Posts

Showing posts from June, 2023

मराठीबाणा मराठी माणसाच्या नसानसात भिनवणारा मराठमोळा राजकारणी राजूभाऊ उंबरकर यांचा आज वाढदिवस, त्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !

Image
(जाहिरात) प्रशांत चंदनखेडे वणी   राजुभाऊ उंबरकर हे नाव आता जनतेसाठी आन्यायाविरुद्धचा आवाज बनलं आहे. सर्वसामान्यांच्या हक्काचा नेता म्हणून राजूभाऊ उंबरकर यांना ओळखलं जातं. हक्क व अधिकाराने राजूभाऊ यांच्याजवळ आपल्या व्यथा मांडणाऱ्या जनतेची त्यांच्याशी आता नाळ जुळली आहे. 'शासकीय व प्रशासकीय स्तरावर जर कुणी जनतेच्या कामात आणत असेल बाधा तर जनताही छाती ताणून म्हणते आमच्या पाठीशी आहे राजूदादा.' असं एक हक्काचं नातं या हक्काच्या नेत्यासोबत जुळलं आहे. जनतेच्या समस्या जाणून घेणारा नेता म्हणून राजूभाऊंना मानलं जातं. कुणावरही अन्याय झाला तर आधी राजूभाऊंकडे धाव घेतली जाते. जनतेचे कोणतेही प्रश्न असो ते सोडविण्यास नेहमी तत्पर असलेला नेता म्हणून राजू उंबरकर यांचं नाव जनतेच्या मुखावर येतं. जनतेवर अन्याय करणाऱ्यांविरुद्ध पेटून उठणारा नेता म्हणजे राजू उंबरकर हे समीकरणच बनलं आहे. राजकारण व समाजकारण यांचं उत्कृष्ठ मेळ साधणारा नेता म्हणजेच राजू उंबरकर, संकटात मदतीला धावून जाणारा नेता म्हणजे राजू उंबरकर, महिलांचा भाऊराया म्हणजे राजू उंबरकर, दुर्बलांना मदतीचा हात देणारा मदतगार म्हणजे राजू उंबरकर, समाज...

एन.बी.एस.ए. महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे सुरु

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील नगर परिषद शाळा क्रमांक ७ जवळ असलेल्या एन.बी.एस.ए. कला व वाणिज्य महाविद्यालयात कला व वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश देणे सुरु आहे. हे महाविद्यालय शहराच्या अगदी मध्यभागी असून सर्व सोइ सुविधांनी सज्ज आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचीही सुविधा याठिकाणी उपलब्ध आहे.  महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाशी संलग्नित तथा नूरजहाँ बेगम चॅरिटेबल ट्रस्ट वणी द्वारा संचालित एन.बी.एस.ए. कला व वाणिज्य महाविद्यालयात बी.ए. व बी.कॉम पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. कला व वाणिज्य शाखेत प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाकरिता प्रवेश देणे सुरु आहे. १२ वी उत्तीर्ण झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेत करिअर घडवायचे आहे, त्यांनी त्वरित एन.बी.एस.ए. महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता या महाविद्यालयात स्कॉलरशिपचीही सुविधा उपलब्ध आहे. बी.ए. व बी.कॉम पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक वेळ न दवडता एन.बी.एस.ए. महाविद्याल...

मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत ५० वर्षीय महिलेवर केला अत्याचार, पोलिसांनी चारही आरोपींना केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   राजूर कॉलरी येथील चुना भट्ट्यावर काम करणाऱ्या एका ५० वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना काल २८ जूनला सायंकाळी ५ ते रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. या महिलेला चुना भट्टा परिसरातील मजुरांच्या निवाऱ्यातून उचलून नेत तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आला. या घटनेने तालुका हादरला असून महिलेला जबरदस्ती उचलून नेत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलेला एका खाजगी वाहनात जबरदस्ती बसवून करणवाडी मार्गे नवरगाव शेत शिवारात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला. याबाबत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच महिलेशी कुकर्म करणाऱ्या चारही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर अत्याचार व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे शहरातील एका प्रतिष्ठित व्यवसायीकडे कामाला असल्याची माहिती समोर आली आहे.  राजूर कॉलरी येथील एका चुना भट्टयावर काम करणारी ही महिला कामगारांकरिता बांधण्यात आलेल्या निवाऱ्यात रहात होती. आरोपी हे सायंकाळी...

