Posts

Showing posts from October, 2023

वणी रेल्वे क्रॉसिंगवर कोळसा वाहतुकीच्या ट्रकने कारला नेले फरफटत, प्रवाशांचे नशीब बलवत्तर म्हणून टळला मोठा अनर्थ

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने कारला धडक देत काही अंतरापर्यंत अक्षरशः फरफटत नेल्याची थरकाप उडविणारी घटना काल २९ ऑक्टोबरला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा राज्य महामार्गावरील रेल्वे क्रॉसिंग येथे घडली. दैव बलवत्तर म्हणून कारमधील प्रवाशांना कुठलीही इजा झाली नाही. कारमध्ये एक महिला व दोन पुरुष असे तीन जण प्रवास करीत होते. आणखी काही अंतर ट्रकने कारला फरफटत नेले असते तर मोठा अनर्थ घडला असता. ट्रक हा कारला फरफटत नेत असल्याचे लक्षात येताच अन्य वाहन धारकांनी आरडाओरड केल्याने ट्रक चालकाने करकचून ब्रेक लावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, व कार मधील प्रवाशी थोडक्यात बचावले.  कोळसा वाहतूक करणारा ट्रक कोळसा खाली करून घुग्गुसकडे जात असतांना रेल्वे क्रॉसिंग जवळ या ट्रकने कारला धडक देत अक्षरशः फरफटत नेले. रेल्वे क्रॉसिंगवर वाहनांची वर्दळ असल्याने कार चालक हळूहळू कार पुढे नेत असतांना कोळसाखाणीत जाण्याच्या लगबगीत ट्रक चालकाने ट्रक पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. रेल्वे क्रॉसिंग वरील अरुंद रस्त्यावरून आताताईपणे वाहन पुढे रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ट्रक चालकाने कारला धडक दे...

भर वस्तीतून हायवा टिप्पर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकाने काही तासांतच आवळल्या मुसक्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातून दोन मालवाहू हायवा टिप्पर चोरीला गेल्याची घटना २७ ऑक्टोबरला उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून वाहनांचा शोध घेणे सुरु केले. वणी वरोरा या रहदारीने गजबजलेल्या मार्गावरील लॉर्ड्स बियरबार समोर खुल्या जागेत उभे असलेले हायवा टिप्पर चोरट्यांनी चोरून नेल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथक यांच्याकडे चोरी प्रकरणाचा शीघ्र छडा लावण्याची जबाबदारी देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व गुन्हे शोध पथकाने तपासाची सूत्रे हाती घेत चोरट्यांचा कसून शोध घेणे सुरु केले. आसपासच्या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरे तपासण्यात आले असता चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे आढळून आले. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबी तपासून चोरट्यांचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करतांनाच पोलिस पथकाने खबऱ्यांनाही अलर्ट केले. शेवटी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला चोरट्यांचा सुगावा लागला. चोरट्यांनी लंपास केलेले टिप्पर यवतमाळ येथे उभे असल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला मिळाली. पोलिस पथक...

मित्राच्या पार्श्व भागावर चाकूने वार करून पसार झालेल्या आरोपीला डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दारू पिण्याकरिता मित्राने पैसे न दिल्याने त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर चाकूने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी करून पसार झालेल्या आरोपीचा डीबी पथकाने अवघ्या काही तासांतच शोध लावून त्याला बेड्या ठोकल्या आहे. मित्रावर प्राणघातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी भादंवि च्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. साहिल कैलास पुरी (१९) रा. रंगनाथ नगर असे या आरोपीचे नाव आहे. अगदी कमी वयात तो अट्टल गुन्हेगार बनला असून त्याच्यावर अनेक गंभीर नोंद आहेत.  वाजंत्री असलेले युवक दीपक चौपाटी परिसरात वाद्य वाजविण्याचे पैसे मिळाले किंवा नाही याबद्दल आपसात चर्चा करीत असतांना आरोपी त्यांच्याजवळ आला. त्याने संदीप कैलास गेडाम याला दारू पिण्याकरिता पैशाची मागणी केली. त्यावर संदीप गेडाम व त्याच्या मित्रांनी त्याला खर्रा दिला, व घरी जाण्यास सांगितले. मित्राने दारू पिण्याकरिता पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्याला तो अश...

ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप उतरवितांना तोल जाऊन पडलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   ट्रक मधून स्प्रिंकर पाईप उतावितांना तोल जाऊन खाली पडलेल्या हमालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास साई मंदिर जवळील उत्तरवार मशनरीज या व्यवसायिक प्रतिष्ठानाच्या आवारात घडली. तिरुपती पोचन्ना कन्नुरवार (५५) रा. जैताई नगर असे या दुर्दवी मृत्यू ओढवलेल्या व्यक्तीचे नाव आहे.  शहरातील उत्तरवार मशनरीज या व्यवसायिक प्रतिष्ठानाच्या आवारात ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप उतरवितांना तोल जाऊन खाली पडलेल्या हमालाला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्य झाला. दुकानदाराने स्प्रिंकलर पाईपची ऑर्डर दिल्यानंतर स्प्रिंकलर पाईप भरून आलेला ट्रक खाली करण्याकरिता हमाल बोलाविण्यात आले. ट्रक मधून स्प्रिंकलर पाईप खाली उतरविण्याकरिता काही हमाल ट्रकवर चढले. ट्रकवर चढून स्प्रिंकलर पाईप खाली उतरवीत असतांना तिरुपती कन्नुरवार या हमालाचा तोल गेला, व तो ट्रक वरून खाली जमिनीवर कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. रोजंदारीवर कामाला आलेल्या गरीब हमालाचा...

समाजात मानवी मूल्य रुजविणारी बळीराजा ही व्याख्यानमाला आज वणी शहरात, प्रख्यात विचारवंत ज्ञानेश महाराव यांचं होणार व्याख्यान

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शिव महोत्सव समितीच्या वतीने २७ व २८ ऑक्टोबरला स्थानिक बाजोरिया लॉन येथे बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कला, साहित्य व प्रगल्भ विचारातून सामाजिक प्रबोधन घडविणारे प्रखर व्याख्याते ज्ञानेश महाराव यांचं बौद्धिक ज्ञान वृद्धिंगत करणारं व्याख्यान उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. बुद्धिजीवी लोकांची बौद्धिक ज्ञानाची भूक भागविणारी ही व्याख्यानमाला असणार आहे. वैचारिक प्रबोधन ही आज काळाची गरज झाली आहे. समाजात सकारात्मक व उत्तम विचारांची पेरणी करून समाजाला योग्य दिशा दाखविणं गरजेचं झालं आहे. वैचारिक पातळी वाढविण्याकरिता लोकांमध्ये वैचारिक दृष्टिकोन निर्माण करणं अगत्याचं झालं आहे. ज्ञानवर्धक विचारांचं आकलन होण्याकरिता बुद्धीला प्रभावी विचारांचा स्पर्श होणं गरजेचं असून बुद्धिवादी विचारसरणी लोकांमध्ये रुजविण्याकरिता व्याख्यानं घेण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. व्याख्यानातून विचारांचं प्रबोधन व्हावं याकरिता आणि वणी परिसरातील सामाजिक व सांस्कृतिक वातावरण समृद्ध होऊन संस्कृतीकीकरणाला चालना मिळावी या दृष्टिकोनातून शहरात बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आ...

विजया दशमीच्या दिवशी युवकाने घेतला गळफास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   आज विजया दशमीचा सण सगळीकडे साजरा होत असतांना एका वैफल्यग्रस्त युवकाने मात्र गळफास घेऊन जीवनाचा शेवट केल्याने कुटुंबाच्या आनंदावर दुःखाचं विरजण आलं आहे. मजुरी करून उदर्निवाह करणाऱ्या या युवकाने रुखमाई कोल वॉशरी जवळ बांधून असलेल्या झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. गौरीशंकर छेदु कश्यप (३५) रा. राजूर (ई) असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.  वणी यवतमाळ मार्गावरील रुखमाई कोल वॉशरी जवळ एका कारागिराने  तात्पुरती झोपडी बांधून  टायर पंचर दुरुस्तीचे दुकान टाकले होते. परंतु त्या ठिकाणी पंचर दुरुस्तीसाठी ग्राहकच येत नसल्याचे पाहून त्या कारागिराने ते दुकान बंद केले. पण झोपडी मात्र तशीच बांधून होती. त्या झोपडीमध्ये नंतर मृतक व त्याचे भाऊ रहायचे. ती झोपडी त्यांचा निवारा बनली होती. मजुरी केल्यानंतर रात्री झोपडीतच त्या मजुरांचा मुक्काम असायचा. काल रात्री त्या झोपडीत झोपलेला मजूर आज पहाटे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्याच्या भावंडांनी नंतर त्याचा मृतदेह खाली उतरविल्याचे सांगण्यात येते. ...

