल्या गेल्याने त्यांच्या शरीराचे अवयव रस्त्यावर विखुरल्या गेले होते. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचा ताफाच घटनास्थळी दाखल झाला. एसडीपीओ संजय पुज्जलवार, ठाणेदार प्रदीप शिरस्कर, वणी वाहतूक उपशाखा प्रमुख संजय आत्राम, एपीआय माया चाटसे, सपोनि माधव शिंदे, सपोनि आशिष झिमटे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती हाताळली. काही काळ जनभावना उफाळून आल्या होत्या. नातेवाईकांमधूनही रोष व्यक्त होत होता. वाहनांच्या देखील दुतर्फा रांगा लागल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. ही सर्व परिस्थिती पोलिसांनी योग्यरीत्या हाता...

बहुजन समाजावर अन्याय होऊनही मौन साधणाऱ्या पुढाऱ्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली, माजी मंत्री राजेंद्रपाल गौतम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  साडेतीन हजार वर्षाची गुलामी तोडून शोषित, पीडित व दीनदुबळ्या घटकांच्या उत्थानासाठी एकाकी लढा देऊन त्यांना समाजात सन्मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या बाबासाहेबांच्या विचारांशी व समाजाशी एकनिष्ठ न राहणाऱ्या बहुजन समाजातील काही गद्दारांना व राजकीय नेत्यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असून त्यांच्या जागी तडफदार व सामाजहिताचा विचार करणाऱ्या तथा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांकडे सामाजिक व राजकीय नेतृत्व सोपविण्याची गरज निर्माण झाली असल्याचे परखड विचार बाबासाहेबांच्या प्रबुद्ध भारताच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास घेतलेले दिल्ली सरकारचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेंद्रपाल गौतम यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच वणी द्वारा आयोजित जाहीर व्याख्यान कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारवंत प्रा.डॉ. इसादास भडके व वामनदादा कर्डक साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ. सागर जाधव हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेंद्रपाल गौतम यांनी बाबासाहेबांच्या भारत बौद्धमय करण्याच्या स्वप्नाचा उल्लेख करतां...

ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार जागीच ठार, वणी मुकुटबन मार्गावरील घटना

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी   कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल ७ मे ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वणी मुकुटबन मार्गावरील क्वालिटी टाईल्स शोरूम जवळ घडली. कोळसा भरलेल्या ट्रकने दुचाकीस्वाराला अक्षरशः चिरडले. यात त्याच्या जागीच मृत्यू झाला. मृतक हा कोळसा क्षेत्रात कार्यरत असल्याचे समजते. संजय गोयंका वय अंदाजे ५० वर्ष रा. आर. के. अपार्टमेंट चिखलगांव असे या अपघातात दुर्दैवी मुत्यू ओढावलेल्या इसमाचे नाव आहे.   घोन्सा कोळसाखानीतून वेकोलिच्या रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने (MH २९ BE ६१५५) कोलडेपो मधील कामे आटपून घरी जात असलेल्या इसमाच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दुचाकीस्वार ट्रकखाली अक्षरशः चिरडल्या गेला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चिखलगाव येथील रहिवासी असलेल्या संजय गोयंका या कोळसा क्षेत्रात काम करणाऱ्या इसमाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे.  कोळसा वाहतुकीच्या सुसाट वाहनांमुळे अपघातात मोठी वाढ झाली असून...

रस्ता दुरुस्तीकरणाच्या मागणीला घेऊन ब्राह्मणी ग्रामपंचायतेने केले रस्ता रोको आंदोलन, रोखून धरली वेकोलिची कोळसा वाहतूक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरून उकनी कोळसाखानीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) रस्त्याची तर फारच दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याने मार्गक्रमण करणे देखील कठीण झाले आहे. या रस्त्यावरून दुचाकीचा प्रवास अतिशय जिकरीचा झाला आहे. या रस्त्याने दुचाकी चालवितांना तारेवरची करावी लागत आहे. या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघातही घडले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची वेळोवेळी मागणी करूनही वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर  ब्राह्मणी ग्रामचयतेच्या माध्यमातून आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाच्या मागणीला घेऊन आज रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.  कोळसाखानी मधून होणारी कोळशाची वाहतूक गाववासीयांनी आज रोखून धरली. कोळसा वाहतुकीचे ट्रक गावकऱ्यांनी रोखून धरल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ब्राह्मणी फाटा ते अहेरी (बोरगाव) रस्त्याची दुरु...

वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा सुरु, फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर आकाराला जात आहे दंड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझा सुरु झाल्याने फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर दंड आकारून पथकर वसुली करण्यात येत आहे. फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर पथकर व अतिरिक्त शुल्क आकारून टोल वसूल करण्यात येत असल्याने वाहनधारकांना चांगलाच भुर्दंड सहन करावा लागत आहे. टोल प्लाझा सुरु होणार असल्याची कोणतीही पूर्व सूचना न मिळाल्याने वाहनधारकांनी फास्ट टॅग घेऊन ते वाहनांवर लावले नाही. ३ मे ला अचानक टोल प्लाझा सुरु करण्यात आला. आणि फास्ट टॅग नसलेल्या वाहनांवर दंड आकारण्यात आला. वणी वरोरा मार्गाने शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. कोळसा वाहतूकदारांना टोल प्लाझा सुरु होण्याची पूर्व सूचनाच न मिळाल्याने त्यांनी फास्ट टॅग घेऊन ते वाहनांवर लावले नाही. त्यामुळे आता या वाहनधारकांकडून पथकाराबरोबरच दंडाची रक्कमही वसूल केली जात असल्याने वाहनधारकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे.  वणी वरोरा मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. या मार्गाचे काम पूर्ण होताच या मार्गा...