शेत शिवारात तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतमजूराचा मृत्यू , लाठी येथील घटनेची पुनरावृत्ती

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे एका शेत मजुराला आपला जीव गमवावा लागल्याची घटना आज २८ जूनला सायंकाळी ५ वाजता खांदला शेत शिवारात घडली. शेत जमिनीवर तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शेत मजुराचा जागीच मृत्यू झाला. शिरपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. संतप्त गावकऱ्यांनी शिरपूर वीज वितरणच्या कार्यालयात मृतदेह आणून वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांप्रती आपला रोष व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वीज वितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज तारांच्या दुरुस्ती व देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने निष्पाप जीवांचे बळी जाऊ लागले आहेत. त्यामुळे या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.  वणी तालुक्यातील खांदला शेत शिवारात जिवंत विद्युत तारा शेत जमिनीवर पडल्या होत्या. त्या दृष्टीस न पडल्याने शेतात काम करणाऱ्या शंकर केशव दुरूतकर (४९) या शेत मजुराचा जिवंत तारांना स्पर्श होऊन विजेच्या धक्...

सहा दिवसांपासून बेपत्ता मुलाचा अद्यापही लागला नाही शोध, कुटुंबं आलं धास्तीत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शाळेच्या सुट्ट्या घालविण्याकरिता वडिलांकडे आलेला मुलगा अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. घरी करमत नसल्याने आजोबांना वडिलांच्या कामावर जातो, असे सांगून घराबाहेर पडलेला मुलगा नंतर घरी परतलाच नाही. त्याचा सर्वत्र  शोधाशोध घेतल्यानंतर २२ जूनला वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. सहा दिवस लोटूनही बेपत्ता मुलाचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटूंबियांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पंकज संजय केवट (१७) असे या बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  खाजगी वाहन चालक असलेले संजय देवसरन केवट (३९) हे ड्रिमलँड सिटी येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे बल्ला का डेरा जिल्हा फतेहपूर, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. ते अनेक दिवसांपासून येथे वास्तव्यास आहेत. अनेक परप्रांतीय वाहन चालक वणी परिसरात वसले आहेत. पण त्यांचा परिवार मात्र मूळ गावीच राहतो. संजय केवट यांचा मुलगा पंकज हा फतेहपूर (उ.प्र.) येथे आपल्या आई सोबत राहतो. शाळेला सुट्ट्या असल्याने तो वडिलांकडे आला होता. २२ जूनला तो घरी करमत नसल्याचे का...

शेतातील किंमती साहित्य चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शेती उपयोगी साहित्याची चोरी करून कास्तकारांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली  आहे. शेतातील किंमती साहित्य चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला प्राप्त झाल्याने पोलिसांनी या चोरीच्या घटनांकडे लक्ष केंद्रित केले. शेतातील साहित्यांवर हात साफ करणाऱ्या चोरट्यांचा पोलिस कसून शोध घेत होते. पोलिसांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून शेतातील किंमती साहित्य चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावला. शेतातील साहित्य चोरी करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आधी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यांची आज पोलिस कोठडीची मुद्दत संपल्याने त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींची जामिनावर सुटका केली आहे.  शेतातील किंमती साहित्याची चोरी करून आधीच आर्थिक डबघाईस आलेल्या कास्तकारांना आणखी आर्थिक विवंचनेत आणणाऱ्या चार चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. वणी तालुक्यातील मोहर्ली येथिल शेतात २ ते ४ मे दरम्यान चोरट्यांनी चोरीच...

