Posts

Showing posts from March, 2024

अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अभिकर्त्याचा उपचारादरम्यान मृत्यू

Image
 उभ्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा आज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश नरसिंग पुण्यानी (53) रा. जैन स्थानक जवळ वणी असे या अपघाती मृत्यु झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते मल्टीस्टेट सोसायटी व पतसंस्थांचे दैनंदिन बचत अभिकर्ते म्हणून निधी गोळा करण्याचे काम करायचे. काल 28 मार्चला रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील मंगरूळ गावाजवळ त्यांचा अपघात झाला. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचार सुरू असतांनाच त्यांचा मृत्यू झाला. शहरातील विविध पतसंस्था व मल्टीस्टेट सोसायटीचे दैनंदिन बचत अभिकर्ता म्हणून ते वणी पासून तर मारेगाव पर्यंत निधी गोळा करण्याचे काम करायचे. राजूर येथील कलेक्शन करून ते मारेगाव कडे जात असताना त्यांना मोबाईल कॉल आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली, व मोबाईलवर बोलत असतांनाच वणी कडून मारेगावकडे भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की ते दूरवर फेकल्या गेले. यात त्यां...

संसारिक जीवनाला जेमतेम सुरुवात झाली आणि तिने घेतला गळफास

Image
  वणी तालुक्यातील पळसोनी येथील एका विवाहित युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल 27 मार्चला दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  प्रणिता शंकर भट (२५) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. पती कामावर गेल्यानंतर तिने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ एक आत्महत्या होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संपुदेशन करणे नितांत गरजेचे झाले आहे.  पळसोनी येथे पतीसोबत राहत असलेल्या युवतीने घराच्या लोखंडी आड्याला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. पती वणी येथे कामावर गेल्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान शंकरची आई त्याच्या घराकडे आली असता त्यांना प्रणिता ही घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. महिलेच्या आत्महत्येचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तिने आत्मघाती निर्णय घेतल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पत्नीने गळफास घेतल्याचे शंकरला कळताच तो तत्काळ घरी पोहोचला. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून म...

नवरगाव धरणाजवळ संशयास्पद स्थितीत आढळला तरुणाचा मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   मारेगाव पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नवरगाव धरण परिसरातील झुडपात आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. वणी तालुक्यातील रासा येथील रहिवाशी असलेल्या तरुणाचा हा मृतदेह असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मृतदेहाजवळ विषारी औषध आढळल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रज्योत भिमराव मुन (२१) असे या मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. २६ मार्चला तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला व २७ मार्चला सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आल्याने कुटुंबं पुरतं हादरलं आहे. त्याच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा कयास वर्तविला जात आहे.  वणी तालुक्यातील रासा या गावात कुटुंबियांसह वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणाजवळ मृतदेह आढळून आला. प्रज्योत भिमराव मुन असे या मृतक तरुणाचे नाव आहे. तो मारेगाव येथे शिक्षण घेत असल्याचे समजते. वणी येथे एका इलेक्ट्रिक दुकानात त्याची कामासाठी बोलणी झाली होती. कामाचा पहिला दिवस असल्याचे सां...

राजूर (कॉ.) येथे विहिरीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली, गावातीलच व्यक्तीचा मृतदेह असल्याचे तपासात निष्पन्न

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील राजूर कॉलरी येथिल एका पडक्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना काल २५ मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. काल उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. परंतु आज या मृतदेहाची ओळख पटली असून मृतक हा राजूर (कॉ.) येथीलच रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. नामदेव पोचम्मा शेनुरवार (५०) रा. वार्ड क्रमांक २ राजूर (कॉ.) असे या मृतक व्यक्तीचे नाव आहे. तो मागील सहा ते सात दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याचे मृतकाच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात येत आहे. तो नातेवाईकांकडे गेला असावा असा अंदाज बांधून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला नाही. दरम्यान धुळीवंदनाच्या दिवशी कोळसा सायडिंग जवळ मस्जिद परिसरात असलेल्या एका पडक्या विहिरीत त्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला. त्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत निरनिराळे निष्कर्ष लावण्यात येत असले तरी पोलिसांकडून मात्र घातपाताच्या शंकेला अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य परिस्थिती समोर ...