सावर्ला गावाजवळ आढळून आला अज्ञात इसमाचा मृतदेह, इसम अपघातात ठार झाल्याचा संशय, मृतदेहाची अद्याप पटली नाही ओळख

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा राज्य महामार्गावरील सावर्ला गावाजवळ एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. अपघातात इसमाचा चेहराही छिन्न विछिन्न झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. अपघातात इसमाचा चेहरा अगदीच विद्रुप झाल्याने त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मृतक इसमाजवळ कुठलेही ओळखपत्र आढळून न आल्याने त्याची ओळख पटविणे पोलिसांना कठीण झाले आहे. मृतावस्थेत आढळून आलेल्या वर्णनाचा इसम बेपत्ता असल्याची कुठलीही तक्रार पोलिस स्टेशनला प्राप्त नसल्याने मृतदेहाची ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.   अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात इसम ठार झाल्याची घटना २१ ऑक्टोबरला रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतक इसमाचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष असून उंची ५ फूट ७ इंच आहे. मृतक हा अर्ध नग्न अवस्थेत आढळून आला. मृतक इसमाने फिकट काळ्या रंगाचा पॅन्ट घातला असून त्याच्या उजव...

मनसेच्या दणक्याने बाजार समितीचे अधिकारी आले वठणीवर, आणि शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्याकरिता उपलब्ध करून दिली सुरक्षित जागा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेली जागा अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना त्यांचा माल ठेवण्याकरिता उपलब्ध करून दिल्याने शेतकरी हतबल झाला होता. शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीकरिता आणलेला शेतमाल त्यांना खुल्या मैदानात ठेवावा लागत असल्याने त्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत होता. तसेच बाजार समितीत शेतमाल ठेवण्याकरिता सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने कास्तकारांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत होता. त्यामुळे कास्तकार चांगलेच अडचणीत आले होते. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांकडून कास्तकारांवर अन्याय केला जात असल्याची वार्ता मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांच्या कानावर पडताच त्यांनी कास्तकारांना घेऊन तडक बाजार समितीकडे मोर्चा वळविला. बाजार समितीच्या अन्यायकारक धोरणाला घेऊन त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवण्याकरिता असलेली जागा त्वरित त्यांना उपलब्ध करून द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा गर्भित इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकर यांनी अधिकाऱ्यांना दि...

बसस्थानक येथे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेच्या पती व भावजयवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी बसस्थानक येथे विषारी द्रव्य प्राशन केलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या अनोळखी महिलेची नंतर ओळख पटली. मृतक महिला ही हिवरा मजरा ता. मारेगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले होते. रिता निलेश आसुटकर (४४) असे या विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेचे होते. ती काही दिवसांपासून पठारपूर ता. झरी येथे आपल्या माहेरी रहात होती. तिच्या पतीनेच तिला घर सोडण्यास भाग पाडल्याची माहिती समोर आली आहे. पतीने तिला घर सोडून जाण्यास भाग पाडल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे राहू लागली. पतीचे नात्यातीलच महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याने त्यांच्या संबंधात पत्नी अडथळा बनू नये म्हणून पतीने तिला घर सोडून जाण्यास भाग पाडले. विवाहबाह्य संबंधामुळे पती तिला नांदवायला तयार नसल्याने शेवटी नैराश्येतून तिने मृत्यूला कवटाळले. महिलेचा पतीच तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे मृतक महिलेच्या वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी मृतक महिलेचा पती व तिची भावजय या दोघांवरही महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्...

विहिरीत उडी घेऊन कर्मचाऱ्याची आत्महत्या, सुसाईड नोट वरून पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व सीईओ वर गुन्हा दाखल

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  केशव नागरी सहकारी पतसंस्थेतील कर्मचाऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल १९ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. लक्ष्मण रामचंद्र सिदूरकर (४२) असे या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. लक्ष्मण सिदूरकर हे केशव नागरी पतसंस्था वणी येथे लिपिक पदावर कार्यरत होते. नंतर त्यांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देऊन त्यांची पांढरकवडा शाखेत बदली करण्यात आली. परंतु अल्पावधीतच त्यांची पदोन्नती रद्द करून परत त्यांची लिपिक पदावरच आर्णी येथे बदली करण्यात आली. आधी प्रमोशन देऊन व नंतर डिमोशन करून बदली करण्यात आल्याने ते मानसिक दडपणात आले. पतसंस्थेच्या अन्यायकारक धोरणामुळे तणावात येऊन लक्ष्मण सिदूरकर यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मृत्यू पूर्व लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली असून त्यात पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावांचा उल्लेख आहे. मृतक कर्मचाऱ्याने लिहून ठेवलेली सुसाईड नोट व त्यांच्या पत्नीच्या तक्रारी वरून पोलिसांनी पतसंस्थेच्या अध्यक्ष, सचिव व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ...