अल्पवयीन मुलगी शेजाऱ्याला म्हणायची मामा, पण त्याने मानलेल्या नात्याला फासला काळिमा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  विवाहित पुरुषाची त्याला मामा म्हणणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवरच वासनांध नजर फिरली. त्याने घरी एकटी असलेल्या या मुलीला अलगद हेरून तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. पण मुलीने याला विरोध करताच त्याने तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या धमकीमुळे मुलगी पुरती घाबरली. तिला काही सुचेनासे झाले. तिच्या धास्तावलेल्या अवस्थेचा फायदा घेत त्याने तिला आतल्या खोलीत नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच याबाबत कुठेही वाच्यता केल्यास तुझ्या भावाला जीवानिशी ठार मारेन, अशी त्याने धमकीही दिली. त्यामुळे नराधमाच्या वासनेचा शिकार होऊनही तिने आई, वडील व भावाला हा घडलेला प्रकार सांगितला नाही. परिणामी आरोपीची हिम्मत आणखीच वाढली. त्याने ती घरी एकटी असतांना तिला हेरने सुरु केले. भावाला जीवे मारण्याची धमकी देत तो तिचे वारंवार शारीरिक शोषण करू लागला. अशातच तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर कुठे हा प्रकार समोर आला. एक वर्षापासून तो तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत आपली शारीरिक भूक भागवत होता. कुटुंबीयांना जेंव्हा हा प्रकार कळाला तेंव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. म...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात लोकशाही मार्गाने केली देशाने प्रगती... केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा सर्वांगीण विकास साधला असून देशातील प्रत्येक घटकापर्यंत सोइ सुविधा व शासकीय योजना पोहचविण्याचं काम केलं आहे. प्रत्येक जाती धर्मातील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. विकासात्मक कामांकरिता निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. लोकशाही मूल्यांचं संवर्धन करून लोकशाही मार्गाने जनतेच्या मूलभूत अधिकारांचं जतन करण्याचं काम मोदी सरकारच्या काळात झालं आहे. देश लोकशाही मार्गाने प्रगती करीत असतांना विरोधक मात्र निरर्थक आरोप करून प्रगतीत बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पाच आर्थिक प्रगत देशात भारताची तुलना होऊ लागली आहे. अमेरिकेने भारताशी मैत्रीचे संबंध दृढ केले आहे. ९ वर्षात मोदी सरकारने देशाला प्रगती पथावर आणले आहे. लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम १९७४ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत झालं होतं. २५ जून हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं टीकास्त्र सोडतानाच विरोधी पक्षाच्या एकजुटीलाही खंबीरपणे सामोरे जाऊन विजय साकार करण्याचा आशावाद व्यक्त करतांनाच पक्षाच्या सातही मोर्चांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतद...

काय सांगता... वेकोलिच्या रेल्वे सायडिंगचं नियोजनच बिघडलं, कोळशाच्या साठवणुकीचे निर्माण झाले प्रश्न !

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वेकोलिच्या कोळसाखाणींमधून वणी रेल्वे सायडिंगवर कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकांच्या मुख्य मार्गांवर लांबचलांब रांगा लागत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा होतांना दिसत आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या टोल नाक्याच्याही पलीकडे ब्राह्मणी फाट्यापर्यंत रांगा लागताना दिसत आहे. आज तर घुग्गुस मार्गाबरोबरच वरोरा मार्गावर हनुमान मंदिरापर्यंत कोळसा वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळाल्या. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांचा जाम लागल्याने वाहनधारकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसला.  वेकोलिच्या वणी रेल्वे सायडिंगवर कोळसा साठवणुकीची क्षमताच राहिली नसल्याचे कोळसा वाहतूकदार कंपन्यांच्या मालकांचे म्हणणे आहे. कोळसा सायडिंगवर कोळसा खाली करण्याकरिता जागा नसल्याने मुख्य मार्गांवर एक ते दीड किलोमीटर पर्यंत ट्रकांच्या रांगा लागल्या आहेत. वेकोलिच्या रेल्वे सायडिंगचे प्रमुख असलेले श्रवण कुमार यांच्या नियोजनबद्धतेच्या अभावामुळे कोळशाच्या साठवणुकीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परिणामी मुख्य मार्गांवर कोळसा वाहतुकीच्या ट्रकांच्या लांबचल...

गरीब व श्रीमंतीची दरी शिक्षण क्षेत्रात निर्माण होऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करायला हवा... बीडीओ किशोर गज्जलवार

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  श्रीमंत व गरीब हा विरोधाभास आपल्या देशात फार पूर्वी पासून चालत आला आहे. गरीब व श्रीमंत यांच्यात जशी दरी आहे, तशीच दरी शिक्षण क्षेत्रातही दिसून येत आहे. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळा व मराठी माध्यमांच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये अशीच दरी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवे. नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांमधून दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. त्याकरिता शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल करून शिक्षणाचा दर्जा सुधारल्यास मराठी शाळांचेही भविष्य उजळण्यास वेळ लागणार नाही. आजच्या अद्यावत शिक्षण व्यवस्थेत प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थी घडविण्याचे प्रामाणिक काम केल्यास ते विद्यार्थी, पालक व शाळांसाठीही फायद्याचे ठरेल, असे शिक्षण क्षेत्रातील मतभिन्नतेवर प्रकाश टाकणारे मनोगत वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी व्यक्त केले. ते मंदर येथील पोद्दार लर्निंग स्कुल येथे घेण्यात आलेल्या वणी तालुक्यातील मुख्याध्यापकांच्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.  पोद्दार लर्निंग स्कुल येथे मुख्याध्यापकांची आढावा सभा ...

