क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त गणेशपूर येथे विविध कार्यक्रम

प्रशांत चंदनखेडे वणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती व छत्रपती महोत्सव समितीच्या विद्यमाने गणेशपूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत समोरील पटांगणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारीला सकाळी ९.३० वाजता छत्रपती स्मारक येथून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत गुणवंत पचारे हे संत गाडगेबाबा यांची वेशभूषा साकारणार आहेत. ढोलताशाच्या गजरात प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता उद्घाटन सोहळा होणार असून सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नूरजहॉ बेगम चॅरीटीबल ट्रस्ट वणीच्या सचिव डॉ. राणा नुर सिद्दीकी यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून सक्षम बहुउद्देशीय संस्था वणीच्या चेअरमन कर्मा तेलंग, चिखलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचा रुपाली कातकडे, सरपंचा आशा जुनगरी (गणेशपूर), महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा संध्या बोबडे, शहर काँग्रेस अध्यक्षा श्यामा तो...