त्यांना जनावरांचाही आला कळवळा, आणि केली ५१ हजारांची भरीव मदत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजू, गरिबांना मदतीचा हात देणाऱ्या संजय खाडे यांना प्राणीमात्रांचाही कळवळा आल्याने त्यांनी पशुधनाच्या संवर्धनाकरिता उज्वल गोरक्षण संस्थेला ५१ हजार रुपयांची भरीव मदत देऊन जनावरांच्या पालन पोषणाला आर्थिक हातभार लावला. रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेडचे अध्यक्ष असलेले संजय खाडे हे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. दातृत्व भावना जपणाऱ्या संजय खाडे यांनी गरीब, गरजूंना विविध माध्यमातून मदतीचा हात दिला आहे. गरजू विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक उपक्रम राबवून त्यांना शैक्षणिक साहित्य देखील पुरवलं आहे. सामाजिक व धार्मिक कार्यांना वेळोवेळी आर्थिक सहाय्यता करणाऱ्या संजय खाडे यांनी मानवी संवेदना जपली आहे. सामाजिक जाणिवेतून सहकार्याची भावना ठेवणाऱ्या संजय खाडे यांना मुक्या जनावरांचाही तेवढाच कळवळा असल्याचे प्रत्ययास आले आहे. त्यांच्या उदार व्यक्तिमत्वाचं परत एकदा दर्शन घडलं आहे. जनावरांच्या संगोपनाकरिता त्यांनी उज्वल गोरक्षण संस्थेला ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन मुक्या जनावरांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. संजय खाडे यांनी जपलेली सहकार्याची...

कोळसा व्यवसायिक व काँग्रेसचे नवनियुक्त पदाधिकारी अफसर शेख यांच्या मुलावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलिसांनी तिघांना केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरालगत एका ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी नवीन वागदरा येथील एका टपोरी तरुणासह त्याच्या दोन साथीदारांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या सडकछाप मजनू विरोधात आज तिने दिलेल्या तक्ररी वरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्याच्यासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. आरोपी हा अल्पवयीन मुलीची कधी भर रस्त्यात तर कधी तिच्या घरसमोर जोरजोरात ओरडून छेड काढीत असल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. तिचं जोरजोराने नाव घेऊन व अश्लील शब्द प्रयोग करून आरोपी हा तिला लज्जा येईल असे कृत्य करीत होता. अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठून तिचे नाव घेऊन अश्लील शेरेबाजी करीत तिच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला. अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देणाऱ्या सोहेल अफसर शेख (२०) याच्यासह तेजस भगत व स्वप्नील चिंचोलकर या तीनही आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहेल अफसर शेख या तरुणाने शहरालगत वास्तव्यास असलेल्या एका अल...

बसस्थानक येथे विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळली अनोळखी महिला, ओळख पटविण्याचा पोलिस करीत आहे प्रयत्न

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  स्थानिक बसस्थानक येथे एक अनोळखी महिला विष प्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु महिलेने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळाली आहे. ही महिला कोण व कुठली याबाबत अद्याप शहानिशा झाली नसून पोलिस महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. या महिलेने कुठल्या विवंचनेतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, हे देखील अद्याप कळू शकले नाही. ही प्रवासी महिला नेमकी कुठून आली, व कुठे जात होती, याचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. बसस्थानक परिसरात तिने विष प्राशन केले की, विष प्राशन करून ती प्रवासाला निघाली, ही गुंतागुंत कायम असून त्या दिशेने पोलिस तपास करीत आहे. ही अनोळखी महिला कुणाच्या परिचयाची असल्यास त्यांनी वणी पोलिस स्टेशनला माहिती द्यावी, असे आव्हान ठाणेदार अजित जाधव यांनी केले आहे. 

नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या महिलांनी गरजू व गरीब महिलांनाही दान करावी एक साडी, स्माईल फाउंडेशनचा स्त्रियांसाठीचा अनोखा उपक्रम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   स्माईल फाउंडेशन ही समाजसेवी संघटना नेहमी समाजभिमुख कार्यांना प्राधान्य देत आली आहे. अनेक सामाजिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या हिताचे कार्य करणारी संघटना म्हणून स्माईल फाउंडेशनला ओळखलं जातं. गरीब, गरजूंना विविध माध्यमातून सहकार्य करणाऱ्या या संघटनेने अनेकांना मदतीचा हात दिला आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवून त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासातील अडथळे दूर करण्याचा स्माईल फाउंडेशनचा प्रेरणादायी उपक्रम राहिला आहे. बौद्धिक कल्पकतेतून अनोखे व आदर्शवत उपक्रम राबविणाऱ्या स्माईल फाउंडेशनने आणखी एक आगळी वेगळी संकल्पना समाजापुढे मांडली आहे. सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असल्याने महिलांकडून स्त्री शक्तीचा जागर केला जात आहे. या काळात पुण्यकर्म करण्याचा स्त्रिया प्रयत्न करतात. तेंव्हा देवी म्हणून स्त्रीची उपासना करतांना स्त्रियांना मदतीचा हात देणं तेवढंच पुण्यदायी कर्म आहे. महिला नवरात्री उत्सवात साड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. नव दिवस नवीन साडी घालण्याला महत्व देऊन त्या आपली धार्मिक भावना जपतात. पण अशा अनेक स्त्रि...

