Posts

Showing posts from April, 2025

दरोडा प्रकरणातील फरार आरोपीलाही एसडीपीओ पथकाने ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या झाली सात

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील प्रगती नगर येथे एका व्यावसायिकाच्या घरी दरोडेखोरांनी दरोडा टाकण्याचा केलेला धाडसी प्रयत्न व्यावसायिकाच्या मुलीने समयसूचकता व सर्तकता दाखवून हाणून पाडला. अतिशय प्लॅनिंगने व्यावसायिकाच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा दरोडेखोरांना पोलिसांनी शीघ्र अटक केली होती. तर एक आरोपी फरारीत होता. पोलिस त्याचा कसून शोध घेत होते. शेवटी पोलिसांच्या रडारवर असलेला हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून एसडीपीओ पथकाने त्याला हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथून अटक केली आहे. बंगालसिंग उर्फ साहेबसिंग रतनसिंग चव्हाण (३६) रा. रेल्वे स्टेशन जवळ वसमत जि. हिंगोली असे या पोलिस पथकाने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  प्रगती नगर नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुभाष डोर्लीकर या व्यावसायिकाच्या घरी ५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री दरोडेखोर शिरले होते. ते त्यांच्या घरात चोरीचा डाव साधण्याच्या प्रयत्नात असतांनाच सुभाष डोर्लीकर यांच्या मुलीच्या सर्तकतेमुळे दरडेखोरांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. दरोडेखोरांनी शेवटी तेथून पळ काढला. कारने आलेल्या या दरोडेखोरांनी स्वतःची ओळख पटू नये म्हणून ...

एपीआय धीरज गुल्हाने व पोलिस पथकावर बळ आजमावणाऱ्या मद्यधुंद ट्रक चालकाला अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   मद्यधुंद ट्रक चालक मध्यरात्री ट्रक जोरजोरात रेस करून नागरिकांना त्रास होईल असे वर्तन करीत असतांनाच मोहल्ल्यातील लोकांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत कर्तव्यावर असलेले एपीआय धीरज गुल्हाने हे पोलिस पथकासह घटनास्थळी पोहचले. त्यांना ट्रक चालक हा ड्रायव्हर सीटवर बसून फुल एक्सलेटर देत ट्रक रेस करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी ट्रक चालकाला ट्रकखाली उतरवून त्याची विचारपूस करीत असतांनाच त्याने पोलिसांवरच बळ आजमावण्याचा प्रयत्न केला. दारूच्या नशेत तो पोलिसांशीच हुज्जत घालून ओढाताण करण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांना ढकलाढकल करणाऱ्या ट्रक चालकाला शेवटी पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता तो दारू पियुन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी ट्रक रेस करून लोकांना विनाकारण त्रास व शिवीगाळ करतांनाच शासकीय कामात अडथळे निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नौमान शेख इरशाद शेख (२४) रा. कारवा रोड, नरेंद्र नगर वार्ड बल्लारपूर जि. चंद्रपूर असे या पोलिसांनी अटक केलेल्या...

मंदर शेत शिवारात आढळला गावातीलच इसमाचा मृतदेह

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील मंदर शेत शिवारात गावातीलच इसम मृतावस्थेत आढळून आल्याची खळबळजनक घटना मंगळवार दि. २९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बाळू उर्फ बाळकुष्ण रामचंद्र येवले वय अंदाजे ५५ वर्षे असे मृतकाचे नाव आहे.  मंदर शेत शिवारात गावातील काही लोकांना एक इसम मृतावस्थेत आढळून आला. नंतर ही वार्ता संपूर्ण गावात पसरली. त्यामुळे घटनास्थळावर बघ्यांची एकच गर्दी उसळली. ही वार्ता मृतकाच्या मुलांच्याही कानावर पडल्यानंतर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेंव्हा त्यांना मृतक हा त्यांचाच बाप असल्याचे निदर्शनास आले. नंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतक बाळू येवले हा दारूचा व्यसनी असल्याचे सांगण्यात येते. दुपारी दारू पियुन येत असतांना अति मद्य प्राशनामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सध्या उष्णतेचा पाराही प्रचंड वाढला आहे. भरदुपारी दारू पिल्यानंतर दारूच्या नशेत तो शेत शिवारात पडून राहिला. आणि उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला, अशीह...