प्रेम नगर परिसरात पोलिसांनी राबविली तपासणी व चौकशी मोहीम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  प्रेम नगर परिसरात पोलिसांनी आज २२ जूनला तपासणी व चौकशी मोहीम राबविली. प्रेम नगर परिसर हा देह विक्री करणाऱ्या महिलांची वस्ती म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी वेश्या व्यवसायिक महिलांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या या महिलांमध्ये अल्पवयीन मुली तर नाही ना, याची चाचपणी करण्याकरिता पोलिसांकडून या परिसराची चौकशी व महिलांची तपासणी करण्यात आली. जवळपास ४२ वेश्या व्यवसायिक महिलांची चौकशी करून त्यांचे आधारकार्ड तपासण्यात आले. ही तपासणी मोहीम ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे, एपीआय दत्ता पेंडकर, पीएसआय प्रविण हिरे व पोलिस पथकाने राबविली.  लालगुडा हद्दीतील प्रेम नगर परिसरात वेश्या व्यवसायिक महिलांनी आपले बस्तान मांडले आहे. या ठिकाणी देहविक्री करणाऱ्या महिलांचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य दिसून येतं. या महिला ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून देह विक्री करतात. प्रेम नगर परिसरात देह विक्रीचा हा व्यवसाय चांगलाच फळाफुलाला आला आहे. देह विक्रीच्या व्यवसायात रूढलेल्या काही महिला गरीब व लाचार महिलांना कधी आमिषे देऊन तर कधी धमकावून ...

रस्ते दुरुस्तीसाठी कुठे घालावं लागतं लोटांगण तर कुठे करावं लागत आहे रस्ता रोको आंदोलन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  रस्ते विकासाकरिता कोट्यावधींचा निधी मंजूर करण्यात आला असतांनाही रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना अद्यापही वेग आलेला दिसत नाही. शहरातील अंतर्गत व काही प्रमुख रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ग्रामीण भागाकडे जाणारे रस्तेही रहदारीयोग्य राहिलेले नाहीत. त्यामुळे रस्त्यांचे बांधकाम व दुरुस्तीच्या मागणीला घेऊन रखरखत्या उन्हात जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागत आहे. भालर ते तरोडा या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीला घेऊन १६ जूनला पाच ते सहा गावातील नागरिकांनी भालर रोडवरील भूमी पार्क गेटजवळ भर उन्हात रस्ता रोको आंदोलन केले होते. तर तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याच्या मागणीला घेऊन काल एका वृद्ध सामाजिक कार्यकर्त्याने अक्षरशः रस्त्यावरच लोटांगण घातले. तहसिल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम करण्याची त्यांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्यांनी या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता प्रशासनाशी वेळोवेळी पत्रव्यवहारही केला. २०२१ पासून सतत ते या रस्त्याचे पक्के बांधकाम करण्याकरिता प्रशासनाकडे पाठपुरावा करीत होते. पण प्रश...

आरोपीच्या अटकेत बाधा आणून त्याला पळून जाण्यात मदत करणाऱ्या आई व पत्नीवर गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  बिनाजमानती वारंट मधील फरार आरोपींची वणी पोलिसांकडून शोध मोहीम राबवून त्यांची धरपकड केली जात आहे. या मोहिमे अंतर्गत १८ ते १९ जून च्या मध्यरात्री दरम्यान मारेगाव येथे रहात असलेल्या आरोपीचा शोध घेत त्याला अटक करण्याकरिता गेलेल्या पोलिसांशी आरोपीच्या आई व पत्नीने हुज्जत घालून त्याला मागच्या दारातून पळून जाण्यात मदत केल्याने दोन्ही महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात वणी पोलिस स्टेशन येथे प्रलंबित बिनाजमानती वारंट मधील फरार आरोपींचा शोध लावून त्यांना अटक करण्याची मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेंतर्गत पोना मुकेश करपते, पोना अजित पंधरे व पोकॉ श्रीनिवास गोनलवार यांचं पथक तयार करून १८ ते १९ जूनच्या मध्यरात्री मारेगाव येथे रहात असलेल्या फरार आरोपीच्या शोधात पाठविण्यात आलं. आरोपी राजू शंकर भुजाडे याचा शोध घेऊन पोलिस त्याला अटक करण्याची कार्यवाही करीत असतांनाच आरोपीची आई व पत्नी मधात आली. या दोघींनीही पोलिसांशी हुज्जत घालून आरोपीच्या अटकेत बाधा निर्माण केली. या दरम्यान आरोपी मागच्या दाराने पळून जाण्यात यशस्वी झाला. फरार...

