अखेर ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडकफडकी बदली, गोपाल उंबरकर असतील वणी पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार

प्रशांत चंदनखेडे वणी वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गोपाल उंबरकर हे वणी पोलिस स्टेशनचे नविन ठाणेदार म्हणून नियुक्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आधी पुसद ग्रामीणला असलेले गोपाल उंबरकर हे वणी पोलिस स्टेशनचा लवकरच पदभार सांभाळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. वणी पोलिस स्टेशनमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यातच ठाणेदार अनिल बेहेरानी यांची बदली झाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदली काळात अनिल बेहेरानी यांना वणी पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती मिळाली होती. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीत झालेली वाढ व दीपक चौपाटी परिसरात शेकडो गोवंश जनावरांच्या झालेल्या हत्येचा ठपका ठेऊन त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शेकडो गोवंश जनावरांच्या हत्या प्रकरणी गोसेवा आयोग समिती नेमण्यात आली होती. गोवंश आयोग समितीने गोवंश हत्या प्रकरणात स...