दारुड्या मुलाची वडिलांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दारूडया मुलाने वडिलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर दारूच्या नशेत त्याने स्वयंपाक खोलीतील गॅस सिलेंडर हॉलमध्ये आणून आग डब्बीची काडी उगारून घराला आग लावण्याची धमकी दिल्याने भयभीत झालेल्या वडिलांनी पोलिस स्टेशनला येऊन मुलाविरुद्ध तक्रार नोंदविली. वडिलांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील सानेगुरुजी नगर येथे राहणारे अशोक महादेव चटकी (६२) हे शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा राहुल अशोक चटकी (३२) हा दारूचा प्रचंड व्यसनी आहे. दारू ढोसून आला की तो वडिलांना नेहमी शिवीगाळ करतो. २८ एप्रिलला दुपारी ४ वाजता तो रोजच्या सवयीप्रमाणे दारू पियुन घरी आला. आणि मुलीचे शाळेत ऍडमिशन करण्याकरिता २० हजार रुपयांची मागणी करू लागला. मात्र वडिलांनी माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाही, असे म्हणताच त्याने वडिलांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर अंगणात उभी असलेल्या मोटारसायकलवर पेट्रोल टाकून मोटारसायकला आग लावण्याचा प्रयत्न करीत असतांना वडिलांनी त्याला समजाविण्याचा प्...

विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी ट्रकवर आदळली, दुचाकीस्वार गंभीर जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  महामार्गाच्या विरुद्ध दिशेने येणारी मोटारसायकल ट्रकला धडकल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार दि. २९ एप्रिलला सायंकाळी ५.४५ ते ६ वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील वागदरा गावाजवळ घडली. अपघात होताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले.  वणी वरून चारगाव चौकीकडे जाणाऱ्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकवर (MH ३४ BZ ३७४७) त्याच मार्गाने विरुद्ध दिशेने (रॉंग साईड) वणीकडे येणारी दुचाकी (MH २९ W ४४३२) आदळली. या अपघातात दुचाकीस्वाराला जोरदार मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुचाकी ट्रकवर आदळल्याने दुचाकीचा समोरील भाग व ट्रकचे समोरील बंपर क्षतिग्रस्त झाले आहे. दुचाकीस्वार हा कोरपना तालुक्यातील हेटी या गावचा रहिवाशी असून तो काही कामानिमित्त वणीला येत असतांना हा अपघात घडला. वणी घुग्गुस महामार्गाने विरुद्ध दिशेने वणीकडे येत असतांना दुचाकी अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या ट्रकवर आदळली. यात तो गंभीर जखमी झाला. दशरथ राजकुमार मालेकर (३२) असे या अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघात...

गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ, कुलूपबंद घर फोडून ४ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील लक्ष्मी नगर येथिल कुलूपबंद घर फोडून चोरट्यांनी ४ लाख १३ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवार दि. २८ एप्रिलला पहाटे उघडकीस आली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  नांदेपेरा मार्गावरील लक्ष्मी नगर येथे वास्तव्यास असलेले रवींद्र बरडे हे लष्करात आहेत. सैन्य सेवेत असलेले रवींद्र बरडे हे सुट्ट्यांवरच घरी येतात. घरी त्यांची पत्नी सोनू रवींद्र बरडे ही मुलाबाळांसह राहते. त्यांचं दुमजली मकान असून घरी भाडेकरू देखील आहेत. २७ एप्रिलला सोनू बरडे ही कार्यक्रमानिमित्त घराबाहेर गेली असता चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट केले. घराचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील सर्व वस्तू व सामान त्यांनी अस्ताव्यस्त फेकले. बेडरूममध्ये असलेल्या लाकडी कपाटाचे लॉक तोडून त्यांनी त्यातील सोन्याचांदीच्या वस्तू व दागिन्यांवर हात साफ केला. जवळपास ४ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.  चोरट्यांनी सोन्याचे दोन गोफ एक १० ग्राम वजनाचा किंमत ८० हजार रुपये,  तर दुसर...

मागील काही दिवसांत शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एकही धाड नाही, बुकी हद्दपार झालेत की पोलिसांना गवसत नाही, चर्चेला उधाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर मागील काही दिवसांत एकही कार्यवाही न झाल्याने आयपीएल क्रिकेटवर सट्टा बाजार गरम करणारे बुकी शहरातून हद्दपार झाले की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे. एक वेळ अशी होती की, शहरात आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एका मागून एक छापे पडायचे. शहर पोलिसच नाही तर यवतमाळ येथील पोलिस पथकही वणी येथे रेकी करून आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकायचं. परंतु आता शहरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टाच खेळला जात नसल्याचे पोलिसांच्या न होणाऱ्या कार्यवाही वरून दिसून येत आहे. आयपीएल क्रिकेटवर सट्टा बाजार चालविणारे बुकी शहरातून हद्दपार झाले की, पोलिसांचा कार्यवाहीचा दृष्टीकोन बदलला, हा आता शहरात चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा बाजार चालविणारे बुकी शहरात आजही त्याच प्रमाणात सक्रिय असल्याची चर्चा आयपीएल क्रिकेट प्रेमींमधूनच ऐकायला मिळत आहे. मात्र शहरातील सट्टा अड्डे पोलिसांच्या नजरेपासून लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. आणि म्हणूनच आयपीएलचं यावर्षीचं अर्ध अधिक सत्र संपलं असतांनाही आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर एकही कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. आयपीएल क्रिकेटच...