काल रात्री शहरात झाली सिनेस्टाइल मारहाण, दोन ते तीन जनांनी एकाला बेदम मारलं

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर काल रात्री मारझोडीचा थरारक सीन शहरवासीयांनी अनुभवाला. एखाद्या चित्रपटातील मारहाणीच्या दृश्याप्रमाणे काल रात्री वर्दळीच्या ठिकाणी तिन जन एकाला अक्षरशः कुटत होते. आणि नागरिक चित्रपटाची शूटिंग पाहतात तसे घोळका करून पहात होते. एकाला बेदम मारहाण होत असतांना शेकडो नागरिक बघ्यांची भूमिका घेत होते. भरचौकात ही फ्री-स्टाईल सुरु होती. वर्दळीच्या चौकात एकाला अमानुष मारहाण केली जात असतांना कुणीही त्याच्या मदतीला धावून गेले नाही. पोलिसही १० ते १५ मिनिटांनी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पोहचण्यास आणखी जरा वेळ केला असता तर घटनेचं स्वरूप काही वेगळंच पहायला मिळालं असतं. कायद्याचा धाकच न उरल्यागत अपप्रवृत्ती थैमान घालू लागली आहे. पोलिसांची त्यांना जराही भीती उरली नसल्याचे त्यांच्या शहरातील अपराधीक कारवायांवरून पहायला मिळत आहे. शहरात संघटित गुन्हेगारी वाढू लागली आहे. टोळक्याने येऊन मारहाण करण्याच्या घटना घडू लागल्याने शहरवासियांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वर्दळीच्या ठिकाणीही सुरक्षेचा अभाव दिसून येत आहे. शांत शहर म्हणून आपलं वेगळं...

निलगिरी वनात, काय आलं त्याच्या मनात आणि जीवन संपवलं त्यानं क्षणात...

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी घुग्गुस मार्गावरील मंदर गावाजवळ असलेल्या प्रसिद्ध निलगिरी वनात शहरातील जैताई नगर येथील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज १९ जूनला दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. निलगिरी वनातील झाडाला गळफास लावून त्याने आपली जिवन यात्रा संपविली. सनी तिरुपती कन्नुरवार (२२) असे या गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.  सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या निलगिरी वन येथे तरुणाईचा ओढा वाढला आहे. प्रेमी युगलांची मोठ्या प्रमाणात चहल पहल या ठिकाणी दिसून येते. तरुण मुलामुलींच्या वाढलेल्या सहवासाने नागरिकांनी कुटुंबासह या ठिकाणी जाने कमी केले आहे. आज तरुणाने केलेल्या आत्महत्येमुळे या पिकनिक स्पॉटला गालबोट लागले आहे. जैताई नगर येथील रहिवासी असलेला सनी कन्नुरवार हा एकांतिक सहवासात काही क्षण घालविण्याकरिता निलगिरी वनात गेला होता. त्या ठिकाणी असं काय घडलं की, त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, ही चर्चा रंगू लागली आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या युवकाने आत्महत्येसारखा मार्ग निवडून जीवनाचा शेवट केल्याने कुटुंब पुरतं हादरलं आहे. तरुणाच्या अशा या अकाली जाण्यान...

विरकुंड ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू विक्रीला उधाण, सरपंच व गावकऱ्यांनी आमदारांना घातले साकडे

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील विरकुंड या गावासह डोंगरगाव व दहेगाव या गावांमध्ये अवैध दारू विक्रीला उधाण आलं असून गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री केली जात आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी गावात आपले ठिय्ये मांडले आहेत. कुणालाही न जुमानता ते अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. गावातच दारू मिळत असल्याने युवावर्ग व्यसनाधीन होऊ लागला आहे. मजूरवर्गही व्यसनेच्या आहारी गेला आहे. मजूर हे मजुरीला न जाता नशेत तर्रर्र राहतांना दिसत आहेत. गावातील पुरुष मंडळी दारूच्या आहारी जाऊ लागल्याने त्यांचं संसारिक जीवन विस्कळीत होऊ लागलं आहे. कामगार व मजुरांची मिळकत दारूचे व्यसन भागविण्यात खर्ची होत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या उदर्निवाहाचे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गावांमध्ये राजरोसपणे सुरु असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याकरीता विरकुंड ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य व गावकऱ्यांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले. त्यांनी आमदारांना निवेदन देऊन अवैध दारू विक्रीला पायबंद लावण्याची मागणी देखील केली.   विरकुंड, डोंगरगाव व देहेगाव या गावांमध्ये शेतकरी, शेतमजूर, खाजगी नोकरदार व...

काय सांगता... खाजगी मालकी हक्काच्या जागेवर ग्रामपंचायत बांधणार होती पाण्याची टाकी !

