सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी विठ्ठलराव नगराळे यांचं आज पहाटे अचानक निधन

प्रशांत चंदनखेडे वणी सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी विठ्ठलराव नगराळे यांचं आज १ जानेवारीला पहाटे अचानक आकस्मिक निधन झालं. रात्री नेहमी प्रमाणे झोपलेले विठ्ठलराव हे पहाटे उठलेच नाही. त्यांना व्ह्रदय विकाराचा झडका आला असावा असा कयास वर्तविला जात आहे. त्यांचा मुलगा राजेश याला वडिलांची शारीरिक हालचाल होत नसल्याचे आढळून आल्याने त्याने वडिलांना जोरजोराने हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. पण कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्याच्या लक्षात आले. मृत्यू समयी त्यांचं वय ८५ वर्षांचं होतं. मध्य रेल्वे विभागात दीर्घ काळ सेवा बजावल्यानंतर मुकद्दम म्हणून ते सेवा निवृत्त झाले. अतिशय मनमिळाऊ व सुस्वभावी व्यक्तिमत्व म्हणून ते परिसरात ओळखले जायचे. आंबेडकरी कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. रेल्वे स्टेशन परिसरात पंचशील झेंड्याची स्थापना करण्यात त्यांचंही महत्वाचं योगदान राहिलं. सर्वांमध्ये घुळमिळून राहणारे विठ्ठलराव अचानक सर्वांना सोडून निघून गेले ते कायमचे. त्यांच्या पश्चात मुलगा राजेश, संजय, दोन सुना व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अशा या अलगद जाण्याने परिसरात शोककळा प...