वाहतुकीच्या पासवर होत आहे सर्रास रेती तस्करी, महसूल विभागाने रेती तस्करी करणारे दोन ट्रक पकडले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वाळू तस्करी करणाऱ्या दोन ट्रकांवर महसूल विभागाने कार्यवाही केली असून दोन्ही ट्रक ताब्यात घेऊन वणी एसटी डेपोत लावले आहेत. वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर कार्यवाही करण्यास महसूल विभाग सरसावला असला तरी रेती तस्कर मात्र महसूल विभागाच्या नाकावर टिच्चून रेती तस्करी करीत असल्याचे दिसून येत आहे. महसूल विभाग रेती चोरी करणाऱ्या ट्रकांवर एका मागून एक कार्यवाही करीत असतांना वाळू माफिया मात्र महसूल विभागापुढे वेळोवेळी आव्हान उभे करतांना दिसत आहेत. महसूल विभागाच्या कार्यवाहीची जराही भीती न बाळगता वाळू तस्कर रेती घाटावरून सर्रास रेतीची चोरी करून ती काळ्या बाजारात विकत आहेत. त्यामुळे महसूल विभागाच्या कार्यवाहीचा वाळू माफियांनी जराही धसका घेतल्याचे दिसत नाही.  महसूल विभागाने दोन दिवसांत दोन रेती तस्करीच्या ट्रकांवर कार्यवाही केली. वरोरा तालुक्यातील करंजी रेती घाटावरून एका कंपनीला रेती वाहतुकीचा परवाना मिळाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या कंपनीने रेतीची वाहतूक करण्याकरिता अनेक ट्रक भाडेतत्वावर लावले आहेत. मात्र वाहतूकदार रेती वाहतुकीच्या पासवर रेती तस्करीचा गोरखधंद...

राजूर येथे प्रबोधन कार्यशाळेतून होणार महापुरुषांच्या धगधगत्या विचारांवर मार्गदर्शन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  राजूर विकास संघर्ष समितीच्या विद्यमाने २६ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता प्रबोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राजूर बुद्धविहाराजवळील महिला मंडळ हॉलमध्ये ही प्रबोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या प्रबोधन कार्यशाळेत "विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा राज्य समाजवाद" या विषयावर अखिल भारतीय संवैधानिक हक्क परिषदेचे अध्यक्ष गीत घोष हे मौलिक मार्गदर्शन करणार आहेत.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प.स. सदस्य अशोक वानखेडे हे राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राजूर ग्रा.प. सरपंच विद्या पेरकावार, माजी सरपंच प्रणिता मो. असलम, पो. पा. वामन बल्की, महादेव तेडेवार, राजूर दीक्षाभूमी बुद्धविहार समितीचे सचिव जितकुमार चालखुरे, आदिवासी युवा जनजागृती संघटनेचे ऍड. अरविंद सिडाम, मारोती बल्की, अनिल डवरे, दिनेश बल्की यांची उपस्थिती लाभणार आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग सागर आहेत. त्यांच्या ज्ञानाने विश्वाला चकित केलं. त्यांच्या ज्ञानाचा पाझर अख्ख्या विश्वात झाला असतांना एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या कार्याची महिती बहुजनांना सांगावी लागते, ...

विदर्भ राज्य आंदोलन समिती महाराष्ट्र दिन काळा दिवस पाळून करणार निषेध आंदोलन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला घेऊन सातत्याने केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र आंदोलन छेडणाऱ्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने १ मे महाराष्ट्र दिन हा काळा दिवस पाळून निषेध आंदोलन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुषंगाने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वणी, मारेगाव व झरी तालुक्याच्या वतीनेही महाराष्ट्र दिनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर सकाळी १० वाजता निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.  महाराष्ट्रात विदर्भावर नेहमी अन्याय होत आला आहे. राज्यकर्त्यांनी विदर्भाला नेहमी सावत्र वागणूक दिली आहे. मुबलक खनिज संपत्ती व वन संपत्तीने नटलेला विदर्भ नेहमीच उपेक्षित राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्रात राहून विदर्भाची प्रगती होणे हे अशक्यप्राय आहे. महाराष्ट्रात विदर्भाला कधी न्याय मिळेल ही अपेक्षा ठेवणं म्हणजे मृगजळाच्या पाठीमागे लागण्यासारखं आहे. तेंव्हा विदर्भातील जनतेच्या सर्वांगीण विकासाकरिता वेगळा विदर्भ हाच एकमेव पर्याय उरला आहे. आणि म्हणूनच विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भ राज्यासाठी सातत्याने लढा देत आहे. परंतु वेगळ्या विदर्भ राज्य निर्मित...