त्याने गणरायाला दिलेला निरोप शेवटचा ठरला, गणेश विसर्जन मिरवणुकीत मनसोक्त थिरकलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  ब्राह्मणी या गावात गणेश विसर्जनाची धडाकेबाज मिरवणूक काढण्यात आली. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत तो धूम नाचला. ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत तो मनसोक्त थिरकला. गणेश उत्सव मंडळाचा तो अध्यक्ष होता. त्यामुळे त्याच्यात आणखीच उत्साह संचारला होता. आपल्याला सिकलसेलचा आजार असल्याचंही भान त्याला उरलं नाही. गणपतीला निरोप दिल्यानंतर त्याची अचानक प्रकृती खालावली. त्याला तात्काळ नागपूरला उपचारार्थ हलविण्यात आलं. पण त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. क्षणात त्याची प्राणज्योत मालवली. त्याने गणरायाला दिलेला निरोप शेवटचा ठरला. गोलू उर्फ वैभव जीवन काळे (२२) असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या तरुणाचे नाव आहे.  ब्राह्मणी या गावातील रहिवाशी असलेला जीवन हा सुस्वभावी तरुण होता. गावात त्याच्या अध्यक्षतेत मस्कऱ्या गणपतीची स्थापना झाल्याने त्याच्यात चांगलाच उत्साह संचारला होता. काल गणेश विसर्जनाची धडाक्यात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत तो मनसोक्त थिरकला. तो सिकलसेलचा रुग्ण होता, पण ठणठणीत होता. मिरवणुकीत अति थिरकल्याने अचानक त्याची प्रकृती...

शारीरिक संबंधातून युवकाचं मन भरलं अन.. त्याने लग्नाला दिला नकार, युवतीच्या तक्रारी वरून पोलिस स्टेशनला दाखल झाली एफआयआर

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  युवतीला प्रेम पाशात अडकून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे सतत एक वर्ष शारीरिक शोषण केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या युवकावर शारीरिक शोषण व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शहरातीलच रहिवाशी असलेल्या युवतीला येथीलच एका युवकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विविध प्रलोभने व आमिषे दाखवून तिच्याशी जवळीक साधली. तिला भावविवश करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिच्याशी संसार थाटण्याचे सोनेरी स्वप्न दाखवून त्याने आपली शारीरिक भूक भागविली. डिसेंबर २०२२ पासून त्याने तिचं सतत शारीरिक शोषण केलं. शब्दांनी मोहित करून तो तिच्यावर जीवापाड प्रेम करीत असल्याच्या भूलथापा देऊन वेळोवेळी शारीरिक संबंध प्रथापित करायचा. तिने लग्नाचा विषय काढला की तो टाळाटाळ करायचा. त्याची लग्नाप्रतीची नकारात्मक भूमिका पाहून तिने त्याच्याकडे लग्नाचा आग्रहच धरला. पण त्याने नंतर घुमजाव केले. शारीरिक उपभोग घेतला, व तिच्यापासून मन भरल्यानंतर त्याने लग्नास नकार दिला. गुलाबी प्रेमाचे स्वप्न दाखवून शारीरिक जवळीक साधल्यानंतर त्याने तिला दूर लोटले. त्याच...

स्थानिक गुन्हे शाखा पथकाने केला धाडसी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, डोळ्यात मिरची पॉवडर झोकून उडविली होती रोख रक्कम

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   डोळ्यात मिरची पावडर झोकून वाईन शॉप मालकाची रोख रक्कम पळविणाऱ्या संशयीत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा पथकाने अटक केल्यानंतर त्याला पोपटासारखं बोलतं केलं. त्याने गुन्ह्याची कबुली देतांनाच आपल्या अन्य साथीदारांचीही नावे सांगितली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने धाडसी चोरी करणाऱ्या आठ आरोपींना अटक करीत अट्टल चोरट्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच गुन्हे शाखा पथकाने या टोळीचे तीन धाडसी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आठ आरोपींमध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहतीत वास्तव्यास असलेल्या हनुमंत नरसया कदिरेवार यांचे पांढरकवडा येथेच बोरले वाईन शॉप नावाने दारू विक्रीचे दुकान आहे. ३ ऑक्टोबरला रात्री वाईन शॉप बंद करून ते घरी आले. दिवसभरात दारू विक्रीतुन जमा झालेली रक्कम त्यांनी मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. घराच्या कम्पाऊंडचे गेट उघडण्याकरिता त्यांनी गेट जवळ दुचाकी उभी केली. चाबी दुचाकीलाच लागलेली होती. तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती त्यांना दुचाकीवर बसतांना दिसला. अपरिचित व्यक्ती दुचाकीवर बसल्याचे पाहून ते क्ष...

