Posts

Showing posts from March, 2025

राजूर (कॉ) येथील वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी पतसंस्थेत लाखोंचा अपहार, अध्यक्ष व सचिवांसह चार जणांवर गुन्हे दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील राजूर (कॉ) येथील वेस्टर्न कोलफिल्ड कर्मचारी पतसंस्थेत लाखो रुपयांची अफरातफर झाल्याचे उघडकीस आल्यानंतर लेखा परीक्षकांनी पोलिस स्टेशनला नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी पतसंस्थेचे अध्यक्ष, सचिव तथा विद्यमान व तत्कालीन लिपिकावर पतसंस्थेत १ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या चौघांनीही पतसंस्थेतील ग्राहकांच्या ठेवी परस्पर गहाळ केल्याचे उघड झाले आहे. वेकोलि कर्मचाऱ्यांनी भविष्याची पुंजी म्हणून या पतसंस्थेत जमा केलेला पैसा या चौघांनीही संगनमत करून गहाळ केला.  वेकोलि कर्मचाऱ्यांनीच उभी केलेली ही पतसंस्था असल्याने मोठ्या विश्वासाने कर्मचाऱ्यांनी या पतसंस्थेत पैशाची गुंतवणूक केली होती. परंतु पतसंस्थेच्या अध्यक्ष व सचिवानेच पैशाची अफरातफर केल्याने कर्मचाऱ्यांच्या विश्वासला मोठा तडा गेला आहे. सुकर भविष्याकरिता विश्वासाहर्तेने या पतसंस्थेत वेकोलि कर्मचाऱ्यांनी आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु अध्यक्ष, सचिव व लिपिकांनी ठेवीदारांच्या ठेवींमध्ये अपहार करून कर्मचाऱ्यांच्या भविष्याची वाट खडतर केली आहे. या प...

घराच्या बांधकामावरून झालेल्या वादातून एकाला मारहाण, तीन आरोपींवर गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   घराच्या बांधकामावरून वाद घालून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व हातातील कडे मारून जखमी केल्याची घटना शहरातील भगतसिंग चौकातील इंगोले मेडिकल जवळ घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी एका महिलेसह तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  शहरातील रंगनाथ नगर येथील रहिवाशी असलेल्या रविंद्र धनराज गुप्ता (३०) यांच्याशी विकास गजानन बोन्डे (२१) रा. जागृती नगर, प्रशांत मारोती गाडगे (४०) व एक महिला (६०) दोघेही रा. शास्त्री नगर यांनी घराच्या बांधकामावरून वाद घातला. वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. महिलेने रविंद्र गुप्ता यांना शिवीगाळ केली. तर विकास बोन्डे व प्रशांत गाडगे यांनी रविंद्र गुप्ता यांना लाथाबुक्य्यांनी मारहाण केली. या मारहाणीत विकास बोन्डे यांच्या हातातील कडे रविंद्र गुप्ता यांच्या डाव्या कानाजवळ लागल्याने ते जखमी झाले आहेत. कानाजवळ दुखापत होऊन त्यातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने रविंद्र गुप्ता यांनी झालेल्या मारहाणी बाबत पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी विकास बोन्डे, प्रशांत गाडगे व एका महिलेविरुद्ध बीएनएस...

शस्त्र सदृश्य वस्तूने वार करण्यात आलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोपीने दोन वर्षात केले दोन खून

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   जीवे मारण्याच्या इराद्याने शस्त्र सदृश्य वस्तूने हल्ला चढविण्यात आलेल्या अनोळखी इसमाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. शस्त्रासारख्या वस्तूने शरीरावर ठिकठिकाणी वार करण्यात आल्याने हा इसम गंभीर जखमी झाला होता. शहरातील बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर मरणासन्न अवस्थेत हा इसम पडून होता. ही माहिती नंतर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आधी चंद्रपूर व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले होते. नागपूर येथे उपचार सुरु असतांना त्याचा ३० मार्चला मृत्यू झाला. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र त्याच्या मारेकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत दादाराव कुमरे (२३) रा. सिंधी ता. मारेगाव असे या  क्रूरकर्म्याचे नाव आहे. त्याने याआधीही एका अनोळखी इसमाचा खून केला होता. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला. आणि आणखी एका व्यक्तीच्या खुनात त्याने आपले रंगले आहे.  बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर २६ मार्चला सकाळी ६.४५ वाजताच्या...

वणी यवतमाळ बायपास मार्गावरील प्रवासी निवाऱ्यात आढळला इसमाचा मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वाळणरस्त्याजवळ असलेल्या प्रवासी निवाऱ्यात एक वृद्ध इसम मृतावस्थेत आढळून आला. ही घटना रविवार ३० मार्चला सकाळी १० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. हा इसम तोल जाऊन जमिनीवर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा कयास वर्तविण्यात येत आहे. मृतदेहाजवळ काठी आढळून आल्याने हा वृद्ध इसम काठीचा आधार घेऊन चालत असावा, असा अंदाज बांधला जात आहे. अशातच शारीरिक संतुलन बिघडल्याने तोल जाऊन तो जमिनीवर पडला, आणि कुणाचीही मदत व उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. उपचाराअभावी एक दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतकाजवळ वणी ते वांजरी एसटी प्रवासाची तिकीट मिळाली असून तो तालुक्यातीलच रहिवाशी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृतकची ओळख अद्याप पटली नसून पोलिस मृतकाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. पुढील तपास जमादार गजानन होडगीर करीत आहे. 