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी ६४ उमेदवारी अर्जाची उचल, काँग्रेस, भाजपमध्ये होईल प्रमुख लढत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुकीच्या धुमाळीने राजकारण तापलं असून राजकीय हालचाली व घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पुढारी निवडणुकीचे डावपेच आखण्यात व्यस्त झाले असून उमेदवार निवडणूक अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामाला लागले आहेत. २७ मार्च हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज जिल्हा कार्यालयात उमेदवारी अर्ज घेण्याची लगबग पाहायला मिळाली. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून आज जवळपास ६४ उमेदवारी अर्जाची उचल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर -वणी-आर्णी मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार असून दोन तगड्या उमेदवारांमध्ये थेट लढत होणार आहे. महाविकास आघाडीकडून दीर्घ चर्चेनंतर व राजकीय तडजोडीनंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महायुती आघाडीचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी त्यांची काट्याची टक्कर होणार असल्याचे संकेत मिळत आहे. या दोन बलाढ्य उमेद्वारांमुळे निवडणुकीची चुरस चांगलीच वाढली आहे. चंद्रप...

राजूर (कॉ.) येथे यावर्षीही साजरा होणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. २८ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्यात येत असून राजूर (कॉ.) येथीही त्यांचा जयंती उत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. यावर्षी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त राजूर (कॉ.) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. येथील सावित्रीबाई फुले वार्ड क्र. ४ येथे साय. ५ वाजता हा जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचे उद्घाटन शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जी.प. सदस्य संघदीप भगत हे राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, ग्रामपंचायत सदस्य अमर तितरे, शिक्षक अजय कंडेवार, ग्रा.प. सदस्य रेहाना सिद्धीकी, राजूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक भगत, कॉम्रेड कुमार मोहरमपुरी, माजी सरपंच प्रणिता मोहमद असलम, ग्रा.प. सदस्य बबिता सिंग, ग्रा.प. सदस्य...

"Breaking News" राजूर (कॉ) येथे विहिरीत आढळला अज्ञात युवकाचा मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉ.) येथे रेल्वे सायडिंग जवळील एका विहरीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खलबजानक घटना आज धुळीवंदनाच्या दिवशी २५ मार्चला दुपारी २.३०  वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची अद्याप ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.  राजूर कॉलरी येथिल कोळसा सायडिंगच्या मागच्या बाजूला मस्जिद परिसरात असलेल्या विहरीत आज एका युवकाचा मृतदेह आढळून आला. तीन ते चार  दिवसांपूर्वी या युवकाचा विहरीत पडून अथवा विहिरीत उडी घेऊन मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतदेह हा पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असून पोलिस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांच्या उपयोगात नसलेल्या विहरीत युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतदेह हा पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मृतकाचे नावही अद्याप कळू शकले नसून पोलिसांनी...

राजूर (ई) येथील जुगारावर पोलिसांची धाड, चार जुगाऱ्यांना अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील राजूर (ई) येथे सार्वजनिक ठिकाणी सुरु असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून ४ जुगाऱ्यांना अटक केली. ही कार्यवाही होळीच्या पूर्वसंध्येला (२३ मार्च साय.५.४५ वाजता) करण्यात आली. पोलिसांना पाहून काही जण मात्र पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांना हुलकावणी देऊन ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. राजूर येथे मोठ्या प्रमाणात जुगार भरवला जात असून मटका अड्डेही राजरोसपणे सुरु आहेत. त्यामुळे राजूर येथील रोजंदारीने कामे करणारा व काबाडकष्ट करून जीवन जगणारा मजूरवर्ग मटका जुगाराच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आले आहेत. मिळकतीचे पैसे मटका जुगार खेळण्यात घालविले जात असल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. राजूर येथे अवैध धंद्यांना उधाण आले असून अवैध दारू विक्री, मटका व जुगार जोमात सुरु आहे. राजूर येथे ठिकठिकाणी मटका अड्डे चालविले जात असतांना कार्यवाही मात्र नाममात्र होतांना दिसते. काही दिवसांपूर्वी राजूर येथील मटका अड्ड्यांवर पोलिसांनी धाड टाकली होती. परंतु मटका अड्डा चालविणाराच...