बहुजन मुक्ती पार्टीचे पांढरकवडा येथे जिल्हास्तरीय अधिवेशन, ठरणार आंदोलनाची दिशा

Image
योगेश मडावी झरी   ओबीसी व मराठा आरक्षणातून जातीजातीत भांडणे, शेतकर्‍यांची आत्महत्या, लोकशाहीची पिछेहाट, शासक जातीचे फोडा आणि राज्य करा आदी गंभीर विषयांवर विचारमंथन आणि पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बहूजन शासक बनो मिशन २०२४ महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत रविवार, १५ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत जिल्हयातील पांढरकवडा येथील नगर परिषद बचत भवनात बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हास्तरीय अधिवेशन ठेवण्यात आले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन आर्णीचे सामाजीक कार्यकर्ता गजानन बुटले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बीएमपीच्या राष्ट्रीय महासचिेव सारीका भगत, युवा बीएमपीच्या राज्य उपाध्यक्ष आकाश कोवे, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. रविकांत कावडे, सामाजीक कार्यकर्ता जिया अहेमद, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल किनाके, राज्य सोशल प्रभारी रुचिरा कानिंदे, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती शामकुवर, आनंदराव पनासे यांची उपस्थिती राहील. हा कार्यक्रम युवा आघाडीचे राष्ट्रीय सचिव सौरभ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या वेळी जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधि...

मालमत्तेच्या वादातून दुकानावर चालविला जेसीबी, मुख्य सूत्रधाराला छिंदवाडा जिल्ह्यातून अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील टिळक चौक ते विराणी टॉकीज रोडवरील माळीपुरा परिसरात असलेले फर्निचरचे दुकान जेसीबीने जमीनदोस्त केल्याची घटना १२ ऑक्टोबरला पहाटे उघडकीस आली. दुकानामध्ये लाखो रुपयांचे साहित्य, किंमती वस्तू, सोन्या चांदीच्या वस्तू व रोख रक्कम असल्याचे सांगण्यात येते. मालमत्तेच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. जागेच्या मालकीहक्कावरून अनेक वर्षांपासून दोन जणांमध्ये वाद सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ देखील आहे. १० ते १२ वर्षांपासून भंडारी हे या ठिकाणी फर्निचरचे दुकान थाटून आहेत. त्यांचा मालमत्तेच्या मालकीहक्कावरून सुरु असलेला संघर्ष न्यायालयापर्यंत पोहचला. दोघांनीही न्यायालयात मालमत्ते बाबत दावा सादर केला. त्यांची न्यायालयीन लढाई सुरु आहे. अशातच मालमत्ता धारकाकडून टोकाचे पाऊल उचलण्यात आले. दुकानावर बेकायदेशीरपणे जेसीबी चालवून दुकानाची नासधूस करण्यात आली. दुकानदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून जेसीबी ऑपरेटर व काही जणांना तात्काळ अटक केली. परंतु मुख्य सूत्रधार मात्र पसार झाले होते. पोलिस त्यांचा कसून शोध घेत होत...

मद्यपी तरुणांचा आशा बार समोर उभा धिंगाणा, घराकडे जात असलेल्या वेकोलि कर्मचाऱ्याला व परिसरातील दोन तरुणांना केली मारहाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी वरोरा राज्य महामार्गावरील विठ्ठलवाडी वळण रस्त्यावर असलेल्या आशा बार समोर मद्याची झिंग चढलेल्या टपोरी तरुणांनी गोंधळ घालत रहिवाशी वस्तीकडे जाणाऱ्या लोकांशी विनाकारण वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला आहे. विठ्ठलवाडी परिसरात वास्तव्यास असलेले वेकोलि कर्मचारी कारने आपल्या निवास्थानाकडे जात असतांना दारू पियुन बार समोर गोंधळ घालत असलेल्या उचापतखोर तरुणांनी विनाकारण त्यांच्याशी वाद घातला. यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्यासोबत होती. मद्यपी तरुणांनी त्यांची कार अडवून त्यांना शिवीगाळ करणे सुरु केले. दरम्यान परिसरातीलच दोन तरुण रस्त्याने टेहाळणी करीत असतांना त्यांना मोहल्ल्यातील व्यक्तीशी मद्यपी तरुण वाद घालतांना दिसले. त्यांनी त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला असता हे मद्यधुंद तरुण त्यांच्याच अंगावर धावून गेले. हे बघून वेकोलि कर्मचारीही कारच्या खाली उतरले. चार ते पाचच्या संख्येने असलेल्या या दारुड्यांनी वेकोलि कर्मचारी व परिसरातील दोन तरुणांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील ...