भालर गावाजवळील गुंज नाल्यात दुचाकीसह आढळला इसमाचा मृतदेह

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुक्यातील भालर गावाजवळील शिव मंदिर व स्मशानभूमी दरम्यान असलेल्या गुंज नाल्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळच मोपेड दुचाकीही पडून असल्याने तो दुचाकीसह नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर घातपाताचाही संशय व्यक्त होतांना दिसत आहे. ही घटना शुक्रवार २८ मार्चला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. महादेव अमृत बहादे (५९) असे या मृत इसमाचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. मृतक महादेव बहादे हा वेकोलिच्या राजूर (ई) कोळसाखाणीत सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. पोलिस मृत व्यक्तीबद्दल आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे.  भालर गावाजवळून गुंज नाला वाहतो. या नाल्यात एक इसम व मोपेड दुचाकी पडून असल्याचे या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीस पडले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मृतक हा वेकोलि कर्मचारी असल्याचे कळाले. तो भालर म...

खरकटे पाणी टाकण्यावरून उडाली वादाची ठिणगी, आणि दोन शेजाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शेजाऱ्यांचं एकमेकांशी पटत नसलं की शुल्लक कारणांवरूनही वाद उपस्थित होतात. शेजारी एकमेकांचे कट्टर विरोधी असले की ते एक दुसऱ्याशी वाद घालण्याचे कारण शोधत असतात. कुठल्या ना कुठल्या कारणावरून नेहमी खटके उडणाऱ्या दोन शेजाऱ्यांमध्ये खरकटे पाणी गेट समोर टाकण्यावरून वाद उपस्थित झाला. वाद एवढा विकोपाला गेला की दोन महिला आपसात भिडल्या. एकमेकांचे केस पकडून त्या अक्षरशः एकमेकांवर तुटून पडल्या. शेजारी राहणाऱ्या या दोन महिलांमध्ये चांगलीच फ्रीस्टाईल झाली. एका महिलेने दुसऱ्या महिलेचे केस आवळून तिला खाली पाडले. तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. एवढेच नाही तर महिलेचा पती मध्यस्थी करण्यास आला असता त्यालाही आरोपी महिलेच्या कुटुंबीयांनी मारहाण केली. याबाबत मारहाण झालेल्या महिलेने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी एका महिलेसह कुटुंबातील अन्य तीन सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.  मारेगाव तालुक्यातील अनंतपूर (सुर्ला) येथे एकमेकांच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शुल्लक कारणांवरून खटके उडत असतात. अशातच २४ मार्चला सकाळी ७ वाजता कुंदा गणेश पाचभाई (३५) ही महिल...

अनोळखी इसमावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आरोपीला याआधीही झाली होती खुनाच्या गुन्ह्यात अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  अज्ञात कारणावरून एका अनोळखी इसमाला हत्यार सदृश्य वस्तूने मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनिकेत दादाराव कुमरे रा. सिंधी ता. मारेगाव असे या आरोपीचे नाव आहे. शहरातील बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर एक इसम गंभीर जखमी अवस्थेत पडून होता. या इसमाला शस्त्र सदृश्य वस्तूने मारून गंभीर जखमी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीला आज न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.  बाकडे पेट्रोलपंप जवळील डॉ. झाडे यांच्या दवाखान्यासमोर २६ मार्चला सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास एक अनोळखी इसम रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. तेथे एक अनोळखी इसम विवस्त्र व गंभीर जखमी अवस्थेत पडून असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याची शुद्धही हरपली होती. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी शस्त्र सदृश्य वस्तू मारण्यात आल्याने गंभीर जखमा झाल्या होत्या. पोलिसांनी जखमी अवस्थेत पडून असलेल्या इसमाला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दा...

शहरात पहिल्यांदाच भव्य नाट्य व संगीत महोत्सवाचं आयोजन

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी  श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्र वणी द्वारा सांस्कृतिक संगीत आणि नाट्य महोत्सव-२०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाट्य व संगीताने नटलेला हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ३० मार्चला सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत स्थानिक शेतकरी लॉन (वसंत जिनिंग) येथे हा महोत्सव रंगणार आहे. "शेगांवीचा संत गजानन" हे महानाट्य या महोत्सवाचे खास आकर्षण राहणार आहे.  वणी शहरात प्रथमच नाट्य व संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नाट्य, संगीत व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी वणीकरांसाठी या महोत्सवात राहणार आहे. श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा सांस्कृतिक महोत्सव वणीच्या सांस्कृतिक इतिहासाला उजाळा देणारा ठरणार आहे. या सांस्कृतिक महोत्सवात शहराच्या संस्कृतीला साजेशे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात श्री रंगनाथ स्वामी संगीत कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे सुमधुर गायन, श्री जगन्नाथ महाराजांचे संगीतमय जीवन चरित्र, प्रा. हेमंत चौधरी व पुरुषोत्तम गावंडे यांचं हास्याचे फुलोरे उड...