धनोजे कुणबी महिला विकास संस्थेची कार्यकारणी गठीत, किरण देरकर यांची तज्ञ संचालक मार्गदर्शक पदी निवड

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  धनोजे कुणबी महिला विकास संस्थेची नुकतीच कार्यकारणी गठीत करण्यात आली. या नव्याने गठीत करण्यात आलेल्या कार्यकारणीत किरण देरकर यांची तज्ञ संचालक मार्गदर्शक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर संस्थेच्या अध्यक्षपदी साधना गोहोकार, उपाध्यक्ष वंदना आवारी व सचिव पदी अर्चना बोदाडकर यांची निवड करण्यात आली आहे. धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यात येतो.  सन २००९ मध्ये धनोजे कुणबी महिला विकास संस्था नावाचे इवलेशे रोपटे लावण्यात आले होते. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या संस्थेला आता १४ वर्ष पूर्ण झाली आहेत. १४ वर्षा आधी धनीजे कुणबी महिला समाजाच्या वतीने शारदा उत्सव या कार्यक्रमाची संकल्पना आखण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुप्त कला गुणांना आकार देणारं एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं. शारदा उत्सव कार्यक्रमासाठी महिला एकत्रित येऊ लागल्या. या निमित्ताने महिलांचा आत्मविश्वास वाढविणारे कार्यक्रम घेण्यात आले. आता धनोजे क...

लोकसभेची उमेदवारी मिळावी हा माझा आग्रहच नव्हता, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी साधला संवाद

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम व तारखा जाहीर झाल्याने पक्षांकडून उमेदवारी मिळालेल्या व पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी जनसंपर्क मोहीम सुरु केली आहे. आपल्या मतदारसंघाचा आढावा घेण्याबरोबरच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना विश्वासात घेतले जात आहे. परंतु शेवटी त्यांच्या विजयाची मदार ही मतदार राजावरच अवलंबून असणार आहे. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा आराखडा तयार झाला असून १९ एप्रिलला चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. २७ मार्च ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख राहणार आहे. चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले आहे. त्यांना उमेदवारी मिळाल्याने राजहंस मात्र कोंडीत सापडला आहे. उंच भरारी घेण्याच्या तयारीत असतांनाच जाळं टाकण्यात आलं. आणि त्या जाळ्यात राजहंस अलगद अडकला गेला. घरचाच अहिर मिळाल्याने...

नांदेपेरा येथील युवकाचा वणी-भालर मार्गावर आढळला मृतदेह, विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी भालर मार्गावरील एमआयडीसी लगत असलेल्या नगर पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना आज २० मार्चला सकाळी उघडकीस आली. या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. नांदेपेरा येथील शेतकरी कुटुंबातील सदस्य असलेला हा विवाहित युवक वणी भालर मार्गावर मृतावस्थेत आढळून आला. एक वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला असल्याचे सांगण्यात येते. मंगेश प्रभाकर डोंगे (३२) असे या मृतावस्थेत आढळलेल्या युवकाचे नाव आहे.  वणी तालुक्यातील नांदेपेरा येथे सहकुटुंब वास्तव्यास असलेला मंगेश हा १९ मार्चला रात्री दुचाकीने वणीला जातो म्हणून घराबाहेर पडला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. कुटुंबीय त्याचा शोध घेत असतांनाच आज सकाळी वणी भालर मार्गावरील नगर पालिकेच्या कचरा डम्पिंग ग्राउंडजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. सकाळी या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना अज्ञात युवक मृतावस्थेत आढळून आल्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी परिसरात पसरली. नंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घ...