भालर येथे जुन्या वादातून युवकावर जीवघेणा हल्ला, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  जुन्या वादातून युवकावर प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना १२ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भालर येथे घडली. दोघांमध्ये असलेला जुना वाद अचानक उफाळून आला, व एकाने दुसऱ्यावर बैलबंडीच्या उभारीने हल्ला चढविला. या हल्ल्यात भालर येथील युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. युवकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.   भालर येथे राहणाऱ्या नरेंद्र दोडके या युवकावर गावातीलच आशिष मधुकर वरारकर (३५) याने जुन्या वादातून प्राणघातक हल्ला चढविला. या दोघांमध्ये जुना वाद होता. १२ ऑक्टोबरला नरेंद्र दोडके हा प्रवासी निवाऱ्याजवळील एका पान ठेल्यासमोर उभा असतांना आरोपी आशिष वरारकर याने त्याच्यावर बैलबंडीच्या लाकडी उभारीने जीवघेणा हल्ला चढविला. या हल्ल्यात नरेंद्र दोडके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. बैलबंडीच्या उभारीने ...

बाजार समितीच्या गाळ्यांचा जाहीर लिलाव ढकलला पुढे, खरेदीदारांनी लिलावाकडे फिरविली पाठ

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दीर्घ कालावधी नंतर गाळे लिलावाचा मुहूर्त निघाला. पण खरेदीदारांनी लिलावाकडे पाठ फिरविल्याने लिलावच पुढे ढकलण्याची वेळ बाजार समितीवर आली. ११ ऑक्टोबरला बाजार समितीच्या गाळ्यांचा लिलाव होणार होता. पण गाळे खरेदी करण्यास खरेदीदार इच्छुक नसल्याने लिलाव पुढे ढकलण्यात आला. बाजार समितीच्या गाळे लिलावात खरेदीदारांनी भाग घेणेच टाळले. जेवढे गाळे तेवढेही अर्ज विक्री न झाल्याने गाळ्यांचा जाहीर लिलाव रद्द करण्यात आला. बाजार समितीच्या गाळे लिलावाला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने लिलावच पुढे ढकलण्याची नामुष्की बाजार समितीवर ओढावली. गाळ्यांच्या जाहीर लिलावाची बाजार समितीने विविध माध्यमातून मोठी जाहिरात केली. पण त्यानंतरही गाळे लिलावाला खरेदीदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने लिलाव प्रक्रियाच पुढे ढकलण्यात आली.  कृषी उत्पन्न बाजार समितीचा गाळे लिलाव अनेक दिवसांपासून रखडला होता. दीर्घ कालावधी नंतर महाराष्ट्र राज्य पणन महासंघाने गाळे लिलावाचा मार्ग मोकळा करून दिला. गाळे लिलावाच्या प्रतीक्षेत असलेले अनेक जण गाळ्यांच्या जाहीर लिलावाचा मुहूर्त निघाल्याने उत्साही दिसून आले. गाळे ल...

न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना, अटकपूर्व जामीन मिळालेल्या वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांनी पाळला नाही न्यायालयाचा आदेश

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांसह पाच जणांवर शासकीय निधीचा गैरवापर केल्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी केळापूर सत्र नायायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने काही अटी शर्तींवर त्यांना जामीन मंजूर केला. जामीन मिळाल्यानंतर पाच दिवस या सर्वांना वणी पोलिस स्टेशन येथे हजर राहण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या कालावधीत वैद्यकीय अधीक्षकांसह पाचही जणांनी वणी पोलिस स्टेशनला हजर न राहून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या पाचही जणांची चौकशी करून त्यांचा जामीन रद्द करण्याबाबतचा अहवाल न्यायालयाला पाठविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कांबळे यांनी वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.  कोरोना काळात रुग्णसेवेच्या नावाखाली वैद्यकीय क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या अनेकांनी आपले हात ओले करून घेतले. कोरोना काळ वैद्यकीय क्षेत्रासाठी आर्थिक लाभ देणारा ठरला. कोरोना काळात वॆद्यकीय क्षेत्रात मोठी आर्थिक उलाढाल ...