बहिणीबद्दल सासरी लावालावी करीत असल्याच्या संशयावरून मायलेकाची शेजाऱ्याला मारहाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  बहिणीच्या संसारात ढवळाढवळ करीत असल्याच्या संशयावरून दारूच्या नशेत शेजाऱ्याशी वाद घालून त्याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुर्भा (नवीन) या गावात घडली. मारहाणीत जखमी झालेल्या शेजाऱ्याने मारहाण करणाऱ्यांविरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मायलेकावर गुन्हा दाखल केला आहे.  झरी तालुक्यातील दुर्भा (नवीन) या गावात एकमेकांच्या घराशेजारी राहणाऱ्या अशोक हुसैन्ना करडवार (४६) व जगदीश चिन्नना दुर्लावार (३५) यांच्यात काही ना काही कारणावरून नेहमी खटके उडत असतात. जगदीश दुर्लावार हा दारूच्या नशेत नेहमी वाद घालत असल्याचे अशोक करडवार याचे म्हणणे आहे. अशोक हा बहिणीच्या संसारात विष कालविण्याचं काम करीत असल्याने बहिणीला सासरी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याच्या संशयावरून जगदीश अशोकशी नेहमी वाद घालायचा. २२ एप्रिलला रात्री ८ वाजता जगदीश दारू पियुन आला व याच कारणावरून अशोकशी वाद घालू लागला. त्यांच्यातला वाद विकोपाला जाऊन जगदीशने अशोकला लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरवात केली. अशोकच्या पाठीवर, मानेवर व उजव्या ...

कुटूंबं गेलं लग्नाला आणि चोरट्यांनी मारला डल्ला, बंद घर फोडून चोरट्यांनी साडेचार लाखांचा मुद्देमाल केला लंपास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  तालुक्यातील चिखलगाव येथे घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना १९ एप्रिल ते २४  एप्रिल दरम्यान घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   चिखलगाव येथील बोढाले ले-आऊट येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. हेमंत पुरुषोत्तम देठे (३७) यांच्या तक्रारी नुसार ते कुटुंबासह नागपूर येथे लग्नाला गेले होते. घराला कुलूप लागले असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी कुलूपबंद घराला टार्गेट करीत घरातील मौल्यवान वस्तू व रोख रक्कमेवर हात साफ केला. दरवाजाचा कुलूपकोंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. बेडरूमधील कपाट फोडून त्यात ठेऊन असलेले २० ग्राम वजनाचे दोन सोन्याचे मंगळसूत्र किंमत १ लाख ६० हजार रुपये, ५ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत ८० हजार रुपये, २ ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किंमत ३२ हजार रुपये, सोन्याचा गोफ किंमत ३२ हजार रुपये, सहा चांदीचे चाळ किंमत १० हजार रुपये व रोख रक्कम १ लाख...

पूर्व वैमनस्यातून दोघांनी एकाला लोखंडी रॉडने मारून केले जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   पूर्व वैमनस्यातून दोघांनी एकाला लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता दीपक चौपाटी परिसरात घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील खडबडा मोहल्ला येथे राहणारा फिरोज खान ताहीर खान (४४) हा विनर्स बियरबारमध्ये काम करतो. सात महिन्यांपूर्वी गोकुळनगर येथे राहणारे अनिल हिरामन घोगरे (२४) व योगेश कैलास घोगरे (२२) यांनी विनर्स बियरबारमध्ये येऊन विनाकारण धिंगाणा घातला होता. हे दोघेही बियरबारमध्ये गोंधळ घालत असतांना त्यावेळी फिरोज खान ताहीर खान याने दोघांनाही बियरबारच्या बाहेर काढले होते. तो राग मनात ठेऊन या दोघांनी फिरोज खान ताहीर खान याला दीपक चौपाटी परिसरात लोखंडी रॉडने जबर मारहाण केली.  फिरोज खान हा २३ एप्रिलला दुपारी १२ वाजता दीपक चौपाटी परिसरातून जात असतांना अनिल व योगेशने त्याला अडविले. सात महिन्यांपूर्वी तु आम्हाला बियरबारच्या बाहेर काढले होते, असे म्हणत या दोघांनीही त्याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरवात केली. लोखंडी रॉड फिरोज खान याच्या हातावर व डोक्यावर मा...