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   ग्रामीण भागात सध्या विकास कामांची रेलचेल सुरु असून गाव पातळीवरील विकास कामांसाठी शासनाकडून मुबलक निधी देण्यात आला आहे. काही गावांमध्ये दर्जेदार कामे केली जात असून काही गावांमध्ये मात्र दर्जाहीन कामे करून टक्केवारी लाटली जात आहे. मनरेगा अंतर्गत रस्ते व नाल्यांची कामे गाव खेड्यात धडाक्यात सुरु असून ही कामे अतिशय निकृष्ठ दर्जाची होत असल्याची ओरड गावकऱ्यांमधून ऐकायला मिळत आहे. काही गावांमध्ये मध्ये तर जेथे गरज नाही, तेथेही नाल्या बांधून शासनाचा निधी उधळण्यात आल्याचे दिसून येत आहे. वणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वाघदरा ग्रामपंचायतेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचा दर्जा खालावला असल्याची ओरड गाव वासीयांमधून ऐकायला मिळत आहे. एवढेच नाही तर वाघदरा ग्रामपंचायतने शासनाच्या निधीचीही मोठ्या प्रमाणात उधळण केल्याचे दिसून येत आहे. गावात जल जिवन मिशन योजनेंतर्गत पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असून पाण्याची टाकी उभारण्याकरिता वयक्तिक मालकी हक्काची जागा निवडण्यात आली. या जागेवर बोरही मारण्यात आला. खड्डे खोदून पिल्लरही उभे करण्यात आले. जवळपास पाण्याच्या टाकीचं फाउ...

शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर, तरीही कंत्राटदार खंबीर... हे कोडं सुटेल काय हो !

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरातील पाण्याची समस्या आणखीच बिकट होऊ लागली आहे. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा कंत्राटदारापुढे एकप्रकारे नांगी टाकल्याचे चित्र दिसून येत आहे. अनियमित पाणी पुरवठ्यामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून प्रशासन मात्र हतबल झालं आहे.   शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न आणखीच गंभीर बनला असून पाण्याअभावी नागरिकांचे बेहाल होतांना दिसत आहे. शहरात तीन, चार तर कधी पाच दिवसांआड पाणी पुरवठा केला जातो. नागरिक नळ येण्याची चातकासारखी वाट बघत असतात. पाणी पुरवठा होणाऱ्या दिवसावर तर नळाच्या पाण्याकडे सर्वांच्या नजारा लागलेल्या असतात. शहरातील काही भागात रात्रीला नळ सोडले जात असल्याने लोकं नळाच्या पाण्याकडे टक लावून असतात. पण रात्रभर जागूनही नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांचा चांगलाच मनस्ताप होतांना दिसतो. आज नळाचा दिवस असतांनाही नळाला पाणी न आल्याने नागरिकांची घोर निराशा झाली. पाणी पुरवठा कंत्राटदारासमोर प्रशासनही थिटं झाल्याचं पहायला मिळत आहे. पाणी पुरवठा कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरु असतांनाही पालिकेचा अधिकार...

वैभव कोटेक्स जिनिंगला भिषण आग, लाखो रुपयांचा कापूस जाळून खाक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   निळापूर-ब्राह्मणी मार्गावरील वैभव कोटेक्स या कापसाच्या जिनिंगला भिषण आग लागून टिनाच्या शेड मध्ये ठेवलेला कापूस जळून खाक झाला. ही घटना आज १४ जूनला दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत २ हजार क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. यात जिनिंग मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अस्पष्ट आहे.  सूर्य आग ओकू लागल्याने उष्णतेची दाहकता वाढली आहे. उन्हाळ्यात जिनिंगला आग लागण्याच्या घटना घडत असतात. आज वैभव कोटेक्स या कापसाच्या जिनिंगमध्ये अचानक आग लागली. क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. जिनिंग मधिल टिनाच्या शेड मध्ये ठेवलेला कापूस आगीने आपल्या कवेत घेतला. सुमारे २ हजार क्विंटल कापूस आगीच्या भक्षस्थानी चढला. जिनिंग मधील कर्मचाऱ्यांनी समय सूचकता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याच्या मशीनचा मारा केल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले. अग्निशमनदलही अतिशीघ्र घटनास्थळी पोहचल्याने आग नियंत्रणात आली. अन्यथा आणखी मोठे नुकसान झाले असते. आग नेमकी कशामुळे लागली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे....