शहरातील व्यावसायिक संकुलाला भीषण आग, न्यू रसोई हॉटेल जळून खाक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील एका व्यावसायिक संकुलाला लागलेल्या भीषण आगीत न्यू रसोई हॉटेल पूर्णतः जळून खाक झाले. ही आग २६ मार्चला मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास लागल्याचे सांगण्यात येत आहे. यात हॉटेल मधील किंमती वस्तू व साहित्य पूर्णतः जळाल्याने हॉटेल मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने याच व्यावसायिक संकुलात असलेली बँक आगीची झळ बसण्यापासून थोडक्यात बचावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. परंतु आगीचे लोट निघतांनाचे भयावह दृश्य धडकी भरविणारे होते.  साई मंदिराच्या विरुद्ध बाजूला नांदेपेरा वळण रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक संकुलाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या भागात गस्त घालणाऱ्या पोलिसांना व्यावसायिक संकुलातून धूर निघतांना दिसला. त्यानंतर क्षणातच आग भडकली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता ही माहिती अग्निशमन दलाला दिली. पोलिसांकडून सूचना मिळाल्याने अग्निशमन दलाची वाहने शीघ्र घटनास्थळी पोहचली. मात्र तोवर आगीने रौद्र रूप धारण केले होते. व्यावसायिक संकुलातून स्फोट होत असल्यासारखे आवाज य...

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  शहरातील इंदिरा चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीवर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बाबाराव खांदनकर (४४) असे या आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही २४ मार्चला करण्यात आली.  इंदिरा चौक येथीलच संग्राम बाजीराव गेडाम (२६) हा आपल्या घरासमोर खुर्चीवर बसला असतांना आरोपी विशाल खांदनकर याने त्याची औकात काढली. त्याने विनाकारण वाद उपस्थित करून संग्राम गेडाम याला जाती वरून शिवीगाळ केली. विशाल खांदनकर याने जातीवाचक शिवीगाळ केल्याने संग्राम गेडाम याला अपमानित झाल्यासारखे वाटले. त्यामुळे त्याने पोलिस स्टेशनला येऊन विशाल खांदनकर याच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. संग्राम गेडाम याच्या तक्रारी वरून पोलिसांनी विशाल खांदनकर याच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

ऍड. विजया शेळकी मांडवकर यांचं व्ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  विधी क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व वकील म्हणून वणी तालुक्यात सर्वपरिचित असलेल्या ऍड. विजया विश्वास शेळकी मांडवकर यांचं मंगळवार दि. २५ मार्चला सायंकाळी व्ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं. मृत्यू समयी त्यांचं वय अवघं ५० वर्षांचं होतं. त्याचं असं हे अकाली निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने आप्तस्वकीय व परिसरात शोककळा पसरली आहे. ऍड. विजया शेळकी मांडवकर या अतिशय सुस्वभावी व मनमिळाऊ स्वभाच्या होत्या. मितभाषी स्वभावामुळे वकिली क्षेत्रात त्यांचं एक वेगळं स्थान होतं. बोधे नगर चिखलगाव येथे राहणाऱ्या ऍड. विजया या राजूर ग्रामपंचायतीच्या सदस्य देखील राहिल्या आहेत. त्यांच्या पश्च्यात पती विश्वास शेळकी व मुलगी विजेता शेळकी असा आप्त परिवार आहे. २६ मार्चला दुपारी त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ऍड. विजया शेळकी  मांडवकर यांना लोकसंदेश न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली.  

महसूल विभाग व शिरपूर पोलिसांची पैनगंगा रेती घाटांवर संयुक्तिक कार्यवाही, अन्य रेती घाटांवरही अशाच कार्यवाहीची अपेक्षा

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  वणी तालुका रेती तस्करीचा हॉसस्पॉट बनला आहे. तालुक्यात रेती तस्करांचं जाळं दूरवर पसरलं आहे. रेती तस्करांनी आपली पाळंमुळं याठिकाणी घट्ट केली आहेत. रेती तस्करीला रोख लावण्यात प्रशासन अपयशी ठरू लागल्याने तस्करांना येथे सुगीचे दिवस आले आहेत. रेती तस्करीतून अनेक छोटे मोठे तस्कर मालामाल झाले आहेत. राजकीय पाठबळातूनही मागील अनेक वर्षांपासून रेती तस्करी जोमात सुरु आहे. रेती तस्करीच्या अवतीभोवती राजकारण फिरत असल्याने प्रशासनाला मुके, बहिरे व आंधळेपणाचं सोंग घ्यावं लागतं. मात्र थोडं धाडस करून महसूल विभागाने शिरपूर ठाणेदारांची मदत घेऊन पैनगंगा नदीच्या रेती घाटांवर सर्च मोहीम राबवली. रेती तस्करांवर कार्यवाहीचा बडगा उगारून रेती चोरी करणाऱ्या एका ट्रॅक्टरसह रेती घाटांच्या आजूबाजूला साठवून ठेवलेली १५ ते २० ब्रास रेती जप्त करण्यात आली. जप्त केलेली रेती घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली आहे.  पैनगंगा नदीच्या साखरा व कोलगाव रेती घाटांवरून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याची माहिती कानावर पडल्याने शिरपूर पोलिस व महसूल विभागाने संयुक्तिक कार्यवाही मोहीम राबविली. या दरम्यान ...