दोघा भावांनी गावच्या पोलिस पाटलाला केली जबर मारहाण, कुऱ्हाडीच्या दांड्याने फोडले डोके

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती प्रचंड वाढली असून गुन्हेगारी कारवायांमध्येही प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. प्राणघातक हल्ले व मारहाणीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे दिसून येत आहे. मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बंदिवाढोणा येथे गावच्या पोलिस पाटलाला दोन भावांनी थापडा बुक्क्या व कुऱ्हाडीच्या दांड्याने जबर मारहाण केल्याची घटना २१ एप्रिलला रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. आरोपींनी कुऱ्हाडीचा केलेला वार पोलिस पाटलाने हाताने रोखल्याने मोठा अनर्थ टळला. नाही तर खडकडोह येथील घटनेची पुनरावृत्ती झाली असती. झालेल्या मारहाणी बाबत पोलिस पाटलाने मुकुटबन पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी भावंडांवर गुन्हा दाखल केला आहे.  वणी तालुक्यातील सोनेगाव येथे वास्तव्यास असलेले संजय लक्ष्मीनारायण जयस्वाल (५५) हे शेतकरी असून सोनेगावचे पोलिस पाटील देखील आहेत. त्यांच्याकडे ट्रॅक्टर ट्रॉली असून ते ट्रॅक्टर भाडेतत्वार देखील चालवितात. २१ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता बंदिवाढोणा येथील शेतात शेणखत टाकण्याकरिता पो...

रेती घाटांवरून रेती तस्करी जोमात, महसूल विभागाने रेती चोरी करणारा आणखी एक ट्रक पकडला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  रेती तस्करीसाठी पूरक असलेला तालुका म्हणून वणी तालुक्याची ओळख निर्माण झाली आहे. रेती तस्करांचं पीक येथे वाढतच चाललं आहे. वाळू तस्करांनी येथे आपली पाळेमुळे घट्ट केली आहेत. महसूल विभागाला न जुमानता वर्धा व पैनगंगा नदीच्या रेती घाटांवरून वाळू चोरटे सर्रास वाळूची चोरी करतांना दिसत आहेत. तस्करांनी वर्धा व पैनगंगा नदी पात्र अक्षरशः पोखरून टाकले आहेत. दररोज रेती घाटांवरून रेती भरलेले ट्रक निघत आहेत. अवैधरित्या रेतीचं उत्खनन करून १० व १२ चाकी ट्रकांच्या माध्यमातून बिनधास्त रेतीची तस्करी केली जात आहे. तालुक्यात वाळू तस्करी अनेक दिवसांपासून सुरु असून वाळू तस्करीला उधाण आलेलं असतांनाही वाळू तस्करी रोखण्याकरिता महसूल विभागाकडून कुठेलेही ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही.  आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा, अशा प्रकारची कार्यवाही होतांना दिसत आहे. त्यामुळे रेती तस्करीच्या या पटलावर तस्कर व महसूल विभाग साकारत असलेल्या भूमिकांची शहरात जोरदार चर्चा होतांना दिसत आहे. रेती तस्करांनी उच्छाद मांडला असतांनाही महसूल विभाग तस्करांविरुद्ध कार्यवाहीचा बडगा उगारत ना...

जमील उर्फ मौला याने शिवीगाळ, धमकी व लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे राहणारा जमील उर्फ मौला एनुलहक शेख (२४) हा गुंड प्रवृत्तीचा तरुण असून तो गुंडगिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. अपराधीक कारवायांनी नेहमी चर्चेत राहणाऱ्या राजूरची ती ओळख पुसली जात असतांनाच काही भाईगिरी अंगात आणणारे तरुण परत गुन्हेगारी वर्तुळ तयार करू लागले आहेत. भाईगिरीचा आव आणून लोकांमध्ये दहशत पसरवू लागले आहेत. राजूर येथील गुन्हेगारी कारवायांची धग कमी झालेली असतांना हे अपप्रवृत्तीचे तरुण गुन्हेगारी क्षेत्राला हवा देण्याचं काम करीत आहेत. मिनी इंडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर या गावात परत दहशतीचं वातावरण निर्माण करण्याचं काम काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांकडून केलं जात आहे. जमील उर्फ मौला याच्या विरुद्ध शिवीगाळ, धमकी व लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याच्या दोन वेगवेगळ्या तक्रारी पोलिस स्टेशनला करण्यात आल्या आहेत. मौला याच्या पासून जिवीतालाही धोका असल्याचे तक्रारकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.  राजूर (कॉ.) येथे राहणाऱ्या मो. सलीम मो. कादिर अली (२४) याचे वडील मो. कादिर ...