कुख्यात गुन्हेगार गब्ब्याची जिल्हा कारागृहात रवानगी, यवतमाळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्याने काढला होता पळ

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  पोलिसांच्या तावडीतून चलाखीने पळालेल्या कुख्यात गुन्हेगाराला वणी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अखेर नागपूर येथून मोठ्या शिताफीने अटक केली. अट्टल चोरटा व अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेला गब्ब्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. यवतमाळ जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचाराकरिता रुग्णालयात भरती केले होते. उपचारा दरम्यान तेथे तैनात असलेल्या पोलिस शिपायांना चकमा देऊन तो अलगद त्यांच्या तावडीतून पळाला. तेंव्हा पासून पोलिस त्याचा युद्ध पातळीवर शोध घेत होते. वणी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अखेर त्याला टिपले. नागपूर येथे नातेसंबंधातील लग्नाला तो येणार असल्याची खात्रीदायक माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. ही संधी दवडायची नाही, हा निर्धारच गुन्हे शोध पथकाने केला. एपीआय माधव शिंदे यांच्या नेतृत्वात पोलिस पथकही नागपूर येथील लग्नात पाहुण्यांच्या वेशात गेलं. आणि त्या लग्नातून गब्याची वरात काढत त्याला त्याच्या खऱ्या सासुरवाडीला (पोलिस स्टेशन) आणलं. त्याची १३ जूनपर्यंत खातिरदारी (पीसीआर) केल्यानंतर त्याची काल का...

अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज वणी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   नांदेड जिल्ह्यातील बोंढर (हवेली) या गावातील तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून अतिशय निर्दयीपणे हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले असून आंबेडकरी चळवळीतील या तरुणाची हत्या करणाऱ्या समाजद्रोह्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संपूर्ण राज्यातून होऊ लागली आहे. जातीयवादी मानसिकता जोपासणाऱ्यांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम केले असून जातीभेद पाळणाऱ्या समाज कंटकांना फासावर चढवण्याचा जनआक्रोश प्रत्येक गाव, शहर व जिल्ह्यातून होऊ लागला आहे. या पँथर तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आज वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आंबेडकरी जन आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून तहसील कार्यालयासमोर हे निषेध धरणे आंदोलन केलं जाणार आहे.  अक्षय भालेराव या तरुणाची जातीयवादी मानसिकतेतून अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गावात जयंती साजरी केल्याचा राग मनात धरून जातीवादाने पछाडलेल्या लोकांनी बेसावध असलेल्या अक्षयची निर्दयीपणे हत्या केली. बोंढर (हवेली) या गावात ड...

सुवर्ण व्यावसायिकाचे १० लाखांचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपींच्या गुन्हे शोध पथकाने आवळल्या मुसक्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील एका सुवर्ण व्यावसायिकाला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा बनाव करून फिल्मी स्टाईल गंडा घालणाऱ्या ठगबाजांना गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून मोठ्या शिताफीने अटक केली. गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि माधव शिंदे यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेत व्यावसायिकाला ठगविणाऱ्या आरोपींचा शोध लावून त्यांना प्रतापगढ, उत्तर उत्तरप्रदेश येथून अटक केली. सलग दोन गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून फरार आरोपींच्या गुन्हे शोध पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पोलिसांना चकमा देऊन पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला देखिल गुन्हे शोध पथकाने चपळता पूर्वक माहिती मिळवून नागपूर येथून मोठ्या शिताफीने अटक केली. गुन्हे शोध पथकाने गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपींचा योग्यरीत्या तपास करून शोध लावल्याने त्यांच्या शोध प्रक्रियेची प्रशंसा केली जात आहे. एका वर्षांपूर्वी सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या नावावर शहरातील एका सुवर्ण व्यावसायिकाला लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करून गंडा घालण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने या प्रकरणाचा छडा लावून १० लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोप...

धारदार तलवारीसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  धारदार तलवार हातात घेऊन परिसरात धुमाकूळ घालीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शस्त्रासह अटक केली आहे. ही कार्यवाही ११ जूनला रात्री १२.२० ते १२.५५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. सपोनि प्रवीण हिरे हे रात्री शहरात गस्त घालत असतांना त्यांना विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तलवारीच्या जोरावर दहशत निर्माण करू पाहणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्याकरिता पोलिस ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. त्यांनी गुन्हेगारी क्षेत्रावर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. पोलिसांनी शहरात रात्रीची गस्तही वाढविली असून गुन्हेगारी कारवाया घडू नये, याकरिता ते नेहमी अलर्ट असतात. शहरातील नटराज चौक येथे एक तरुण हातात तालावर घेऊन परिसरात धुमाकूळ घालत असल्याची माहिती सपोनि प्रवीण हिरे यांना मिळाली. ते पोलिस शिपाई वसीम व श्रीनिवास यांना सोबत घेऊन शहरात रात्रीची गस्त घालत होते. त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांना त्याठिकाणी एक तरुण धारदार तलवार हातात घेऊन धुमाकूळ घालतांना दिसला. तलवारीच्या जोराव...