गुन्हेगारी प्रवृत्तीचा उधम, एकाला अटक करीत नाही तोच दुसरा चाकूचा धाक दाखवून माजवतो दहशत

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  चाकूच्या धाकावर परिसरातील जनतेत दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हरीश राजू तोमस्कर (२९) रा. सेवानगर असे या आरोपीचे नाव आहे. ही कार्यवाही २४ मार्चला दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.  आरोपी हरीश तोमस्कर हा कोंडेवार ले-आऊट परिसरातील कार्निवल बार समोर सार्वजनिक रस्त्यावर हातात चाकू घेऊन नागरिकांना धमकावण्याचा प्रयत्न करीत होता. अशातच ही माहिती पोलिस स्टेशनला देण्यात आली. या माहिती वरून पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. चाकूच्या धाकावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली. त्याच्या जवळून एक धारदार चाकू जप्त करण्यात आला. अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणाऱ्या हरीश तोमस्कर याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल उंबरकर, एपीआय धीरज गुल्हाने व पोलिस पथकाने केली.  वणी गणेशपूर रोडवरील निर्गुडा नदीच्या पुलाजवळ अवैधरित्या दारू विक्री करण...

चाकूच्या धाकावर दहशत माजविणाऱ्या आरोपीला अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दीपक चौपाटी परिसर हा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनत चालला आहे. चोरी, लुटपात, मारामारी या परिसरात नेहमीच होतांना दिसतात. भाईगिरीचा आव आणून कुणाशीही वाद घालणे, टोळक्याने येऊन मारहाण करणे, या घटना येथे नित्याच्याच झाल्या आहेत. दीपक चौपाटीला लागूनच प्रेमनगर वस्ती आहे. येथेही टपोरी युवक मोठ्या प्रमाणात हुडदंग घालतांना दिसतात. अवैधरित्या जवळ शस्त्र बाळगून शस्त्राच्या धाकावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका हातात चाकू घेऊन प्रेमनगर येथे लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. चाकूच्या धाकावर दहशत मजावितांना पोलिसांनी अटक केलेला आरोपी (२६) हा बावणे ले-आऊट एकार्जुना ता. वरोरा जि. चंद्रपूर येथील रहिवाशी आहे. दीपक चौपाटी परिसरातील प्रेमनगर येथे एक तरुण हातात चाकू घेऊन लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना प्रेमनगर येथे एक तरुण हातात चाकू घेऊन दहशत माजवितांना दिसला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. त्याच...

मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत रेती तस्करी जोरात, पोलिस बनले मुकदर्शक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पोलिसांकडे विशेष लक्ष दिलं जात असल्याने पोलिस रेती चोरट्यांकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहे. पोलिसांच्या छुप्या पाठबळामुळे रेती तस्करांना रान मोकळे झाले आहे. पोलिसांनी मधुर संबंधाचा काळा चष्मा डोळ्यावर चढविल्याने वाळू चोरीचे ट्रॅक्टर त्यांच्या दृष्टीस पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र एसडीपीओ कार्यालयीन पोलिस पथकाने मागील एक महिन्यात मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत तीन वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर पकडले. तर महसूल विभागानेही मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत नुकतीच एका वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कार्यवाही केली. यावरून वाळू चोरटे मुकुटबन पोलिसांचे हित जोपासत असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. वरकमाईच्या हव्यासापोटी पोलिसच रेती चोरट्यांना चालना देत असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. पोलिसांच्या कर्तव्य विपरीत कार्यप्रणालीमुळे रेती तस्करांच्या हिंमती वाढू लागल्या आहेत. बेकायदेशीर रेतीचा उपसा होत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल चोरट्यांच्या घशात जाऊ लागला आहे. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आता उपस्थित ह...

छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ समता व सद्भावनेचा होता : किरण देरकर

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आहे. १८ पगड जातींना सोबत घेऊन त्यांनी साम्राज्य उभारलं होतं. स्वराज्याची सर्वप्रथम संकल्पना मांडणारे शिवाजी महाराज रयतेचं जीवापाड रक्षण करायचे. शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा समभाव व सद्भावनेचा होता. परंतु संत व महापुरुषांच्या विचारधारेच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जातीय राजकारण खेळलं जात आहे. जातीयतेची बिजं रोवून त्याला खतपाणी घालण्याचं काम मागील काही वर्षात पूर्वनियोजित सुरु आहे. शिक्षणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. संप्रदायिकता वाढू लागली आहे. गोडी गुलाबीनं राहणारी जनता द्वेषभावनेने पेटू लागली आहे. जातीय सलोखा असणाऱ्या देशात जातीय विष पेरण्याचं काम केलं जात आहे. बेरोजगारी वाढली आहे. महिला, मुलीवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे. लाडक्या बहिणींना १५०० रुपये तर दिले जाते. पण त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जात नाही. आता तर २१०० रुपये देण्याऐवजी महिलांच्या अर्जाची छाटणी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा अजून कोरा झाला नाही. कर्ज माफीचा सरकारला विसर पडला आहे, असे परखड विचार सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्य...

वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या दोघा बापलेकाला तिघा बापलेकांनी केली जबर मारहाण

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचं वातावरण निर्माण होऊ लागलं आहे. मारहाणीच्या घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तिघे बापलेक चुलत भावाशी वाद घालत असतांना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या दोघा बापलेकाला लाकडी काठी व हातातील लोखंडी कड्याने मारून जखमी केल्याची घटना आमलोन येथे १८ मार्चला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. लाकडी काठी डोक्यावर मारल्याने एकाचे डोके फुटले. तर एकाला डोळ्याजवळ हातातील कडे लागल्याने ते जखमी झाले आहेत. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी बापलेकांवर गुन्हे दाखल करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.  मारहाणीच्या घटनांमध्ये झालेली वाढ बघता पोलिसांचा जराही वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. पोलिस व कायद्याची भीती न उरल्याने जो तो कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. आमलोन येथील रहिवाशी असलेल्या दोन शेतकऱ्यांचा वावराच्या हद्दीवरून वाद सुरु होता. एका शेतकऱ्याने वावरात केलेली नाली दुसऱ्या शेतकऱ्याच्या वावरा...

कोळसा सायडिंग मधून निघत आहेत धुळीचे लोट, शहरवासीयांना काळा शाप ठरल्या आहेत या कोळसा सायडिंग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  नागरी वस्तीलगत असलेल्या रेल्वेच्या मालधक्यांवरून कोळशाची प्रचंड धूळ उडत असल्याने नागरिकांमधून कमालीचा संताप व्यक्त होतांना दिसत आहे. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात कमालीची वाढ झाली आहे. प्रदूषित वातावरणात श्वास घेणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत. रेल्वेचे मालधक्के काळी धूळ ओकू लागल्याने येथील जनजीवन प्रभावित झाले आहे. धूळ प्रदूषणामुळे येथील नागरिक विविध आजारांना बळी पडू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रण यंत्रणाही कुचकामी ठरताना दिसत आहे. रेल्वे सायडिंग वरून उडणारी काळी धूळ नागरिकांचा काळ ठरू लागली आहे. कोळसा सायडिंग वरून उडणाऱ्या या काळ्या धुळीमुळे परिसरासह येथील नागरिकांचं जीवनही काळवंडलं आहे. धूळ प्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या या कोळसा सायडिंग नागरी वस्तीपासून दूर हलविण्याची जीवतोड मागणी होत असतांनाही शासन, प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. नागरिकांचं आयुष्यमान घटविणाऱ्या या कोळसा सायडिंग येथून हटविण्याच्या हालचाली सुरु न केल्यास येथील नागरिक तिव्र आंदोलन उभारण्याच्या पवित्र्यात आहेत. अगदीच रहिवाशी वस्त्यांना लागून रेल्वेच्या ...

शिरपूर ते आबई फाटा रस्ता अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतिक्षेत, रस्त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त न काढल्यास तिव्र आंदोलन

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  यवतमाळ व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या शिरपूर ते आबई फाटा रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणे अतिशय जिकरीचे झाले आहे. या रस्त्यावरून वाहने चालवितांना वाहनधारकांना तारेवरची कसरत कारवी लागत आहे. जवळपास तीन दशकांपासून हा रस्ता दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे. ६० ते ७० गावांतील नागरिक या रस्त्याने मार्गक्रमण करतात. परंतु रस्त्याची झालेली दुरावस्था बघता त्यांचं या रस्त्याने मार्गक्रमण करणं कठीण झालं आहे. त्यामुळे कायम दुर्लक्ष करण्यात आलेल्या या रस्त्यावर दृष्टिक्षेप टाकून या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना (उबाठा) वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.  दोन जिल्हांना जोडणारा हा ४ किमीचा रस्ता कायम दुर्लक्षित राहिला आहे. शिरपूर ते आबई फाटा हा प्रचंड रहदारीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून कोळशाचीही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. ६० ते ७० गावातील नागरिकांचा प्रमुख मार्गक्रमणाचा हा रस्ता आहे. विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याने शाळा कॉलेजमध्य...

ऑटो व दुचाकीची धडक, दुचाकीस्वार व ऑटोतील प्रवासी महिला जखमी

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   ऑटो व दुचाकीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवक आणि ऑटोतील प्रवासी महिला जखमी झाल्याची घटना १९ मार्चला सकाळी १० ते १०.३० वाजताच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ घडली. ऑटोने अचानक वळण घेतल्याने दुचाकी ऑटोला धडकल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातात जखमी झालेल्या ऑटोतील प्रवासी महिलेवरही खाजगी रुग्णालयातच उपचार करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील रहिवाशी असलेला युवक व त्याची पत्नी दुचाकीने वरोरा येथे आपल्या मुलाच्या उपचाराकरिता गेले होते. मुलाचा उपचार करून पती, पत्नी दुचाकीने गावी परतत असतांना वरोरा मार्गावरील सावर्ला गावाजवळ अचानक वळण घेणाऱ्या ऑटोला दुचाकी धडकली. त्यामुळे दुचाकी वरील तिघेही जण रोडवर पडले. यात दुचाकी चालकाच्या हाताला जबर मार लागल्याने त्याचा हात फ्रॅक्चर झाला आहे. तसेच या अपघातात ऑटोतील एक प्रवासी महिलाही जखमी झाली आहे. मुख्य मार्गावरून ऑटोने अचानक वळण घेतल्याने वरोरा वरून वणीकडे येणारी दुचाकी ऑटोवर आदळली. ऑटो चालकाने ...