वणी पोलिस स्टेशन हद्दीत आढळला आणखी एक अनोळखी मृतदेह, मागील तीन दिवसांत आढळले दोन मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी पोलीस स्टेशन हद्दीत एका पाठोपाठ एक अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळू लागल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. हे व्यक्ती उष्माघाताने मृत्युमुखी पडत आहेत की, आणखी कुठले कारण आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील दीप्ती टॉकीज जवळ आणखी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. ५० ते ५५ वर्षे वयोगटातील हा इसम असून त्याची उंची ५ फूट ८ इंच एवढी आहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. मागील तीन दिवसांत दोन व्यक्तींचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी आढळले. सुशगंगा पॉलिटेक्निक जवळ आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून मृतक हा घुग्गुस येथील रणजित बहादूर सिंग (२५) असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी पूर्ण शहानिशा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द केला. मात्र दीप्ती टॉकीज जवळ आढळलेल्या मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटायची आहे. पोलिस अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत असून सदर मृत इसम हा कुणाचा नातेवाईक किंवा कुणाच्या परिचयाचा असल्यास त्यांनी जमादार गजानन होडगीर (9623441265) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

चक्क सुलभ शौचालयाच्या मागे सुरु होता मटका, एलसीबी पथकाने केली धडक कार्यवाही

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   अवैध धंद्याचं समूळ उच्चाटन करण्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश असल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने शहरात गस्त घालत असतांना त्यांना भाजी मंडई परिसरातील सुलभ शौचालयाच्या मागे वरळी मटका सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे लोकांची मोठी गर्दी आढळून आली. तेथे काही इसम लोकांकडून पैसे घेऊन एका छोट्या पावतीवर मटक्याचे आकडे लिहून देतांना आढळले. सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे मटका अड्डा चालविला जात असल्याची खात्री पटल्यानंतर एलसीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली. एलसीबी पथकाने धाड टाकताच मटका लावणारे लोक पळत सुटले. तसेच मटका पट्टी फाडणाऱ्यांनीही पळ काढला. मात्र मटका पट्टी फाडणारा एक जण पथकाच्या हाती लागला. पथकाने त्याला ताब्यात घेत घटनास्थळावरून मटक्याचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. हि कार्यवाही १९ एप्रिलला दुपारच्या सुमारास करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी राजरोसपणे मटका अड्डे सुरु आहेत. पोलिस स्टेशनच्या उंबरठ्यापासून काही अंतरावरच मटका जुगार खेळला जात असतानाच...

मो. मौला कुठे आहे यावरून उफाळला वाद, राजूर (कॉ.) येथे दोघा बापलेकांची एकाला मारहाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  तालुक्यातील राजूर (कॉ.) येथे दोघा बापलेकांनी एकाला शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याची घटना १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी बापलेकांवर गुन्हा दाखल केला आहे.  राजूर (कॉ.) येथे राहणारा मोहम्मद आसिफ एनुल हक ( २५) हा गुप्ता कोल वॉशरी येथे लोडर ऑपरेटर म्हणून काम करतो. १८ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता मोहम्मद आसिफ हा गावातीलच ताज बुक डेपो येथे एकटा बसून असतांना राजूर (कॉ.) येथेच राहणारे मो. कादिर अली झाकीर अली (४८) व मो. सलीम उर्फ सैफ कादिर अली हे दोघे बापलेक तेथे आले. त्यांनी मो. आसिफला तुझा भाऊ मोहम्मद मौला कुठे आहे असे विचारले. त्यावर आसिफने मला माहित नाही तो कुठे आहे, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडलेल्या दोन्ही बापलेकांनी आसिफला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. तसेच सलीम उर्फ सैफ याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड आसिफच्या मानेजवळ मारला. लोखंडी रॉडचा मार लागल्याने आसिफ जखमी झाला. तेवढ्यात आसिफचा भाऊ मोहम्मद आमिन हा तेथे आला. आमिनने माझ्या भावाला का मारहाण केली असे विचारले असता कादिरने...

जुन्या वादातून जितेंद्रला लाकडी दांड्याने मारून केले जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   जुन्या वादाचा वचपा काढत एकाने दुसऱ्याला लाकडी दांड्याने मारून जखमी केल्याची घटना १९ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास शहरातील खडबडा मोहल्ला येथे घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.  तालुक्यातील लालगुडा (नविन) येथे राहणाऱ्या जितेंद्र महादेव डहाके (४०) याचा तीन वर्षांपूर्वी शहरातील खडबडा मोहल्ला येथे राहणाऱ्या शंकर किनाके (३२) या युवकासोबत वाद झाला होता. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांचे चांगले सोबती होते. सोबतच मजुरीची कामेही करायचे. आपसात सलोख्याचे संबंध असतांना अचानक काही कारणांवरून त्याच्यात वाद निर्माण झाला. त्यावेळी या दोघांमध्ये चांगलेच भांडण झाले होते. तो राग शंकर किनाके याने मनात धरून ठेवला. १९ एप्रिलला जितेंद्र हा खडबडा मोहल्ला येथील लक्ष्मण कोमरेड्डीवार यांच्या किराणा दुकानाजवळ उभा असतांना शंकर किनाके हा त्याच्या जवळ आला व जुना वाद उकरून काढत त्याला शिवीगाळ करू लागला.  शंकर हा शिवीगाळ करीत असतांना जितेंद्र याने शिवीगाळ कशाला करतो, असे म्हणताच शंकरने लाकडी दांड्याने...

