एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार तर दोन जण जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाल्याची घटना आज ३१ जानेवारीला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील झोला फाट्याजवळ घडली. या अपघातात दुचाकी चालकासह अन्य एक महिला गंभीर जखमी झाली असून त्या दोघांनाही उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर एसटी बसही अनियंत्रित होऊन दुभाजकावर चढली. अपघात घडताच या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. एसटी महामंडळाची वणी-चंद्रपूर ही बस (MH १४ HG ८२२७) वणी वरून चंद्रपूरच्या प्रवासाला निघाली. दरम्यान झोला फाट्याजवळ बसची दुचाकीला (MH CE ३१२०) जोरदार धडक बसली. या अपघातात जयश्री शंकर उमाटे (४५) रा. भद्रावती ही महिला दुचाकी वरून खाली पडली, व बसच्या चाकाखाली चिरडल्या गेली. यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवीत असलेला मृतक महिलेचा मुलगा प्रतीक शंकर...