मानसिक स्थितीतून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील शास्त्री नगर येथे १८ मार्चला दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कौशल्या मनोज साखरकर (३५) असे या गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे सांगण्यात येते. काही दिवसांपासून ही महिला शास्त्री नगर येथे आपल्या माहेरी राहत होती.  आई वडिलांसोबत माहेरी राहत असलेल्या या महिलेने अचानक राहत्या घरीच गळफास घेतला. वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. तर आई नुकतीच लघुशंकेकरिता घरातून बाहेर आली होती. एवढाच एकांत मिळाल्याची संधी साधून या महिलेने घराच्या खोलीत गळफास घेतला. क्षणभरातच आई घरात परतली तेंव्हा तिला कौशल्या ही फासावर झुलताना दिसली. आईने तिला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र वृद्ध आईला ते शक्य होऊ शकले नाही. तिचा गळफास सोडवितांनाच तिचा मृत्यू झाला. महिलेची मानसिक स्थिती ढासळल्याने अघटित काही घडू नये या भीतीपोटी पतीने तिला माहेरी आणून ठेवले होते, असे सांगण्यात येते. परंतु माहेरीही तिने नको तेच केले. खालावलेल्या मानसिक स्थितीतून तिने गळफास लावला. महिलेने...

शेजाऱ्यांशी चर्चा करीत असतांना केली मारहाण, आरोपीवर गुन्हा दाखल

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   शेजारच्या शेतात बैलं जाण्याने नेहमी वाद होत असल्याची शेजाऱ्यांसोबत चर्चा करणाऱ्या व्यक्तीला बाजूलाच उभा असलेल्या युवकाने वाद घालून नाकावर व डोक्यावर बुक्क्याने तथा हातातील लोखंडी कड्याने कपाळावर मारून जखमी केल्याची घटना १७ मार्चला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वणी तालुक्यातील निंबाळा या गावात राहणाऱ्या प्रकाश मारुती घोरूडे (३४) यांची निंबाळा गावालगत शेती असून त्यांच्या शेताला लागूनच आकाश बंडू कुत्तरमारे यांचं शेत आहे. शेतात बैलं जाण्यावरून त्यांच्यात नेहमी वाद होतात. १६ मार्चला दुपारी २ वाजता प्रकाश घोरुडे यांनी आकाश कुत्तरमारे याला यानंतर माझे बैल तुझ्या शेतात येणार नाही, आणि यावरून आपल्यात आता वादही होणार नाही असे म्हटले. त्यानंतर प्रकाश घोरूडे हे घरी परतले. दुसऱ्या दिवशी १७ मार्चला सकाळी ७ वाजता प्रकाश घोरूडे हे आकाश कुत्तरमारे याच्या शेतात बैलं जाण्याने वाद उत्पन्न होतात अशी शेजाऱ्यांसोबत चर्चा करीत असतांना बाजूलाच उभा असलेला आकाशचा भाऊ सचिन बंडू क...

बहीण माहेरी निघून आल्याने भावाची फिल्मस्टाईल दादागिरी, पाच साथीदारांसह जावयाला घरी जाऊन बदडले

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  चित्रपटातील पात्र युवा पिढीच्या अंगात संचारू लागले आहेत. कुणी हिरोगिरी तर कुणी भाईगिरी करतांना दिसत आहेत. त्यांना सर्वकाही चित्रपटातील कथानकाप्रमाणे वाटू लागले असून पोलिस व कायदा याचा त्यांना विसर पडू लागला आहे. बहीण माहेरी निघून आल्याने भावाने चक्क चित्रपटातील कथानकाप्रमाणे आपल्या साथीदारांसह कारने जावयाच्या घरी येऊन त्याला येथेच्छ बदडले. एवढेच नाही तर त्याला कारमध्ये जबरदस्ती बसवून नेत त्याची फिल्मस्टाईल धुलाई केली. ही चित्रपटात शोभावी अशी घटना वणी तालुक्यातील रासा येथे १७ मार्चला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी युवकाला मारहाण करणाऱ्या त्याच्या साळ्यासह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.  वणी तालुक्यातील रासा या गावात राहणाऱ्या सुभाष प्रकाश शिंदे (३०) याचा विवाह वरोरा येथील रोशनी नामक तरुणीशी झाला. संसारिक जीवन सुरळीत सुरु असतांना १६ मार्चला पती पत्नीत किरकोळ वाद झाला. दोघांमध्ये झालेल्या वादामुळे पत्नी थेट माहेरी निघून गेली. बहीण माहेरी निघून आल्याचे पाहून भावाचा पारा चढला. चित्रपटातील दृ...

