बाळ जन्माचा आनंद ठरला औटघटकेचा, अखेर काळजाच्या तुकड्याला काळाने हिरावलं

प्रशांत चंदनखेडे वणी घरात नविन पाहुण्याचं आगमन होणार असल्याचा आनंद त्यांच्या सांसारिक जीवनात ओसंडून वाहत होता. घरात नवीन पाहुणा येणार असल्याच्या गोड बातमीमुळे त्यांच्या सांसारिक जीवनात आनंदाचं भरतं आलं होतं. त्यांच्या संसार वेलीवर फुल उमलणार होतं. घरात पाळणा हलणार असल्याने संसारात आनंदाचं वातावरण होतं. बाळ जन्माला येणार असल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. इवलंसं बाळ कुशीत खेळणार असल्याच्या आनंदाने ते भारावून गेले होते. त्यांचं सांसारिक जीवन आनंदानं बहरलं होतं. बाळाच्या जन्माची त्यांना उत्सुकता लागली होती. बाळ जन्माचे डोहाळे लागल्याने त्यांचा आनंद शिगेला पोहचला होता. बाळ जन्माला येणार असल्याच्या आतुरतेत मायेच्या कळा सोसल्यानंतर अखेर बाळंतपणाची घटका आली. महिला प्रसूत झाली, पण आनंदमग्न असलेला परिवार मात्र दुःखी झाला. जन्माला आलेल्या बाळाची अवस्था पाहून पती पत्नी धाय मोकलून रडू लागले. बाळाची शारीरिक अवस्था फार विचित्र होती. बाळ शारीरिक दृष्ट्या अविकसित व विकलांग जन्माला आल्याने त्यांच्या आनंदावर दुःखाचं विरजण आलं. त्यांनी बाळ जन्माची रंगविलेली स्वप्न क्षणात चूर झाली. त्यांचा आनंद...