मध्यरात्री संशयितरित्या आढळलेल्या इसमाला पोलिसांनी केली अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शहरातील योगीराज नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी मध्यरात्री संशयितरित्या आढळून आलेल्या इसमाला पोलिसांनी अटक केली. निर्माणाधीन वास्तूत अंधारात लपून बसलेला हा इसम अपराधीक घटना घडविण्याच्या उद्देशानेच येथे लपून असल्याच्या शक्यतेवरून पोलिसांनी त्याला अटक केली. रमेश लटारी राऊत (३७) रा. सिंधीवाढोणा ता. वणी असे या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवार २० एप्रिलला रात्री शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना पहाटे २.३५ वाजताच्या सुमारास बसस्थानका मागील योगीराज नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी एक इसम संशयितरित्या आढळून आला. निर्माणाधीन वास्तूत तो लपून बसला होता. त्याच्यावर पोलिसांची नजर पडताच तो तेथून पळ काढण्याचा तयारीत असतांनाच पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने रमेश लटारी राऊत असे सांगितले. मध्यरात्री निर्माणाधीन वास्तूत काय करतो व अंधारात येथे लपून का बसला आहे, याबाबत पोलिसांनी त्याला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यावरून चोरी किंवा घरफोडी करण्याच्या उद्देशानेच हा इसम येथे लपून बसला असल्याचा दाट स...

विद्युत प्रवाह सुरळीत करतांना विजेचा धक्का लागून मजुराचा मृत्यू

Image
संग्रहित फोटो   प्रशांत चंदनखेडे वणी  विद्युत खांबावर चढून वीजप्रवाह सुरळीत करतांना रोजंदारीने काम करणाऱ्या एका कामगाराचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २० एप्रिलला घडली. अतुल भाऊराव कोसारकर (३०) रा. मोहुर्ली ता. वणी असे या करंट लागून मृत्युमुखी पडलेल्या मजुराचे नाव आहे.  १८ एप्रिलला आलेल्या वादळी पावसामुळे मोठंमोठे वृक्ष कोसळले. एमआयडीसी परिसरातही एका विद्युत खांबावर वृक्ष कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराला वीज प्रवाह सुरळीत करण्यास सांगितले. कंत्राटदाराने तुटलेल्या विजेच्या तारा जोडण्याकरिता त्याठिकाणी मजुर पाठविले. कंत्राटदाराने पाठविलेले दोन मजूर विद्युत खांबावर चढून वीज तारांवर कोसळल्या वृक्षाच्या फांद्या तोडत असतांना एका मजुराला जिवंत विजेच्या तारेचा स्पर्श झाला. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीज प्रवाह सुरळीत करण्याचे काम सुरु असतांना त्याठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित करणे गरजेचे असतांना त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एका रो...

टायर पंचर दुरुस्तीचे दुकान असलेल्या तरुणाचा अभिनय क्षेत्रातील थक्क करणारा प्रवास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   स्वप्न तर सगळेच बघतात, पण स्वप्नांना वास्तवात उतरविण्याची जिद्द बाळगल्यास स्वप्नांच्या क्षितिजापलीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. स्वप्न साकार व स्वप्नांना आकार देण्याचं सामर्थ्य अंगी असेल तरच यशस्वी जीवनाची वाट गवसते. स्वप्नांना प्रयत्नांची किनार मिळाली की, स्वप्नवत वाटणाऱ्या जगातही पाऊल ठेवता येतं. जीवनात अशक्य असं काहीच नाही, पण ते साध्य करण्याची जिद्द माणसात असली पाहिजे. स्वप्न सर्वांनाच खुणावतात पण स्वप्नांचा पाठलाग करणारा माणूसच जीवनात यशस्वी होतो. ते म्हणतात ना "मंझिल उन्ही को मिलती है, जिनके सपनो मे जान होती है, पंखों से कुछ नही होता, हौसलों से उडान होती है,"।  अशाच एका धेय्यवेड्या तरुणाने स्वप्नवत वाटणाऱ्या चंदेरी दुनियेत आपलं पाऊल रोवलं आहे. त्याने स्वप्न बघितली आणि ती साकारही करून दाखविली. अभिनेता बनण्याचं त्याचं स्वप्न हळू हळू साकार होतांना दिसत आहे. चित्रपटात अभिनय करण्याची महत्त्वाकांक्षा त्याच्या अंतरमनात ठायी ठायी रुजली होती. अभिनय करण्याच्या इच्छाशक्तीने झपाटलेला हा तरुण छोट्या पडद्यावरील भूमिकेसाठी ऑडिशन देऊ लागला. अशातच त्याची स्वप्नपू...