घरात सोन्याचा हंडा असल्याचे भासवून घरमालकाला गंडविले, पोलिसांनी तीन ठगांना ठोकल्या बेड्या

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  कोरपना तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेल्या व्यक्तीच्या घरात गुप्तधन असल्याचा बनाव करून त्याला नागपूर जिल्ह्यातील दोघांनी गंडविल्याची घटना १६ मार्चला उघडकीस आली. घरात दडलेलं गुप्तधन काढून देण्याच्या नावाखाली त्याच्या कडून १ लाख ६५ हजार रुपये रोख व ११ ग्राम वजनाचा सोन्याचा नेकलेस उकळणाऱ्या दोन ठगांसह तिन जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या जवळून ९ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ४४ वर्षीय फिर्यादीच्या तक्रारी वरून पोलिसांनी तिनही आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. या तिनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कोरपना तालुक्यातील अंतरगाव येथील रहिवाशी असलेल्या विजय महादेव टोंगे (४४) यांची दोन महिन्यांपूर्वी नागपूर जिल्ह्यातील कवठा येथील रहिवाशी असलेल्या क्रिष्णा कन्हैय्या येदानी (३५) याच्याशी ओळख झाली. क्रिष्णा हा वैद्य असून तो आयुर्वेदिक उपचार करतो. विजय टोंगे यांना कंबरेचा त्रास असल्याने ते क्रिष्णा यांच्याकडे आयुर्वेदिक उपचार घेत होते. मात्र विजय यांना क्रिष्णाच्या उपचाराने आराम पडत नव्हता. अ...

अचानक आडवं आलं जनावर आणि घडला अपघात, अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  दुचाकीला जनावर आडवं आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवार दि. १६ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा मार्गावरील सागर ढेंगळे यांच्या घराजवळ घडली. राहुल सुरेश धांडे (३०) रा. वांजरी असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.  वणी येथील कामे आटपून दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणावर काळाने घाला घातला. मार्गात दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला व नियतीने तरुणाला कायमचे हिरावून घेतले. वणी वरून वांजरीला मोटारसायकलने जात असतांना जनावराच्या रूपात काळ आडवा आला. दुचाकीला अचानक जनावर आडवं आल्याने दुचाकीची जनावराला जोरदार धडक बसली. या अपघातात राहुल धांडे या दुचाकीस्वाराला जबर मार लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल धांडे हा स्वतःच्याच शेतीची कामे करायचा. त्याने शहरातील एका ड्रायव्हिंग स्कुलमध्येही अनेक वर्षे काम केले होते. रविवारी वणीला कामानिमित्त आलेला हा तरुण सायंकाळी दुचाकीने गावी परतत असतांना हा अपघात झाला. आणि या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी पंचनामा करून...

राजूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   स्वराज्य संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यांची तिथी नुसार जयंती साजरी करण्याकरिता राजूर कॉलरी येथे शिवाजी महाराज जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. १७ मार्चला सायंकाळी ५ वाजता सावित्रीबाई फुले चौक राजूर येथे हा जयंती महोत्सव साजरा होणार आहे. युवासेना राजूर शाखा प्रमुख अमृत फुलझेले व सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्या उपाध्यक्षा दिशा फुलझेले यांच्या पुढाकारातून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे.  या जयंती महोत्सवाचं उद्घाटन सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा किरण देरकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य संघदीप भगत हे राहतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, ग्रा.प. सदस्य अमर तितरे, भिमटायगर सेना जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे, ग्रा.प. सदस्य ओम चिमुरकर, माजी सरपंच तथा सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन राजूरच्य...

मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत वाहतो अवैध दारूचा पाट, आणि पोलिस बघतात हप्त्यांची वाट

Image
  प्रशांत चंदनखेडे वणी   मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्रीला उधाण आलं आहे. गावागावात अवैध दारू विक्री सुरु असतांना पोलिसांचं मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष होतांना दिसत आहे. पोलिसांच्या आशीर्वादानेच अवैध दारू विक्री सुरु असल्याची जोरदार चर्चा येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी मुकुटबन पोलिस स्टेशन हद्दीतील बहुतांश गावांमध्ये दारू विक्रीचे अड्डे थाटले असून पोलिसांच्या पाठबळामुळेच बिनधास्त दारू विकली जात आहे. गावात व गावालगत पावलापावलांवर दारू मिळत असल्याने ग्रामीणवर्ग दारूचा प्रचंड तलबी झाला आहे. गावातच मुबलक दारू मिळत असल्याने तरुण पिढीही दारूच्या आहारी जाऊ लागली आहे. अवैध दारू विक्रेत्यांवर ठाणेदारांचं कुठलंही नियंत्रण राहिलेलं दिसत नाही. केवळ हप्ते गोळा करण्यात पोलिस स्टेशन गुंतलं असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया दारूमुळे संसार उध्वस्त होण्याची परिस्थिती निर्माण झालेल्या महिलांमधून व्यक्त होतांना दिसत आहेत. मुकुटबन पोलिसांच्या नजरेपासून लपली नसलेली ही अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.  मुकुटबन पोलिस स्टेशनमध्ये आलबे...