रेल्वे कर्मचारी महिलेचा पती रेल्वे क्वार्टरमध्ये आढळला मृतावस्थेत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी रेल्वे क्वार्टर येथे राहत असलेला युवक मृतावस्थेत आढळून आल्याची घटना काल १८ मार्चला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक युवक हा रेल्वे कर्मचारी असलेल्या महिलेचा पती होता. त्याला मद्य सेवनाची सवय जडली होती. त्यामुळे पती पत्नीत खटके उडायचे. त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यामुळे काही दिवसांपासून महिला ही माहेरी जाऊन होती. अशातच त्याचा पोटमारा होऊ लागला. काल रात्री अति मद्य सेवनामुळे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याने आपल्या आईला फोन केला. आईने त्याच्या पत्नीला फोन केला. नंतर त्याच्या चुलत भावानेही त्याच्या पत्नीला केला. तेंव्हा पत्नीने क्वार्टरकडे जाऊन पाहिले असता तिला पती हा बेडवर निपचित पडून दिसला. तिने त्याला जोरजोरात हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा तिला संशय आला. तिने तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. अतिश अशोक लाडे (४२) असे या ...

ऑटो व दुचाकीची समोरासमोर धडक, एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दुचाकी व ऑटोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज 18 मार्चला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील राजूर फाट्यावर (रिंग रोड) घडली. ऑटोला ओव्हरटेक करतांना समोरून अचानक ट्रक आल्याने दुचाकी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी ऑटोला धडकी. तर दुचाकी चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटला. यात ऑटो मधील प्रवासी महिला ऑटोखाली दबल्या गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही माहिती अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे.  याबाबत मिळालेल्या माहिती नुसार प्रवासी घेऊन रजुरला जात असलेल्या ऑटोला विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी धडकली. कोल डेपोमध्ये काम करणारे कामगार या ऑटोमध्ये बसून रजुराला जात होते. दरम्यान पळसोनीकडे जात असलेल्या दुचाकी चालकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले. आणि दुचाकी ऑटोला धडकली. अचानक घडलेल्या प्रकाराने ऑटो चालकाचेही ऑटो वरील नियंत्रण सुटले, व ऑटो रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात ऑटो मधील प्रवासी महिला गंगा संजय किनाके (35) रा. राजूर कॉलर...

संजय देरकर यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचा शिवसेनेत (उबाठा) जाहीर प्रवेश

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी विधानसभा प्रमुख संजय देरकर यांच्या नेतृत्वात शहरात नुकताच  शिवसेनेचा (उ.बा.ठा)  पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी असंख्य युवकांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या सोहळ्याला युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. शिवसेनेत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते असून निष्ठावंतांचा भरणा असणारा व त्यांची अस्मिता जपणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय देणारा हा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना समानतेची वागणूक देतानाच कार्यकर्त्यांची विश्वासाहर्ता टिकवून ठेवणारा हा पक्ष आहे. आणि म्हणूनच आजही निष्ठावान कार्यकर्ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळलेले आहेत.  वणी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचं प्राबल्य आजही कायम असून निष्ठावान शिवसैनीकांच्या निस्वार्थी कार्यावर ताकदीने उभा राहणारा हा पक्ष आहे. शिवसैनिकांनी नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठविला आहे. नागरिकांच्या समस्या व प्रश्न उचलून धरत ते मार्गी लावले आहेत. शासन, प्रशासनाच्या अन्यायकारी धोरणांवर प्रहार करून...