महिलांवरील अत्याचाराच्या तक्रारीत मोठी वाढ, शारीरिक शोषण व पळून गेल्याच्या तक्रारींनी पोलिसांवरही वाढला तान

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  एखाद्याने प्रलोभन, आमिष देऊन प्रेमाचं जाळ फेकलं की त्यात तरुण मुली व विवाहित महिलाही अलगद अडकल्या जातात. कुणी प्रेमाची शीळ घातली की त्याला प्रतिसाद देणाऱ्या मुलींना मात्र नंतर मोठा पश्चाताप सहन करावा लागतो. प्रेमाच्या चंदेरी दुनियेत रममाण होऊन विवाहाची स्वप्ने रंगविणाऱ्या मुली वासनांधतेला बळी पडतांना दिसत आहे. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलींना ज्यावेळी आपला विश्वासघात झाल्याची जाणीव होते तेंव्हा खूप वेळ झालेली असते. प्रेमात देहभान हरपलेल्या मुलींना जेंव्हा त्यांचा गैरफायदा घेतल्याचं लक्षात येतं, तेंव्हा त्यांचं प्रेमाचं भूत उतरून त्या भानावर येतात. प्रेमाचं वलय निर्माण करून वासना भागविणारे जेंव्हा त्यांना प्रताडित करतात, तेंव्हा महिला व मुलींना आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते. आणि मग त्यांच्यावर पोलिस स्टेशनला तक्रार देण्याची वेळ येते. वणी शहर व तालुक्यात महिला व मुलींचे शारीरिक शोषण आणि त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. महिला व मुलींचे शारीरिक शोषण व त्यांना पळवून नेल्याच्या तक्रारी प्रचंड वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलींनाही ...

राम शेवाळकर परिसर येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर, शिबिरात मोफत केली जाईल संपूर्ण आरोग्य तपासणी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   युनिवर्सल हेल्थ केयर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राम शेवाळकर परिसर येथे ११ जूनला सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे शिबीर असणार आहे. या शिबिरामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत केली जाणार आहे. राम शेवाळकर परिसरातील दामले फैल गेटजवळ असलेल्या युनिवर्सल हेल्थ केयर क्लिनिक येथे हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे.  आरोग्य हीच खरी संपत्ती असून निरोगी राहण्याकरिता शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात मनुष्य आपल्या आरोग्याची हवी तशी काळजी घेऊ शकत नसल्याने मनुष्यामधे विविध आजार बळावू लागले आहेत. मनुष्य आपल्या आरोग्याचीही वेळोवेळी तपासणी करीत नसल्याने त्यांच्यात अनेक व्याधी उत्पन्न होऊन त्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे मनुष्याची आरोग्य तपासणी होऊन त्यांच्यातील रोगाची लक्षणे कळावी या उद्देशाने युनिवर्सल हेल्थ केयर द्वारा मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संपूर्ण आरोग्याची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्याशी तडजोड न करता आरोग्याची तपासणी करून शारीरिक रोग...

काय म्हणावं.. नगर पालिकेचा पाणी पुरवठा झाला बेभरवशाचा, पालिकेच्या कारभाराचा उडाला बोजवारा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या आणखीच गंभीर झाली असून अनिश्चित पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीयांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मागील काही दिवसांपासून वणी नगरपालीकेचं व्यवस्थापनच बिघडलं असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. नगर पालिका प्रशासनाच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचं नियोजनही बिघडलं आहे. पाणी पुरवठ्याचं कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराला ही जबाबदारी पेलणं अवघड जाऊ लागलं आहे. नगर पालिका प्रशासनही कंत्राटदाराच्या अकार्यक्षमतेवर पांघरून घालण्याचं काम करीत असल्याने पाणी पुरवठ्याचा प्रश्न जटील होऊ लागला आहे. एकूणच नगर पालिका प्रशासनाचं पाणी पुरवठा विभागावर नियंत्रणच न राहिल्याने पाणी पुरवठ्याची समस्या आणखीच गडद झाली आहे. पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरु असून त्यांच्या गलथान कारभारामुळे पाणी पुरवठ्याचा वेळ व काळच निश्चित राहिलेला नाही. तीन दिवसांनी होणारा पाणी पुरवठा कधी चार ते सहा दिवसांनीही होतो. त्यामुळे शहरवासी कमालीचे हैराण झाले आहेत. पाणी पुरवठा विभाग व कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे शहरवासीयांना पाणी समस्येशी ...