शुल्लक कारणावरून शेजाऱ्याला स्टील रॉड मारून केले जखमी

प्रशांत चंदनखेडे वणी शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. एकाने दुसऱ्याला थापड, बुक्क्या व स्टील रॉडने मारहाण केली. स्टील रॉड हाताच्या बोटाला (तर्जनी) लागल्याने शेजारी जखमी झाला. याबाबत त्याने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविनगर येथील साई अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या विलीन वामनराव औंझे (४७) व अभय विठ्ठल होले (४०) या दोन शेजाऱ्यांमध्ये कचरा टाकण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला जाऊन वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. अभय होले याने विलीन औंझे यांना थापड बुक्यांनी मारहाण करतांनाच स्टील रॉडने त्यांच्यावर प्रहार केला. अभय होले याने विलीन औंझे यांना स्टिल रॉड मारल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला (तर्जनी) जबर दुखापत झाली आहे. एवढेच नाही तर अभय होले याने विलीन औंझे यांना बघून घेण्याची धमकी देखील दिली. विलीन औंझे यांनी झालेल्या मारहाणीबाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी अभय होले याच्यावर बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(...