साहेब, घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीची टंचाई आणि अवैधरित्या वाहत आहे रेतीचा ओघ, कसा जुळवून आणला जातो हा योग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शासनाने ऑनलाईन रेती विक्रीचे धोरण अमलात आणल्यानंतरही त्यात पारदर्शकता राहिली नसल्याची ओरड ऑनलाईन नोंदणी करूनही रेती न मिळालेल्या नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. सेतू केंद्रात ऑनलाईन रेती खरेदीसाठी नोंदणी केल्यानंतर त्यातही मोठा घोळ होत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही शासकीय दरात रेती मिळत नाही. आणि गैरमार्गाने मुबलक रेतीचा पुरवठा होत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. रेतीचा काळाबाजार थांबता थांबत नसल्याने सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न भंगले आहे. तर इमारतींचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा दिसून येतो. अतिरिक्त पैसा मोजून गैर मार्गाने रेती खरेदी करणे शक्य होत नसल्याने अनेकांच्या घरांचे बांधकाम रखडले असून बांधकाम कामगारांच्याही हाताला काम मिळणे कठीण झाले आहे. घरकुल लाभार्थ्यांनाही रेती मिळत नसल्याने घरकुलांचीही कामे ठप्प पडली आहे. घरकुलाचा लाभ मिळाल्याने अनेकांनी घराचे बांधकाम हाती घेतले आहे. पण रेती अभावी काहींना घराचे बांधकामाचं सुरु करता आले नाही. तर काही लाभार्थ्यांच्या घराचे बांधकाम अर्ध्यावर थांबले आहे...

सरपंचावरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरिता अख्ख गावच आलं पोलिस स्टेशनला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  तालुक्यातील पेटूर या गावात वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्त लावण्यात आलेल्या बॅनर वरून सरपंच व आयोजकांमध्ये सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रतिबंधित जागेवर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे बॅनर लावण्यात आल्याने सरपंचांनी कार्यक्रम स्थळाचे फोटो काढून पोलिसांना पाठविले. यावरून सरपंच व आयोजकांमध्ये झालेल्या वादातून आयोजकांनी सरपंचावर ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. सरपंचाविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आल्याचे कळताच गावकरी मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनला धडकले. त्यांनी सरपंचावरिल खोटे गुन्हे त्वरित मागे घेऊन गावातील शांतता भंग करण्याकरिता समाजबांधवांची माथी भडकविणाऱ्या मास्टरमाईंवर कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषद वणीच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदार यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. या प्रकरणी आयोजक महिलेने सरपंचांनी वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे बॅनर फाडून महिलांना जातीवाचक तथा अश्लील ...

नैराश्येतून आणखी एका इसमाने केला जीवनाचा शेवट, राहत्या घरीच घेतला गळफास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील इस्लामपुरा (खडबडा मोहल्ला) येथे वास्तव्यास असलेल्या इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १५ मार्चला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मारोती विठ्ठल ठावरी वय अंदाजे ४२ वर्ष असे या गळफास घेतलेल्या इसमाचे नाव आहे. पत्नी व मुलगा घराबाहेर गेल्याची संधी साधून त्याने घरातील खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. शहरात नैराश्येतून आत्महत्या करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले असून एका पाठोपाठ होत असलेल्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. जीवनातील आव्हाने व संकटांचा सामना न करता आत्महत्येचा मार्ग निवडला जात असल्याने चिंता निर्माण झाली आहे.  इस्लामपुरा (खडबडा मोहल्ला) परिसरात परिवारासह राहत असलेल्या मारोती ठावरी यांनी आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राहत्या घरीच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ते घरीच टेलरिंगचा व्यवसाय करायचे. त्यांना दोन मुले असून एक मुलगा बाहेरगावी तर एक मुलगा त्यांच्या सोबत राहतो. आज सकाळी पत्नी व मुलगा काही वेळासाठी घराबाहेर गेले असता मारोतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना मारोती ठ...

विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या वणी तालुक्याला धूळ प्रदूषणाचे ग्रहण, धूळ प्रदूषणाने जनजीवन झाले प्रभावित

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी विधानसभाक्षेत्रात विकासकामांना गती मिळाली असली तरी प्रदूषण नियंत्रणाच्या दिशेने कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. प्रदूषण रोखण्याकरिता कोणत्याही प्रकारच्या उपायोजना करण्यात न आल्याने येथील जनता आजही प्रदूषित वातावरणातच जीवन जगत आहे. वणी शहर महामार्गाला जोडण्यात आलं. चौपदरी रस्ते तयार झाले. गल्ली बोळातील रस्तेही गुळगुळीत झाले. प्रशस्त न्यायालयीन इमारतीसाठीही निधी मिळाला. क्रीडा संकुल उभारण्याचं काम सुरु आहे. रेल्वे स्टेशन हायटेक होत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर उडाणपूलही साकार होत आहेत. पण तालुक्यावर पसरलेलं धूळ प्रदूषणाचं काळं सावट अद्यापही हटलेलं नाही. विकासाची कास धरलेला वणी तालुका आजही प्रदूषणाच्या विळख्यातच अडकला आहे. शहराच्या विकासाची गती वाढली. पण प्रदूषणात जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या आयुष्याचा वेग मात्र मंदावला आहे. धूळ प्रदूषणात श्वास घेणाऱ्या नागरिकांचं आयुष्मान घटू लागलं आहे. मुख्य मार्गावर व रहिवाशी वस्तीला लागून असलेल्या कोळसा सायडिंग धूळ ओकू लागल्या आहेत. कोळसा सायडिंगवरून दिवसरात्र उडणाऱ्या कोळशाच्या धुळीने येथील जनजीवन प्रभावित झालं आहे. धूळ प्रदूष...

विकासकामे तर झालीच नाही नाल्या तरी साफ होऊ द्या, मागासलेला भाग आमचा मागासलाच राहू द्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   नगर परिषदेला शहरातील नाल्यांची साफसफाई करण्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. नगर पालिका प्रशासन केवळ सक्तीची कर वसुली व निविदा काढण्यातच गुंग असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून शहरातील नाल्यांची साफसफाईच न झाल्याने शहरवासियांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. नाल्यांच्या साफसफाईकडे नगर पालिका प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. नाल्यांची साफसफाई न झाल्याने नाल्या जागोजागी तुंबल्या असून नाल्यांमध्ये साचून राहणाऱ्या घाणपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्यांमध्ये घाणपाणी साचून राहत असल्याने परिसरात मच्छरांचाही प्रकोप प्रचंड वाढला आहे. नाल्यांची साफसफाई करण्याकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष होऊ लागल्याने नगर पालिकेविषयी नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष खदखदू लागला आहे.  शहरातील काही भागात नगर पालिकेची भूमिगत गटार योजना अद्याप पोहचली नाही. या भागातील नाल्या सताड खुल्या आहेत. १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या आता ठिकठिकाणी फुटल्या आहेत. सिमेंट रस्तेही नावालाच उरले आहेत. पण विकासाची गंगा मात्र या भागांकडे वळली नाही. कोट्यवधी रुपयांची ...

उन्हाळा सुरु झाल्याने निर्गुडा नदीचा प्रवाह थांबला, निर्माण झाले जलसंकट, नवरगाव धरणातील पाणी नदीत सोडण्याची मागणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविणारी निर्गुडा नदी उन्हाळ्यातील उष्णतामान वाढू लागल्याने आटू लागली आहे. नदीचा प्रवाह खुंटला असून नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे. नदीचे पाणी स्थिरावल्याने नदीत पाण्याचे डबके तयार झाल्याचे दिसून येत आहे. नदीत तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यांमध्ये श्वान आणि वराह स्वछंद विहार करीत असल्याने पाणी दूषित होऊ लागले आहे. एवढेच नाही तर नदीतील पाण्याची दुर्गंधी देखील येऊ लागली आहे. त्यामुळे नदीचे पाणी मनुष्याच्या तर सोडाच पाळीव जनावरांनाही पिण्यायोग्य राहिलेले नाही. निर्गुडा नदीचा प्रवाह खुंटल्याने तालुक्यात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. अनेक गावांना पाणी टंचाईची झळ बसणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. निर्गुडा नदीचे पाणी आटू लागल्याने अनेक गावांवर जल संकट ओढविण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांचाही शेत सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. पाण्याअभावी पशुधनही संकटात येण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नवरगाव धरणातील जलाशय तात्काळ निर्गुडा नदीत सोडण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य ...

टीडीआरएफ द्वारा महिला दिन साजरा, विविध क्षेत्रातील महिलांचा करण्यात आला सत्कार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  टीडीआरएफ (आपत्ती प्रतिसाद दल) द्वारा जागतिक महिला दीना निमित्त टीडीआरएफ उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रम घेण्यात आला. टीडीआरएफच्या संचालक रुपाली राठोड यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, टीडीआरएफ मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान सय्यद यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा तसेच टीडीआरएफ मध्ये कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुस्कान सय्यद यांनी टीडीआरएफने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या १९ वर्षाच्या कार्याचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, महिलांनी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सजग असलं पाहिजे. आपली सुरक्षा कशी करायची याचे धडे व प्रशिक्षण घेतलं पाहिजे. महिलांनी स्वनिर्भर बनून आत्मरक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे सांगतानाच त्यांनी टीडीआरएफ मधील मुलींच्या कार्याचे कौतुक केले. टीडीआरएफ मध्ये सुद्धा ...

ट्रकची ऑटोला जोरदार धडक, ऑटो चालक जागीच ठार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  कोळशाची इंटरनल शिफ्टिंग करणाऱ्या भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाल्याची घटना काल १० मार्चला रात्री १० वाजताच्या सुमारास वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी फाट्यावर घडली. वणी वरून राजूरकडे येत असलेल्या ऑटोला कोळशाची चुरी भरण्याकरिता लालपुलियाकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचा पार चुराडा झाला असून ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद (३८) रा. राजूर (कॉ.) हा जागीच ठार झाला आहे.  मुख्य मार्गांवर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले असून अनियंत्रित वाहतुक अपघातास कारणीभूत ठरू लागली आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यात व वाहनांच्या वेगाला आवर घालण्यात वाहतूक पोलिस सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. वणी वरून राजूरला जात असलेल्या ऑटोला (MH 29 V 8144) कोळशाची अंतर्गत वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने (MH 34 AB 9523) जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटोचा पार चुराडा झाला आहे. या अपघातात ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून...

भालर-उकनी मार्गावर मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकी चालक गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील भालर-उकनी मार्गावर मालवाहू (छोटा हाथी) वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल १० मार्चला दुपारी ३ वाजताच्या सुमारास वेल्हाळा मंदिराजवळ घडली. मनोज अरब रा. झारखंड असे या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. मालवाहू वाहनाची दुचाकीला जोरदार धडक बसल्याने मनोज अरब याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.   मूळचा झारखंड येथील रहिवासी असलेला मनोज हा दुचाकीने (MH 34 AB 4138) भालर वसाहत ते उकनी मार्गाने जात असतांना वेल्हाळा मंदिराजवळ मालवाहू वाहनाने (MH 29 BE 6246) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. 