धुळवडीच्या दिवशी दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  मोटारसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी दुपारी १ ते १.३० वाजताच्या सुमारास वणी घुग्गुस मार्गावरील नायगाव व बेलोरा फाट्यादरम्यान घडली. विवेक शर्मा वय अंदाजे ३१ वर्षे असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.  वेकोलिच्या निलजई कोळसाखाणीत ओबी उत्खनन करणाऱ्या सायडेक्स कंपनीत ट्रक (व्होल्वो) चालक म्हणून कामाला असलेला हा युवक परप्रांतीय असून तो बिहार राज्यातील रहिवाशी असल्याचे समजते. सध्या तो घुग्गुस येथे राहत होता. १४ मार्चला धुळवडीच्या दिवशी मोटारसायकलने घुग्गुस-चारगाव चौकी मार्गाने जात असतांना नायगाव जवळ त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले, व दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात दुचाकी चालक युवक हा गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र अपघातात गंभीर दुखापत झालेल्या या युवकाचा मृत्यू झाला. आज त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह अंतिमसंस्काराकरिता कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 

थरार, भटक्या कुत्र्याचा बालकावर हल्ला, महिला धावून आल्याने टळला पुढील प्रसंग

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  भटक्या कुत्र्याने एका बालकावर हल्ला चढविल्याचा थरारक व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला आहे. परिसरात सायकल फिरवून खेळत असलेल्या बालकावर अचानक भटक्या कुत्र्याने हल्ला केला. बालकाला अक्षरशः या कुत्र्याने सायकलवरून खाली खेचले. त्याच्या शरीराला या कुत्र्याने चावा घेतल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. हा पिसाळलेला कुत्रा बालकाचे लचके तोडत असतांना त्याच्या किंचाळ्या ऐकून एक महिला धावतच घराबाहेर आली. तिने कुत्र्याला हाकलून लावल्याने पुढील प्रसंग टळला. ही अंगावर शहारे आणणारी घटना शहरातील सदाशिव नगर येथे ११ मार्चला सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे.  शहरात भटक्या कुत्र्यांचा हौदोस प्रचंड वाढला आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एका व्यक्तीला भटक्या कुत्र्याने कडाडून चावा घेतला होता. हे प्रकरण युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी डोळ्यासमोर आणले होते. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची त्यावेळी जोरदार मागणीही करण्यात आली होती. शहरात कुत्र्यांची संख्या वाढीस लागली आहे. गल्लीबोळात भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात संचार क...

रंग उधळा आणि पोटभरून हसा, खळखळून हसविणारं हास्य कवी सम्मेलन आहे धुळवडीला

Image
प्रशांत चंदनखेडे वणी   बुरा ना मनो होली है, म्हणत एकमेकांवर आनंदाने रंगाची उधळण करणारा सण म्हणजे होळी. आपसी मतभेद, वैर आणि कटुत्व विसरून मानवी मनात आनंदाचे रंग भरणारा हा सण आहे. आपापसातील मनमूटाव दूर सारून एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना रंग लावून एकमेकांप्रती असणारा राग दूर करणारा सण म्हणजे होळी. होळी हा सण संपूर्ण भारतात आनंदाच्या वातावरणात साजरा केला जातो. स्नेहसंबंधी, शेजारी, मित्रमंडळ व परिसरातील लोक एकमेकांना रंग लावून होळी हा सण साजरा करतात. कुटुंबातील सदस्यही एकमेकांवर रंग उधळून हा सण साजरा करतात. नाते व आपसी संबंध घट्ट करणारा हा सण आहे. असे असले तरी आनंदाच्या रंगात हास्याची उधळण करण्याची परंपरा वणी शहराने जपली आहे. दिवसभर रंग उधळून आनंद साजरा करणाऱ्या शहरवासीयांचे चेहरे सायंकाळीही प्रफ्फुल्लीत राहावे म्हणून हास्याचे फुलोरे फुलविणारा कार्यक्रम दरवर्षी धुळवडीला आयोजित केला जातो. अखिल भारतीय अति दीड शहाणे सम्मेलन समिती वणीच्या विद्यमाने हास्याचे रंग उधळणारं हास्य कवी सम्मेलन मागील २५ वर्षांपासून शहरात आयोजित केलं जात आहे. या कवी सम्मेलनात दरवर्षी नवनवीन हास्य सम्राटांना आमंत्...

चोरटे झाले शातीर, प्लॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने एटीएम मधून पैसे चोरतांना दोन चोरट्यांना अटक

Image
प्रशांत चंदनखेडे वणी  चोरटे चोरीच्या विविध शक्कली लढवू लागले आहेत. चक्क एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा घाट चोरट्यांनी रचला. एटीएम मधून पैसे चोरी करण्याचा डाव साधत असतांना सतर्क असलेल्या शिरपूर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. एटीएम मधून पैसे चोरी करतांना शिरपूर पोलिसांनी दोन चोरट्यांना रंगेहात अटक केली आहे. ही कार्यवाही ११ मार्चला करण्यात आली. या चोरट्यांनी याआधीही एटीएम मधून पैसे चोरी केल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.  शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चारगाव चौकी येथे हिताची कंपनीच्या असलेल्या एटीएम मधून चोरटे पैसे चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. या माहिती वरून शिरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी एटीएम रुमध्ये जाऊन पाहिले असता तेथे दोन चोरटे प्लॅस्टिक पट्टीच्या साहाय्याने एटीएम मधून पैसे काढतांना आढळून आले. एटीएम मधून पैसे चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोनही चोरट्यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. सुशिल वसंत तोडेकर (३६) व नरेश रामदास घुगुल (३३) दोघेही रा. बल्लारपूर जि. चंद्रपूर अशी या पोलिसांनी अटक केलेल...