स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या वितरकाचा परवाना रद्द, इसी ऍक्ट (E.C. Act ) नुसार कार्यवाही न झाल्याने चर्चेला उधाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   वणी तालुक्यातील बेसा (लाठी) या गावातील स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना नियमित धान्य मिळत नसल्याने ते कमालीचे वैतागले होते. अशातच गावकऱ्यांनी स्वस्त धान्य वितरकाचा धान्याने भरलेला ऑटोच रोखून धरत वितरकाचे पितळ उघडे पाडले. स्वस्त धान्य दुकानात धान्य शिल्लक नसतांना वितरकाने बाहेरून धान्य आणले. ऑटोत धान्य भरून आणत असतांना गावकऱ्यांनी वितरकाला रंगेहाथ पकडले. स्वस्त धान्य दुकानदार हा शासकीय योजनेतील धान्याचा काळाबाजार करीत असल्याची शंका आल्याने गावकऱ्यांनी वितरकाची प्रशासनाकडे तक्रार केली. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून तहसीलदारांनी स्वस्त धान्य दुकानातील धान्य साठा तपासाला असता त्यात मोठी तफावत आढळून आली. दुकानदाराने शासकीय धान्यात अफरातफर केल्याचे निदर्शनास आल्याने तहसीलदारांनी तसा अहवाल तयार करून जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाने दादाजी जनार्धन वाघमारे यांचा स्वस्त धान्य वितरणाचा परवाना रद्द करून त्यांच्यावर दंड ठोठावला आहे. ही कार्यवाही २२ सप्टेंबरला करण्यात आली. गोरगरिबांच्या उदर्निवाहाकरिता शासनाकडून पुरविण्यात येणारे धान्य स्वस...

तुम्ही नियमित पाणीकर भरा, आम्ही अनियमित व अशुद्ध पाणी पुरवठा करतो, न.प. प्रशासन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी नगर पालिका प्रशासन शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. मागील अनेक वर्षांपासून शहरात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. कोट्यावधींचा निधी शहरवासियांची पाण्याची समस्या सोडविण्याकरिता खर्च करण्यात आला. पण जलशुद्धीकरण यंत्र दुरुस्ती करण्याचं सौजन्य मात्र दाखविण्यात आलं नाही. नगर पालिका प्रशासन निधी उधळण्याची कुठलीही संधी दवडत नाही. जेथे आपला फायदा, त्या कामाचा वायदा हे धोरण नगर पालिका प्रशासनाने अवलंबले आहे. जनतेचा पैसा मूलभूत सोइ सुविधांवर खर्च न करता अनावश्यक कामांवर प्रचंड उधळला जात आहे. शहरवासियांकडून सक्तीने पाणीकर वसूल करण्यात येतो. पण तेवढीच तत्परता पाणी पुरवठ्याबाबत पाळली जात नाही. अनेक वर्षांपासून नळाद्वारे दूषित पाणी पुरवठा होत असतांना नगर पालिका प्रशासनाने आंधळेपणाचं सोंग घेतलं आहे. जबाबदार अधिकारीही दूषित पाणी पुरवठ्याची समस्या गांभीर्याने घेतांना दिसत नाही. लोकप्रतिनिधीही मूग गिळून चूप बसले आहेत. नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. शहरवासियांमध्ये जलजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...

कोळसाखाणीत करण्यात येणाऱ्या शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांचं जीवन हादरलं

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वेकोलिच्या कोळसाखाणीत नियमांचं पालन न करता तीव्र स्वरूपाची ब्लॉस्टिंग केली जात असल्याने जमिनीला हादरे बसून घरांना तडे जाऊ लागली आहेत. कोळसाखाणीतील शक्तिशाली ब्लॉस्टिंगमुळे भूकंपाचे झटके आल्यागत जमीन हादरली जात असून यामुळे घरांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. कोळसाखाणीतील ब्लॉस्टिंगमुळे ६ ते ७ किमी पर्यंत जमिनीला हादरे बसत असल्याने मजबूत बांधकामानंतरही भिंतींना तडे जाऊ लागली आहेत. कोळसाखानी लगत असलेल्या गावातील घरांचे तर अवसान गळाल्याचे पहायला मिळते. ब्लॉस्टिंगमुळे भिंतींना तडेच नाही तर मोठमोठ्या भेगा पडू लागल्या आहेत. काही घरांचे तर छत गळून पडले आहे. कोळसाखानी लगत असलेल्या गावातील नागरिक भीतीच्या सावटात जिवन कंठत आहेत. ब्लास्टिंगमुळे जमिनीला बसणाऱ्या हादऱ्यांनी आसपासच्या गावातील नागरिक पुरते हादरले आहेत. कोळसाखाणीत नियमांना धाब्यावर बसवून करण्यात येणाऱ्या ब्लॉस्टिंगमुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. ब्लॉस्टिंगमुळे नागरिकांचे जीवनच हादरले असून तक्रारींचा खच पडला असतांनाही जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्रांतर्गत अनेक भू...