अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून फरार झालेला आरोपी जेरबंद

प्रशांत चंदनखेडे वणी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांनी शोध लावून त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती प्रेम लादु पाहणाऱ्या या आरोपीने तिचा हात पकडून विनयभंग केल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिस त्याला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार झाल्याचे सांगण्यात आले. तेंव्हा पासून पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. शेवटी तो राहत असलेल्या गावातूनच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. संदेश तिखट (२५) रा. बोधेनगर, चिखलगाव असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ११ फेब्रुवारीला आरोपी विरोधात पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर तो फरार झाला. तेंव्हा पासून पोलिस त्याचा शोध घेत होते. शेवटी आज २९ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता पोलिसांनी चिखलगाव येथून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. तालुक्यातीलच एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आरोपी संदेश तिखट याने विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनला नोंदविली होती. या तक्रारी वरून पोलिस त...