सुसाट वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले, चक्रीवादळाप्रमाणे होता वाऱ्याचा वेग, टिनपत्रे उडाली, झाडे कोलमडली, विजेची तारं तुटली

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  उन्हाळा तापू लागल्याने उष्णतेने जीव कासावीस होऊ लागला असतांनाच निसर्गाने कूस बदलली. उष्णतेचे चटके सहन करणाऱ्या नागरिकांना भर उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अनपेक्षितपणे अनुभव आला. चक्रीवादळासारखा वाऱ्याचा वेग पाहून वणीकरांची चांगलीच भंबेरी उडाली. सुसाट वारा आणि कोसळणाऱ्या जलधारा हे निसर्गाचं भयावह रूप उरात धडकी भारावणारं होतं. पालापाचोळा उडतो तशी घरावरील टिनपत्रे उडाली. काही घरांचे तर छतचं उडाले. झाडं कोलमडली, विद्युत तारा तुटल्या. वादळी पावसाचा सर्वात मोठा फटका बसला तो रंगनाथ स्वामी जत्रेला. जत्रेतील दुकानांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगण्यात येते. वादळी पावसाचा बैल बाजारालाही मोठा फटका बसला आहे.  सूर्य आग ओकत असतांनाच अचानक सायंकाळी ५ वाजतानंतर निसर्गाचं रूप बदललं. ढगाळ वातावरण निर्माण झालं आणि सुसाट्याचा वारा सुटला. वेगवान वारा वाहू लागल्याने शहरात एकच धांदल उडाली. नागरिक मिळेल तेथे आश्रय घेऊ लागले. रस्त्यांनी मार्गक्रमण करणारे नागरिकही सैरवैर झाले. स्वतःचा बचाव करण्याकरिता ते सुरक्षित आडोसा शोधू लागले. तुफानात अडकलेल्या नागरिकांना प्रसंगी मालवाहू वाह...

तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या, एका तरुणीने व एका इसमाने घेतला गळफास

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  तालुक्यात आत्महत्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून एकाच दिवशी दोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने तालुका हादरला आहे. तालुक्यातील पुरड (पुनवट) येथील एका तरुणीने राहत्या घरी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तर चिखलगाव येथील एका इसमाने घरातच गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. या दोन्ही आत्महत्यांच्या घटना १८ एप्रिलला उघडकीस आल्या. तालुक्यातील चिखलगाव येथील रहिवाशी असलेल्या संभा बापूराव निकोडे (५५) यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १८ एप्रिलला सकाळी उघडकीस आली. घरी कुणी नसल्याची संधी साधून त्यांनी राहत्या घरीच नैराशेतून गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. कुटुंबातील सदस्य जेंव्हा घरी परतले तेव्हा त्यांना संभा निकोडे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. ही माहिती नंतर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास पोलिस करीत आहे.  दुसरी आत्महत्येची घटना शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पुरड (पुनवट) येथे १८ एप्रिल...

मुलीने प्रेम विवाह केल्याच्या रागातून कुटुंबीयांनी घातला राडा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबातील तरुण व तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले व त्यांनी प्रेमविवाह केला. मात्र मुलीने प्रेमविवाह केल्याची खंत तिच्या कुटुंबियांना सतत जाणवत होती. मुलीने आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली होती. कुटुंबीयांचा विरोध पत्करून मुलीने प्रेमविवाह केल्याची खद त्यांच्या मनात खदखदत होती. त्यामुळे प्रेमविवाह केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांशी त्यांचा सतत वाद व्हायचा. अशातच १५ एप्रिलला वादाची ठिणगी उडली व दोन कुटुंबांमध्ये प्रचंड राडा झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाच्या कुटुंबियांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले. त्यामुळे झालेल्या मारहाणीबाबत तरुणाच्या बहिणीने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील रंगनाथ नगर येथे एकमेकांच्या घराशेजारी राहणारे तरुण तरुणी प्रेमात पडले. प्रेमातून त्यांच्यात घनिष्ठ संबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी २० दिवसांपूर्वी प्रेमविवाह ...

शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती शहरासह संपूर्ण तालुक्यात आनंद, उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमही घेण्यात आले. राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयंती दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करण्याकरिता शहरवासीयांनी सकाळपासूनच त्यांच्या पुतळ्याजवळ गर्दी केली होती. सायंकाळी शहरातील बहुतांश वार्डातून त्यांच्या जयंती निमित्त वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत आकर्षक सजावटींसह दैदिप्यमान देखावेही साकारण्यात आले होते. जयभीमच्या जयघोषाने आसमंत निनादला होता. यावर्षी निघालेल्या भव्य दिव्य मिरवणुकीने वणीकरांचे लक्ष वेधले. शहरातील प्रमुख मार्गाने निघालेली ही मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे पोहचल्यानंतर बुद्ध वंदनेने मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी प्रत्येक वार्डातील प्रमुखांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ...