महिला सरपंचाला जातीवाचक शिवीगाळ, उपसरपंचावर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

प्रशांत चंदनखेडे वणी मुकुटबन ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना जाती वरून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या उपसरपंचावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल राजेश्वर कुंटावार असे या गुन्हा दाखल झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. मुकुटबन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाने सरपंच पदाचा मान तर राखलाच नाही, उलट एका महिलेला अश्लील शिविगाळ व अपमानास्पद शब्ध प्रयोग करून तिला चार चौघात अपमानित केले. ग्रामपंचायतीची सरपंच असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्याइतपत मजल वाढलेल्या गुंड प्रवृत्तीच्या अनिल कुंटावार याच्या विरुद्ध महिला सरपंचाने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. मुकुटबन ही झरी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मुकुटबन ग्रामपंचायत हद्दीत अनेक छोटे मोठे व्यवसाय, मोठमोठ्या कंपन्या व कारखाने उभारण्यात आल्याने या ग्रामपंचायतीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आर्थिक संपन्न अशीही ग्रामपंचायत आहे. मुकुटबन येथीलच रहिवाशी असलेल्या मिना जगदीश आरमुरवार (३८) या मुकुटबन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आहेत. ३०...