शिक्षकाची विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील कायर येथे वास्तव्यास असलेल्या शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज १० मार्चला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास कायर जवळील हुडकेश्वर मंदिर परिसरात उघडकीस आली. बळवंत कवडूजी जुमनाके (३५)  असे या आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो कायर येथीलच एका खाजगी शाळेत शिक्षक होता. आज दुपारी तो हुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला.  तालुक्यात आत्महत्यांचे सत्र सुरूच असून आज आणखी एका शिक्षकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कायर येथे वास्तव्यास असलेल्या व तेथीलच एका खाजगी शाळेत शिक्षक असलेल्या बळवंत जुमनाके यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ते कायर जवळील हुडकेश्वर मंदिर परिसरात विषारी द्रव्य प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती कुटुंबियांना देण्यात आली. कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळाक...

वर्धा नदी पात्रात बुडालेल्या तिसऱ्या तरुणाचाही आढळला मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा मार्गावरील पाटाळा पुलाजवळ वर्धा नदी पात्रात बुडालेल्या तिसऱ्या तरुणाचाही आज १० मार्चला पहाटे नदी काठावर तरंगतांना मृतदेह आढळून आला. काल ९ मार्चला रेस्क्यू पथकाने नदी पात्रात सायंकाळपर्यंत युद्ध पातळीवर शोध घेऊनही नदीत बुडालेला हा तिसरा तरुण आढळून आला नव्हता. आज पहाटे नदी काठावर तरंगतांना त्याचा मृतदेह आढळून आल्याने नदीत बुडालेल्या तीनही तरुणांचे मृतदेह हाती लागले आहेत. ८ मार्चला हे तीनही तरुण वर्धा नदीत बुडाल्याची हृदयद्रावक घटना घडली होती. त्यानंतर त्यांचा नदी पात्रात शोध घेण्यात आला. पण ८ मार्च ते नदी पात्रात आढळून न आल्याने ९ मार्चला चंद्रपूर येथून रेस्क्यू पथक बोलाविण्यात आले होते. ९ मार्चला रेस्क्यू पथकाने नदी पात्रात शोध मोहीम राबविली असता सकाळी ११.४५ वाजता संकेत पुंडलिक नगराळे (२७) व अनिरुद्ध सतिश चाफले (२२) या दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले. परंतु हर्षल अतिश चाफले (१७) या तरुणाचा मात्र शोध लागला नव्हता. आज पहाटे त्याचा नदी काठावर तरंगताना मृतदेह आढळून आला. एकाच परिसरातील जिवलग मित्रांवर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने विठ्ठलवाडी परिसरावर शोक...

वर्धा नदीत आंघोळ करण्याकरिता गेलेले तीन तरुण बुडाले, दोघांचे मृतदेह आढळले तर एकाचा अद्यापही लागला नाही शोध

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी   महाशिवरात्री निमित्त वरोरा तालुक्यातील भटाळी येथे महादेवाच्या दर्शनाकरिता गेलेले काही तरुण परतीच्या प्रवासात वर्धा नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असता त्यातील तीन तरुण नदीत बुडाल्याची दुर्दैवी घटना काल 8 मार्चला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. काल रात्री त्यांचा नदी पात्रात शोध घेतला असता ते आढळले नव्हते. आज सकाळी 9.30 वाजता परत शोधमोहीम राबविण्यात आली. चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलाविण्यात आली. त्यांनी बोटीच्या साहाय्याने नदी पात्रात तरुणांचा शोध घेतला असता सकाळी 11.45 वाजता संकेत पुंडलिक नगराळे (२७) याचा मृतदेह आढळून आला. तर काही वेळातच अनिरुद्ध सतिश चाफले (२२) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. दोघेही शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासह नदीत बुडालेला हर्षल अतिश चाफले (१७) हा तरुण मात्र अद्याप गवसला नाही. रेस्क्यू पथकाकडून या तरुणाचा नदी पात्रात युद्ध पातळीवर शोध घेण्यात आला.   विठ्ठलवाडी परिसरातील १० ते ११ तरुण महाशिवरात्री निमित्त भटाळी येथे भरणाऱ्या जत्रेत गेले होते. तेथून परतांना त्यांना मार्गातील वर्धा नदीवर आंघोळ करण्याचा मोह ...